केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत पुणे येथील अर्चित डोंगरे याने महाराष्ट्रात प्रथम व देशात तृतीय क्रमांक पटकावला, त्याबद्दल त्याचे विशेष अभिनंदन!

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत पुणे येथील अर्चित डोंगरे याने महाराष्ट्रात प्रथम व देशात तृतीय क्रमांक पटकावला, त्याबद्दल त्याचे विशेष अभिनंदन!
आपल्या नाशिकमधील पंचवटीतील ऐश्वर्या जाधव हिने ऑनलाईन क्लास आणि घरचा अभ्यास करून हे यश मिळवलं. तर सध्या आयपीएसचे प्रशिक्षण घेत असलेल्या गौरव कायंदे पाटील यांनी यंदा दुसऱ्यांदा यूपीएससीच्या यश मिळवलं आहे. श्रुती चव्हाण या विद्यार्थिनीने तर वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे.
सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील अक्षय पवार यांनी गुप्तचर विभागात कार्यरत असताना यूपीएससीची तयारी केली. दिंडोरी तालुक्यातील आंबेगावचे सुपुत्र राजू वाघ यांनी सीआरपीएफमध्ये कार्यरत असताना नक्षली भागात जोखमीची ड्युटी बजावत परीक्षेची तयारी करून यश मिळवले. तसेच हरियाणा प्रशासकीय सेवेत बीडीपीओ पदावर कार्यरत असलेल्या सिन्नर तालुक्यातील स्मिता कातकडे यांनी देखील घर, नोकरी सांभाळून या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले.
या सर्व यशस्वीतांचे मनापासून अभिनंदन! तसेच आगामी काळात आपापल्या पदाच्या माध्यमातून देशाची व देशवासीयांची उत्तम सेवा त्यांच्या हातून घडो, यासाठी मनापासून शुभेच्छा!
#UPSC #CivilServices #Exams #Inspiration #Nashik #Maharashtra

