“फाजील खर्चाला फाटा… शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांचा बुलढाण्यात प्रेरणादायी जागर!”

“फाजील खर्चाला फाटा… शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांचा बुलढाण्यात प्रेरणादायी जागर!”
बुलढाणा : येथील आराध्या लॉन्स, चिखली रोड येथे चि. सौ. का. प्राची (B.E. Civil) व चि. शुभम (B.E. Mech.) यांचा शुभविवाह सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, मंगलमय आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या वातावरणात संपन्न झाला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक पद्धतीने संपन्न झालेल्या या विवाहाने बुलढाणा जिल्ह्यासह परिसरात एक नवा आदर्श निर्माण केला.
हा विवाह सत्यशोधक विधिकार भीमराव कोथिंबीरे यांनी महात्मा फुले लिखित पाच मंगलाष्टकांच्या माध्यमातून संपन्न केला. विवाह सोहळ्याच्या प्रारंभी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. यावेळी वधू-वरांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली तसेच माता-पित्यांचे दर्शन घेऊन दीपप्रज्वलन करत विवाह सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी समाजप्रबोधन करताना सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी आक्रमक शब्दांत समाजाला संदेश दिला की, “समाजाने विवाहामध्ये लाखो रुपयांचा दिखाऊ खर्च, डीजे, आडंबर आणि कर्जबाजारीपणा थांबवावा. अत्यंत साधेपणाने, काटकसरीने विवाह करून उरलेला पैसा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, शेती सुधारण्यासाठी, अनाथ-अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच शैक्षणिक संस्थांना दान करावा. आपली प्रगती आपणच करायची असेल तर शिक्षण, विज्ञान आणि सत्यशोधक विचार स्वीकारले पाहिजेत.”
या प्रसंगी तसत्यशोधक .शंकररावजी लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ, राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तथा संपादक दिन बंधू
मा.श्री.मृत्युंजयभाऊ गायकवाड .
मा.श्री.विठ्ठलराव तोडकर राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ
मा.श्री.गौतमजी क्षीरसागर प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ
मा.श्री.भीमरावजी कोथंबिरे विश्वस्त अखिल भारतीय माळी महासंघ तथा सत्यशोधक विधीकर्ते
मा.श्री.अभयभाऊ तायडे अखिल भारतीय माळी महासंघ
मा.श्री.अमर बोराटेविश्वस्त अखिल भारतीय माळी महासंघ
मा.श्री.विजय राजाभाऊ खरात
जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ
मा.सौ.वैशालीताई रवी जाधव /ठग शिक्षणाधिकारी
डॉक्टर आशिष खासबागे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
मा.श्री.सचिनभाऊ मगर शासकीय ठेकेदार देऊळगाव माळी
मा.श्री.अशोकराव मगर आदर्श शिक्षक
मा.श्री.स्वप्निल भाऊ गाभणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर तथा महात्मा ज्योतिबा फुले संस्था देऊळगाव माळी
मा.श्री.शरदजी नागरे अभियंता पाटबंधारे विभागसंघर्ष योद्धामा.प्रियंका विनायक मगर/ काळेआरटीओ ऑफिसर
मा.श्री.संतोष गोरेसचिव विवेकानंद आश्रम हिवरा आश्रम
मा.श्री.मनोहर गीऱ्हे सरपंचसरपंच हिवरा आश्रम
मा.श्री.डीगांबर जाधव विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकारी एसटी महामंडळ बुलढाणा
मा.श्री.आकाशजी देशमाने असिस्टंट डायरेक्टर सेल्स मेंडरीन ओरिएंटल हॉटेल ग्रुप कतार
मा.श्री.शरद भाऊ वानखेडे सचिव विठ्ठल रुक्मिणी शिक्षण प्रसारक मंडळ देऊळगाव माळी
मा.श्री.शैलेशजी काळे एस.डी.ओ.जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा
मा.श्री.प्रकाशसिंह राजपूत शासकीय ठेकेदार बुलढाणा
मा.श्री.बी.सी.चौधरीज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
डॉ.गजानन अजगरप्रदेश सदस्य अखिल भारतीय माळी महासंघ
डॉ.संजय कानकटाव जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सेल बुलढाणा
मा.श्री.सुभाषराव मगर माजी सरपंच देऊळगाव माळी
मा.श्री.सुखदेव संपतराव वाघमारे व सौ.प्रमिला सुखदेव वाघमारे
मा.श्री.रामदास संपतराव वाघमारे व सौ.रेखा रामदास वाघमारे
प्रोफेसर डॉक्टर सुभाषराव संपतराव वाघमारे व सौ. प्राजक्ता वाघमारे
मा.श्री.संजय प्रल्हादराव दांडगे व सौ.वैशाली संजय दांडगे
मा.श्री.प्रमोद बळीराम इंगळे व सौ.पूजा प्रमोद इंगळे
मा.श्री.शुभम एरमुले व सौ. कल्याणी येरमुले
मा.श्री.प्रबोधनकार शाहीर श्रीराम कोरडे
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण संवर्धकवनश्री जनाबापू मेहेत्रेचीफ मॅनेजिंग डायरेक्टर धरती बचाओ मिशन परिवारया सत्यशोधक विवाह सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचलन वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी केले यांच्यासह मान्यवरांचा सत्काररमेश रामभाऊ हिराळकर व सौ. आशा रमेश हिराळकर यांनी संविधानाची प्रत भेट देऊनप्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. संपूर्ण विवाह सोहळा साधेपणाने, सामाजिक बांधिलकी जपत आणि आनंदी वातावरणात पार पडला.
यावेळी वाघमारे परिवार, हिराळकर परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाह प्रसंगी उपस्थितांनी पारंपरिक तांदळाच्या अक्षदांऐवजी फुलांच्या अक्षदा टाकून वधू-वरांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात नवदांपत्याचे स्वागत करण्यात आले.
गरीब व मजूर कुटुंबातील या सुशिक्षित वधू-वरांनी शिक्षणाच्या जोरावर इंजिनिअर पदापर्यंत मजल मारत महात्मा फुले यांच्या शिक्षण, समता आणि विज्ञाननिष्ठ विचारांची कास धरल्याचे या विवाहातून स्पष्ट दिसून आले. सत्यशोधक पद्धतीने विवाह करून समाजातील अनाठायी खर्च, अंधश्रद्धा आणि दिखाऊपणाला फाटा देत सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीला बळकटी देणारा हा विवाह बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
🔥 समाज जागा होतोय… सत्यशोधक विचारांचा विजय होत आहे! 🔥
बुलढाणा येथे सुशिक्षित इंजिनिअर जोडप्याचा सत्यशोधक पद्धतीने साधेपणात विवाह संपन्न…
ना दिखावा… ना लाखोंचा खर्च…
महात्मा फुले यांच्या विचारांनी प्रेरित होत शिक्षण, समता आणि विज्ञाननिष्ठेचा संदेश देणारा आदर्श विवाह! ✊🌺
सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचा समाजाला थेट संदेश :
“विवाहात फाजील खर्च करू नका…
उरलेला पैसा मुलांच्या शिक्षणासाठी, शेतीसाठी, अनाथ-अपंग विद्यार्थ्यांसाठी खर्च करा…
आपली प्रगती आपणच घडवा!”
📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387377801
हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
बातमी Like 👍 Share ↗️ Subscribe 🔔 Forward 📲 Comment ✍️ करा.
दीनबंधू न्यूज WhatsApp ग्रुप व Channel Follow करायला विसरू नका.
#सत्यशोधकविवाह
#महात्माफुले
#सावित्रीबाईफुले
#शिक्षणहाचखराधर्म
#समताविवाह
#फाजीलखर्चबंदकरा
#विज्ञाननिष्ठसमाज
#सत्यशोधकचळवळ
#बुलढाणा
#दिनबंधून्यूज
#शिवक्रांतीटीव्ही
#शंकररावलिंगे
#समाजप्रबोधन








