दीपक बोराडे यांचा ऐतिहासिक उपोषण लढा – ११वा दिवस

दीपक बोऱ्हाडे जालना आंदोलन आमदारांची भेट
दीपक बोऱ्हाडे यांचा ऐतिहासिक उपोषण लढा – ११वा दिवस ♦
दिनबंधू न्यूज – संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78 01
उपोषणाची पार्श्वभूमी
दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी, जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजनेते दीपक बोराडे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा अकरावा दिवस संपन्न झाला.
त्यांच्या मागणीनुसार, अनुसूचित जमातींच्या यादीत असलेला “ओरॉन, ढंगड (Oraon, Dhangad) – क्रमांक ३६” हा शब्दच बदलून धनगर (Dhangar) असा आहे, असे ते ठामपणे सांगतात.
या प्रश्नावर त्यांनी मोठ्या धैर्याने आणि चिकाटीने आंदोलन चालवले असून समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे
आंदोलनाला पाठिंबा
उपोषणाला अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे व सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे बीड जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दादा ढवळे यांनी भेट देऊन शुभेच्छा व पाठिंबा दिला.
सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी निर्मिक प्रार्थना करून “दीपक बोराडे यांना लढ्यातील शक्ती देवो आणि विजय मिळो” अशी सदिच्छा व्यक्त केली.
सरकारची भूमिका
आंदोलनादरम्यान जालन्याचे आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे पत्र घेऊन आले आणि तेथे वाचन केले.
पत्रामध्ये “हा विषय केंद्र सरकार व आयोगाच्या अखत्यारीत आहे, महाराष्ट्र शासन यात थेट हस्तक्षेप करू शकत नाही” असा सूर होता.
त्यामुळे हे पत्र सकारात्मक उपाय न सुचवणारे असल्याची भावना समाजात पसरली.
ऐतिहासिक मोर्चा
या आंदोलनादरम्यान काही दिवसांपूर्वी लाखोंच्या संख्येने महिला, पुरुष, लहान मुले, विद्यार्थी, वृद्ध यांचा सहभाग असलेला मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक मोर्चा ठरला असून, “न भूतो, न भविष्यती” असे वर्णन समाज बांधवांनी केले.
सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची भूमिका
जातनिहाय जनगणना करून “जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी” या तत्त्वावर आरक्षण लागू करावे.
सर्व समाजाला केजी ते पीजी मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सुविधा, शेतकऱ्यांना ५०% नफा धरून हमीभाव, बेकारांना नोकरीची हमी, तसेच नोकरीतील पगारातील अन्यायकारक तफावत कमी करणे या मागण्या तातडीने मान्य कराव्यात.
शिक्षणाबरोबर व्यावसायिक प्रशिक्षण देऊन युवकांना सक्षम करावे व त्यांना १० वर्ष बिगरव्याजी कर्जपुरवठा करावा.
अन्यथा, आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळेल आणि देशात अराजकता, गोंधळ, जातीय संघर्ष उभा राहील, असे स्पष्ट इशारे त्यांनी दिले.
अनुसूचित जमातींची महाराष्ट्रातील यादी (प्रमुख भाग)
३६. ओरॉन, धनगड (Oraon, Dhangad)
समाजाला आवाहन
“या आंदोलनाची दखल शासनाने तातडीने घ्यावी, अन्यथा परिणाम गंभीर होतील.” – सत्यशोधक शंकरराव लिंगे
सोशल मीडिया संदेश
73 87 37 78 01 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा.
बातमी व्हिडिओ लाईक करा , शेअर करा , सबस्क्राईब करा , फॉरवर्ड करा , कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा.

















