सोलापूर

🔥 बुलढाण्यात अखिल भारतीय माळी महासंघाची दमदार संघटनात्मक मुसंडी! एकाच दिवशी तीन ग्रामशाखा अध्यक्षांची निवड; आता घराघरात फुले विचार आणि जातनिहाय जनगणनेची चळवळ पेटणार! 🔥

🔥 बुलढाण्यात अखिल भारतीय माळी महासंघाची दमदार संघटनात्मक मुसंडी! एकाच दिवशी तीन ग्रामशाखा अध्यक्षांची निवड; आता घराघरात फुले विचार आणि जातनिहाय जनगणनेची चळवळ पेटणार! 🔥

बुलढाणा जिल्ह्यात अखिल भारतीय माळी महासंघाने संघटन विस्ताराला वेग देत एकाच दिवशी तीन ग्रामशाखा अध्यक्षांची निवड करून मोठी संघटनात्मक ताकद उभी केली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी गाव, वाडी, वस्ती, तांडा आणि घराघरात जाऊन महात्मा ज्योतिराव फुले यांचे समता, शिक्षण, स्त्रीमुक्ती, सामाजिक न्याय आणि शेतकरीहिताचे विचार पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

नवनियुक्त अध्यक्षांनी स्पष्ट केले की, १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत “जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे” हा ठराव मंजूर करून केंद्र व राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल. जातनिहाय जनगणनेचे महत्त्व, त्याचे सामाजिक व आर्थिक परिणाम, तसेच ओबीसी समाजावरील अन्यायाची माहिती घराघरात पोहोचवून व्यापक जनजागृती केली जाईल.

यावेळी ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, हैदराबाद गॅझेट रद्द करणे, बोगस कुणबी-मराठा दाखले रद्द करणे, शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तीव्र लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला. राज्य सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

चळवळीच्या प्रमुख मागण्या :

1. जातनिहाय जनगणना तातडीने करावी.

2. ओबीसी आरक्षणाचे संपूर्ण संरक्षण करावे.

3. न्यायमूर्ती शुक्रे, शिंदे व भोसले समितीच्या शिफारशींचा पुनर्विचार करून निर्णय रद्द करावेत.

4. २००४ चा कुणबी-मराठा/मराठा-कुणबी शासन निर्णय रद्द करावा.

5. हैदराबाद गॅझेट व त्याआधारे दिलेले बोगस दाखले रद्द करावेत.

6. ओबीसी महामंडळांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा.

7. महाज्योती संस्थेला पुरेसा निधी व विभागीय कार्यालयांसाठी इमारती द्याव्यात.

8. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व शैक्षणिक योजना वेळेत लागू कराव्यात.

9. परीक्षा रद्द किंवा विलंबामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करावी.

10. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के नफा धरून हमीभाव द्यावा.

11. शेतीसाठी वीज, पाणी, बियाणे व खतांवर विशेष सवलती द्याव्यात.

12. शेतकऱ्यांना बिगरव्याजी कर्ज द्यावे.

13. अग्निवीर योजना रद्द करून नियमित सैन्यभरती सुरू करावी.

14. जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी.

15. सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा किमान ₹१०,००० भत्ता द्यावा.

16. केजी ते पीजीपर्यंत शिक्षण मोफत करावे.

17. सर्व नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध कराव्यात.

✍️ संपादकीय संदेश

अखिल भारतीय माळी महासंघाने संघटन विस्ताराबरोबरच सामाजिक न्याय, ओबीसी हक्क, शिक्षण, शेतकरी प्रश्न आणि जातनिहाय जनगणनेचा मुद्दा गावपातळीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. लोकशाही मार्गाने संघटित जनआंदोलन उभे करण्याची ही घोषणा पुढील काळात राज्याच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची ठरू शकते.

📲 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

मो.: 7387737801

👉 हा क्रमांक आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.

👍 बातमी लाईक करा

🔁 शेअर करा

📤 फॉरवर्ड करा

💬 कमेंट करा

🔔 चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका!

#दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #अखिलभारतीयमाळीमहासंघ #OBC #जातनिहायजनगणना #महात्माफुले #सामाजिकन्याय #शेतकरी #विद्यार्थी #बुलढाणा #महाराष्ट्र

:::

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button