क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे भव्य उद्घाटन!

नवीनh स्मारक उद्घाटन –
प्रेरणास्त्रोत फुले दाम्पत्याची प्रभासार! ✊
चाळीसगाव अंधशाळे जवळ, भडगाव रोड येथे २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता स्मारक लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
या स्मारकाची संकल्पना आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या विशेष पुढाकारातून साकार झाली.
स्मारकाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाला माननीय नामदार छगनराव भुजबळ, आमदार मंगेश चव्हाण व अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली.
हे स्मारक स्त्री शिक्षणाचे प्रतीक आहे. येथे महात्मा फुले (१० फूट), सावित्रीबाई फुले (९ फूट) आणि शाळेत जाणाऱ्या मुलीची मूर्ती (४ फूट) अशी भव्य शिल्पसृष्टी उभारण्यात आली असून, त्यांचे एकूण वजन सुमारे १८०० किलो आहे.
या स्मारकासाठी ₹५० लाख ६० हजार खर्च शिल्पनिर्मितीसाठी, तर ₹४१ लाख खर्च सुशोभीकरणासाठी करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी नेत्यांनी फुले दांपत्यांच्या कार्याचा गौरव करताना—
सामाजिक समतेसाठी केलेला संघर्ष
स्त्री शिक्षणाचा पाया घालण्याचे महान कार्य
ब्राह्मण्यवादाविरुद्ध लढा, पण ब्राह्मणांविरुद्ध नाही
सावित्रीबाईंचे प्लेगसाथीतील योगदान
हे मुद्दे अधोरेखित केले.
हे स्मारक फुले दांपत्याच्या विचारांचा तेजोमय वारसा जपणारे आहे.
समाजातील प्रत्येक घटकाने येथे भेट देऊन प्रेरणा घ्यावी, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
✊ नवीनh स्मारक उद्घाटन – प्रेरणास्त्रोत फुले दाम्पत्याची प्रभासार! ✊
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा









