ओबीसी समाजाकडून शिवजयंती निमित्त मराठा समाजाला विनंतीt सत्यशोधक शंकरराव लिंगे* * राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन

ओबीसी समाजाकडून शिवजयंती निमित्त मराठा समाजाला विनंतीt सत्यशोधक शंकरराव लिंगे*
* राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन
कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना संदेश देण्यात येतो की आज महाराष्ट्रात जे भितीचे वातावरण आहे ओबीसी वर अन्याय केला जात आहे ओबीसींचे प्रतिष्ठाने जाळल्या जात आहे
ओबीसी नेतृत्वावर किळसवाणी चिखल फेक केल्या जात आहे ओबीसी समाज बांधवांना वेठीस धरल्या जात आहे ओबीसीच्या आमदारांची घरे दारे जाळली जात आहे ओबीसीच्या नेत्यांना रात्रंदिवस गलिच्छ शिवीगाळ केली जात आहे जर आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असते तर हे दिवस छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये वावरणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वंशजांच्या वाट्याला आले नसते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त महाराजांना त्रिवार वंदन व आपणा सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..
शुभेच्छुक :- शंकरराव लिंगे….

धन्य धन्य ते शिवाजी महाराज!
आज शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांच्या दबावाखाली येऊन मराठ्यांना बेकायदेशीर आरक्षण देण्यासाठी सरसावलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब इतिहासात असला कधीही जातीवादी मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला नाही.
शिवाजी महाराजांचा वारसा सांगायचा असेल तर ओबीसी वरील अन्याय थांबवा.सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करा.कुणबी मराठा, मराठा कुणबी हे कुणबी नाहीत.औरंगाबादचे खंडपीठाचे न्यायाधीश माननीय मारला पल्ले यांचा थोरात यांच्या निकाल म्हटले आहे. त्यानंतर पाचमे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल महाराष्ट्र सरकार विरुद्ध डॉक्टर जयश्री पाटील खटल्या.कुणबी मराठा मराठा कुणबी हे कुणबी नाहीत.तरीसुद्धा रेटून हे मुख्यमंत्री कुणबी मराठा मराठा कुणबी यांना क्षेत्र बंधन असताना सुद्धा फक्त विदर्भातील काही ओरिजनल कुणबी आहेत काही घुसखोर आहेत.मराठा,पाटील, देशमुख हे कुणबी नाहीत.तरीसुद्धा तेथेही घुसखोरी आहे.पश्चिम महाराष्ट्रातही अशी घुसखोरी आहे.
कोकणामधील कुणबी हा ओरिजनल कुणबी आहे.कुणबी हा आदिवासी सारखा राहतो,डोंगरात राहतो, त्याला पिण्यासाठी पाणी विहीर जमीनदार जागीरदार वतनदार यांच्या विहिरीवर जावं लागतं,कोकणामध्ये त्यांची सांगेल ते कामे करावी लागतात,त्यांच्या लग्नातील कामे कार्यक्रमातील कोणतंही काम शेतीचं काम त्याला अगोदर करावे लागतं आणि नंतर घरचं काम करावे लागतं.कोणत्याही कार्यक्रमांमध्ये कुणबी हे 96 कुळी मराठ्यांचे काम करतात परंतु त्यांना जेवण हे शेवटी दिलं जातं म्हणजे ज्यांचं सामाजिक मागासले पण आहेत ही तर कोणत्याही मराठ्याचे सामाजिक मागासले पण नाही. तरीसुद्धा रेटून हे महाराष्ट्र सरकार ओबीसी वर अन्याय करत आहे.
सरसकट मराठा कुणबी सर्टिफिकेट देत आहे. निजामातील नोंदी ह्या सर्व शेतकऱ्यांना कुणबी म्हटलेलं आहे त्यामुळे निजामाच्या नोंदी ह्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत अन्यथा गोंधळ वाढून जाईल.मग कुणबी व्यापारी,मारवाडी ब्राह्मण हे सुद्धा होतील मराठी सुद्धा होतील या देशांमध्ये कोणीही आरक्षणावर राहणार नाही.सर्व ओबीसी होतील याचा धोका ओळखा.क्षेत्रबंधन त्यामध्ये काही क्षेत्रांमध्ये कैकाडी समाज एससी मध्ये आहे काही क्षेत्रांमध्ये पारधी रामोशी समाज एसटी मध्ये आहे काही क्षेत्रांमध्ये कोळी समाज एसटी मध्ये आहे काही क्षेत्रांमध्ये खाटीक धनगर हा एस सी मध्ये आहे वडार समाज काही क्षेत्रात एस सी मध्ये आहे.जर असे त्यांचे सगळे सोयरे जर दिले तर मग एससी आणि एसटीचे सुद्धा आरक्षण धोक्यात येईल आणि देशांमध्ये एकच हाहाकार आणि काहूर माजेल, अराजकता आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल.यासाठी वेळीच सावध व्हा. मराठ्यांच्या दबावाखाली येऊन जर आरक्षण दिले तर लाखाचे मोर्चे लाखाचे आंदोलन वाया जाईल.एक शंकरराव लिंगेसारखा कोर्टात गेला तर यांचे आरक्षण एका दिवसात रद्द होईल.
वाशीसारखा गुलाल उधळलेला वाया गेला असे मराठा समाजाचे तरुणांना त्यांचे आयुष्य वाया घालवू नका.ते कधीही मागास नव्हते नाहीत आणि असणार नाहीत.त्यांच्यासाठी मोदी सरकारने इ डब्ल्यू एस आरक्षण दिलेले आहे.त्याबद्दल आपण अभ्यास करावा.ही नम्र विनंती.एक मराठा लाख मराठा जरी असला तरी ही एक ओबीसी शंकरावलिंगे लाखाला भारी ठरलेला आहे याची आठवण ठेवावी.कारण शंकरराव लिंगे सह लिंगे समर्थक व ओबीसी कार्यकर्त्यांनी जरांगे यांना मुंबईच्या वेशीवरच अडवलेला आहे.हे काम लिंगे यांनी याचिका टाकून केलेले आहे आणि यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हे काम केलेले आहे. .
त्यामुळे एक ओबीसी आणि एक मागासवर्गीय लाखाला भारी.सावध व्हा.अन्याय करू नका. आज पर्यंत सत्तेमध्ये आहात सत्ता उपभोगली आहे.60% मंत्रिमंडळ 60% आमदार हे आपलेच आहेत. कायमस्वरूपी सत्ता आपली आहे याचे भान ठेवा.सत्ताधारी जर आरक्षणाची भीक मागत असेल तर डोंबारी कैकाडी पारधी कोलाटी मारडी गाडीवाले नंदीवाले यांनी काय करायचं ?
ते सरकारने पहिल्यांदा सांगावं. यांच्याकडे अजिबात एक गुंठा सुद्धा जमीन त्यांच्या बापाचे नव्हती ना आज पण नाही.आपल्याकडे हजार एकर जमीन होती त्या जमिनीच काय झालं आम्हाला माहित नाही किंवा त्याचा हिशोब आम्हाला घ्यायचा नाही वेळीच सावध व्हा! मराठा समाजाच्या तरुणांना शिवाजी महाराज शिकायला पाहिजे परंतु हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून सर्वांना शिव्या देत आहेत शिव्या शिकवत आहेत नेता जर अशा शिव्या देत असेल तर त्याचा समाज हा शिव्या देण्यास शिकेलच आणि असेच व्हिडिओ अनेक मराठा समाजाच्या तरुणांनी काढलेले आहेत ते आपण बघावेत.मागची पिढी ही शिव्या देणारी आपली पिढी होईल.ती होऊ नये म्हणून माझी कळकळीची विनंती.
आपण शिवजयंतीच्या निमित्ताने आज पासून शिव्या न देता शिवाजी महाराज आपल्या तरुणांना शिकवलाच पाहिजे.आपली आई बहीण मावशी काकी सुद्धा हा व्हिडिओ पाहत आहेत.जरांगे यांचे व्हिडिओ किती अश्लील शिव्याने भरलेले आहेत ते कीती बेताल बोलत आहेत असले शिक्षण शिवाजी महाराजांनी कधी कुणाला दिल्याचे इतिहासात आढळत नाही.जरांगेने हा नवीन इतिहास तयार केला आहे.यामुळे मराठ्याची मान तात्पुरती उंच दिसत असली तर ती मराठा समाजाची उंची खूप कमी करत आहे यावर सर्व मराठा समाजातील तज्ज्ञांनी लेखकाने अभ्यासकाने जाणकाराने लक्ष द्यावे आणि त्यांना ताकीद द्यावी.शिव्या शाप दिल्याने आरक्षण मिळत नाही.आरक्षण कायद्याने मिळते.कायद्याचा अभ्यास करा.कायद्याची लढाई कायद्याने करा दादागिरी बंद करा
आणि शिवाजी महाराजांची जयंती आनंदाने साजरी करा.माननीय भुजबळ साहेब ओबीसीचे नेते ओबीसीचा ढाण्या वाघ ओबीसीचे दैवत यांना जर शिव्या देणारे गाणे डीजेवर वाजवले तर डीजे मालकाने सुद्धा याची दखल घ्यावी. होणाऱ्या नुकसानीस आपण जबाबदार रहाल याची काळजी घ्यावी.हा डीजे फोडल्याशिवाय राहणार नाही.तरुण आता पेटलेले आहेत ओबीसी जागा झालेला आहे पूर्वीचा ओबीसी राहिलेले नाही याचं भान ठेवा.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे यापुढे ओबीसी अन्याय सहन करणार नाही. जरांगे आणि जरांगेंच्या साथीदारांना समज द्यावी ही नम्र विनंती.
उद्या 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मराठा आरक्षणासाठी बोलवले आहे या अधिवेशनामध्ये जो आमदार जो मंत्री ओबीसीच्या विरुद्ध बोलेल त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय ओबीसी राहणार नाही.
येत्या 2024 च्या निवडणुकीमध्ये खासदारकी आमदारकी त्याची गेलीच म्हणून समजा जे ओबीसीचे आमदार मंत्री ओबीसी च्या बाजूने बोलणार नाहीत त्यांनाही घरी बसल्याशिवाय राहणार नाही याची दखल सर्व आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घ्यावी.जर महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे फालतू लाड बंद केले नाही तर अल्पावधीतच महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील ओबीसी समाज महाराष्ट्र राज्याचे नवे तर दिल्लीचेही सिंहासन उखडून फेकण्याची हिंमत ठेवून ते इतिहास जमा करून कचऱ्यात फेकल्याशिवाय राहणार नाही हा धोका ओळखून आपण ओबीसींचा विश्वासघात करू नये ही नम्र विनंती.*एक ओबीसी शंकरावलिंगे लाखाला भारी* जय ओबीसी!
शिवक्रांती टीव्ही संपादक..
सत्यशोधक शंकरराव लिंगे…
73 87 37 78 01



