🚨 शिक्षित शक्ती आता ओबीसी जनजागृतीच्या रणांगणात! अखिल भारतीय माळी महासंघाच्या शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी मा. मनीष भाऊदेवराव गिर्हे यांची सर्वानुमते निवड; विदर्भातून राज्यव्यापी जनआंदोलनाला मिळणार नवी दिशा

🚨 शिक्षित शक्ती आता ओबीसी जनजागृतीच्या रणांगणात! अखिल भारतीय माळी महासंघाच्या शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी मा. मनीष भाऊदेवराव गिर्हे यांची सर्वानुमते निवड; विदर्भातून राज्यव्यापी जनआंदोलनाला मिळणार नवी दिशा
अखिल भारतीय माळी महासंघाच्या शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी हिवरखेड (ता. तेल्हारा, जि. अकोला) येथील अभ्यासू, सामाजिक भान असलेले आणि शिक्षक चळवळीतील सक्रिय नेतृत्व मा. मनीष भाऊदेवराव गिर्हे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक, सुशिक्षित युवक आणि ओबीसी समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मा. गिर्हे यांनी यापूर्वी इंदिरा नागरी पतसंस्थेचे संचालक, अकोला जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच अखिल भारतीय माळी महासंघ शिक्षक आघाडीचे राज्य सचिव म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा आणि संघटन कौशल्याचा गौरव म्हणून ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली जातनिहाय जनगणनेचे महत्त्व गावागावांत पोहोचविणे, ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत जनजागृती करणे, अन्याय-अत्याचाराविरोधात संघटित लढा उभारणे, तालुका व जिल्हास्तरीय सभा, बैठका आणि मेळावे आयोजित करून समाज संघटन अधिक बळकट करण्याचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
ही निवड अखिल भारतीय माळी महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या विश्वासाने आणि सर्वानुमते करण्यात आली असून राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या निवडीबद्दल संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेशभाऊ हिरळकार, विश्वस्त गोविंदराव वैराळे, शिवशंकर काऊलकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा विश्वस्त आबासाहेब तोळकर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अभयजी तायडे, प्रदेशाध्यक्ष तथा विश्वस्त गौतमजी क्षिरसागर, प्रदेश चिटणीस कैलासजी जामगडे, प्रदेश संघटक जनाबापू मेहेत्रे, नागपूर विभागीय अध्यक्ष कैलासजी तानकर, नागपूर महानगर अध्यक्ष मधुसूदन देशमुख, अमरावती विभाग अध्यक्ष शरदजी बनकर तसेच बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय राजाभाऊ खरात यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
✍️ संपादकीय संदेश
शिक्षण, संघटन आणि सामाजिक जाणीव यांचा संगम झाला तर परिवर्तनाची नवी पहाट उगवते. शिक्षक समाज हा केवळ ज्ञानाचा वाहक नसून सामाजिक परिवर्तनाचा शिल्पकार आहे. मा. मनीष भाऊदेवराव गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजात वैचारिक जनजागृती, सामाजिक ऐक्य आणि घटनात्मक हक्कांसाठी अधिक प्रभावी चळवळ उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
📱 आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 7387737801 हा क्रमांक जोडा.
👍 बातमी लाईक करा • 📲 शेअर करा • 🔁 फॉरवर्ड करा • ▶️ सबस्क्राईब करा • 🔔 बेल आयकॉन दाबा
दिनबंधू न्यूज आणि शिवक्रांती टीव्हीचे व्हॉट्सअॅप चॅनल व ग्रुप फॉलो करून समाजहिताच्या बातम्या सर्वप्रथम मिळवा.





