नाशिकमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते स्वागत!

नाशिक, दि. २६ सप्टेंबर : नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या लोकार्पणासाठी सरन्यायाधीश भूषण गवई आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे विश्रामगृह येथे आगमन होताच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे भेट देत स्वागत केले.
यावेळी मंत्री भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मा. श्री. चंद्रशेखर यांचेही महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांनी स्वागत केले.
भूषण गवई हे देशाचे दुसरे दलित सरन्यायाधीश आहेत. त्यांनी न्यायव्यवस्थेत सामाजिक न्यायाच्या तत्वांचा पुरस्कार केला आहे. त्यांच्या न्यायनिर्णयांमध्ये वंचित, मागासवर्गीय व सामान्य नागरिकांसाठी संवेदनशील भूमिका दिसते.
दिनबंधू न्यूज, संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78 01
➡ हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
बातमीला लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कॉमेंट करा
नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका!




