🚨 विदर्भात अखिल भारतीय माळी महासंघाची मोठी संघटनात्मक ताकद! उच्चशिक्षित नेतृत्वाची दमदार एन्ट्री; OBC हक्क, जातनिहाय जनगणना आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या लढ्यास आता नवी दिशा! 🔥

🚨 विदर्भात अखिल भारतीय माळी महासंघाची मोठी संघटनात्मक ताकद! उच्चशिक्षित नेतृत्वाची दमदार एन्ट्री; OBC हक्क, जातनिहाय जनगणना आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या लढ्यास आता नवी दिशा! 🔥
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
अखिल भारतीय माळी महासंघाने विदर्भातील संघटनात्मक विस्ताराला नवे बळ देत दोन उच्चशिक्षित आणि सक्षम व्यक्तिमत्त्वांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. अॅड. राजेंद्रकुमार भास्करराव पल्हाडे (शेगाव, जि. बुलढाणा) यांची अमरावती विभाग उपाध्यक्ष तर निलेश गोरडे (अचलपूर, जि. अमरावती) यांची अमरावती विभागीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे, विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेशभाऊ हिरळकार, प्रदेशाध्यक्ष गौतमजी क्षिरसागर, विभागाध्यक्ष शरदभाऊ बनकर आणि अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
महासंघाने स्पष्ट केले आहे की, या दोन्ही उच्चविद्याविभूषित पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना प्रशिक्षण, विद्यार्थी, महिला व बेरोजगारांचे प्रश्न, OBC समाजाच्या प्रलंबित मागण्या, तसेच जातनिहाय जनगणनेबाबत तळागाळात जनजागृती यावर व्यापक अभियान राबविण्यात येणार आहे.
गावागावातील ग्रामपंचायतींनी “जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे” असा ठराव मंजूर करून केंद्र व राज्य सरकारकडे पाठवावा, तसेच प्रत्येक तालुक्यातून तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री आणि शासनाला निवेदने देण्याची चळवळ अधिक वेगाने उभी केली जाणार असल्याचे महासंघाने जाहीर केले आहे.
महासंघाच्या मते, सुशिक्षित नेतृत्वामुळे संघटनेची विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि जनाधार अधिक मजबूत होणार असून विदर्भात OBC हक्कांच्या लढ्याला नवी ऊर्जा मिळणार आहे.
या निवडीबद्दल महासंघाचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी, महिला आघाडी, विभागीय व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आह
🖊️ संपादकीय संदेश
संघटना तेव्हाच मजबूत होते जेव्हा तिच्या नेतृत्वात शिक्षण, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची तळमळ असते. विदर्भातील या नियुक्त्या केवळ पदवाटप नसून OBC समाजाच्या हक्कांसाठी, जातनिहाय जनगणनेसाठी आणि सुशिक्षित युवकांच्या सक्षमीकरणासाठी उभारल्या जाणाऱ्या व्यापक जनआंदोलनाची नवी सुरुवात आहे. आता प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक जिल्ह्यात OBC हक्कांची लढाई अधिक तीव्र करण्याची वेळ आली आहे.
📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📲 आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये 7387737801 हा नंबर जोडा.
👍 बातमी Like करा | ↗️ Share करा | ▶️ Subscribe करा | 📤 Forward करा | 💬 Comment करा | 🔔 Bell Icon दाबा | 📢 दिनबंधू न्यूज WhatsApp Channel आणि Group Follow करायला विसरू नका.
#Hashtags
#दिनबंधू_न्यूज #शिवक्रांतीटीव्ही #अखिलभारतीयमाळीमहासंघ #OBC #जातनिहाय_जनगणना #विदर्भ #माळीसमाज #शंकरराव_लिंगे #रमेशभाऊ_हिरळकार #राजेंद्रकुमार_पल्हाडे #निलेश_गोरडे #OBCJustice #SocialJustice #विद्यार्थी #बेरोजगार #महिलासक्षमीकरण





