सोलापूर

🚩 OBC समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारू – सत्यशोधक शंकरराव लिंगे 🚩

🚩 OBC समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारू – सत्यशोधक शंकरराव लिंगे 🚩

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

सोलापूर, दि. १२ जून २०२६ : महाराष्ट्रातील OBC समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी केले.

यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भंडारे, अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य पंचाप्पा धनशेट्टी, उपाध्यक्ष मारुती ढगे, बळीराम जाधव, कमल गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्तिके यांची भेट घेऊन मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यासाठी सविस्तर निवेदन सादर केले.

सोलापूर जिल्ह्यात प्रथमच अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्तिके यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर OBC समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महाराष्ट्रातील OBC समाज हा राज्यातील मोठा घटक असूनही त्याच्यावर सातत्याने अन्याय होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बोगस कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी दाखले वापरून OBC समाजाच्या राजकीय आरक्षणावर डल्ला मारण्यात आला आहे. त्यामुळे हजारो OBC उमेदवारांचे राजकीय नुकसान झाले आहे. आता हाच अन्याय शिक्षण आणि नोकरी क्षेत्रातही सुरू असून OBC समाजाच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आणली जात आहे.”

लिंगे यांनी शासनाला इशारा देताना सांगितले की, “OBC समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. OBC समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तात्काळ निर्णय घेऊन न्याय दिला गेला नाही तर राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा विचार करावा लागेल. शासनाने OBC समाजाच्या भावना आणि वास्तव परिस्थिती गांभीर्याने समजून घ्यावी.”

निवेदनातील प्रमुख मागण्या

१) जातनिहाय जनगणना करून OBC समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यात यावे.

२) न्यायमूर्ती शुक्रे, न्यायमूर्ती शिंदे व न्यायमूर्ती भोसले समिती यांच्या शिफारशींचा पुनर्विचार करून त्यासंदर्भातील सर्व निर्णयांची कायदेशीर तपासणी करण्यात यावी. त्यांनी केलेल्या शिफारशी रद्द कराव्यात.

३) सन २००४ मधील “कुणबी-मराठा / मराठा-कुणबी” संदर्भातील शासन निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा.

४) हैदराबाद गॅझेट रद्द करा. त्या आधारे दिलेले कुणबी-मराठा व मराठा-कुणबी दाखले बोगस ठरवून रद्द करण्यात यावेत.

५) OBC समाजाच्या सर्व महामंडळांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा.

६) महा ज्योती संस्थेला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देऊन विभागीय कार्यालयांसाठी जागा व इमारतीची साठी ठोस आर्थिक तरतूद करण्यात यावी.

७) OBC विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, फेलोशिप व इतर शैक्षणिक योजनांचा निधी वेळेवर वितरित करण्यात यावा.

८) परीक्षा रद्द होणे किंवा विलंब होणे यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन योग्य भरपाईची योजना तयार करण्यात यावी.

९) शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के नफा धरून हमीभाव देण्यात यावा.

१०) शेतीसाठी वीज, पाणी, खते व बियाणे यांबाबत विशेष सवलती देण्यात याव्यात.

११) शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करण्यात यावा.

१२) अग्निवीर योजना रद्द करून पूर्वीप्रमाणे नियमित सैन्य भरती सुरू करण्यात यावी.

१३) जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करून कर्मचाऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यात यावे.

१४) सुशिक्षित बेरोजगारांना किमान दरमहा १० हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात यावा.

१५) सर्वांना KG ते PG पर्यंत मोफत शिक्षण देण्यात यावे.

१६) सर्वांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

यावेळी जिल्हाधिकारी कार्तिके यांनी निवेदन स्वीकारून OBC समाजाच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी योग्य तो अहवाल तातडीने पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

आचारसंहिता लागू असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरणास परवानगी नसल्याने शिष्टमंडळाने प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले.

“OBC समाजाच्या हक्कांवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय न्यायासाठीचा हा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल.” – सत्यशोधक शंकरराव लिंगे

📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

📱 7387737801

👉 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👉 बातमी लाईक करा.
👉 शेअर करा.
👉 सबस्क्राईब करा.
👉 फॉरवर्ड करा.
👉 कॉमेंट करा.
👉 बेल आयकॉन दाबा, विसरू नका!

#DinbandhuNews #ShivkrantiTV #SatyashodhakShankarraoLinge #OBC #OBCReservation #CasteCensus #MaliMahasangh #Bahujan #SocialJustice #Solapur #Maharashtra #SaveOBCReservation #OBCMovement #PhuleShahuAmbedkar #BahujanEkta #OBCNews #JusticeForOBCs

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button