महाराष्ट्र

“असे पुनर्विवाह ही काळाची गरज” सत्यशोधक शंकरराव लिंगे

“असे पुनर्विवाह ही काळाची गरज” सत्यशोधक शंकरराव लिंगे

टेंभुर्णी येथे सामाजिक आदर्श निर्माण करणारा शुभविवाह सोहळा उत्साहात संपन्न

टेंभुर्णी येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे चि. अनंत रामलिंग शिर्के (रा. वांगी बु., ता. भूम, जि. धाराशिव) व चि. सौ. का. धनश्री सावता माळी (जाधव) (रा. ता. आटपाडी, जि. सांगली) यांचा शुभविवाह सोहळा अत्यंत साधेपणाने, मंगलमय आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.

वर चि. अनंत हे कै. सुखदेव भागोजी शिर्के यांचे नातू व कै. रामलिंग सुखदेव शिर्के यांचे सुपुत्र आहेत. तर वधू चि. सौ. का. धनश्री या कै. मनोहर रामचंद्र माळी (जाधव) यांची नात व श्री. सावता मनोहर माळी (जाधव) आटपाडी यांची सुकन्या आहेत.

या प्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे व सौ. सुनंदा शंकरराव लिंगे यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. “आपले वैवाहिक जीवन सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याने भरलेले जावो,” अशा सदिच्छा व्यक्त करून त्यांनी वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे वधू या दोन मुली असलेल्या विधवा होत्या, तर वर हे घटस्फोटित असून उच्चशिक्षित एम.ए., बी.एड. शिक्षण घेतलेले आहेत. ते टेंभुर्णी येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये इंग्लिश हायस्कूल शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जात दोघांनीही पुनर्विवाहाचा स्वीकार करून समाजासमोर सकारात्मक, पुरोगामी आणि मानवतावादी विचारांचा आदर्श ठेवला आहे.

समाजात अजूनही पुनर्विवाहाबाबत अनेक गैरसमज आणि संकुचित विचार पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत सुशिक्षित वधू-वरांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत स्तुत्य, प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. विशेषतः दोन मुली असलेल्या विधवा महिलेला सन्मानाने नवजीवन देण्याचा हा निर्णय समाजासाठी एक सकारात्मक संदेश देणारा ठरला.

“असे विवाह ही काळाची गरज”

महात्मा ज्योतिराव फुले यांनी इ.स. १८७३ पासून सत्यशोधक विचारांच्या माध्यमातून विधवा पुनर्विवाह, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक न्याय यांची चळवळ उभी केली. त्यांनी समाजातील अन्यायकारक रूढी-परंपरांना छेद देत पुनर्विवाहास सामाजिक मान्यता मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक कार्य केले. आज टेंभुर्णी येथे संपन्न झालेला हा पुनर्विवाह त्या महान सत्यशोधक विचारांचा जिवंत वारसा असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आजच्या आधुनिक काळात पुनर्विवाह हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून सामाजिक परिवर्तनाचा महत्त्वपूर्ण भाग ठरत आहे. आयुष्यातील दुःखद प्रसंगानंतर नव्याने संसार उभा करण्याचे धैर्य दाखविणाऱ्या व्यक्तींना समाजाने पाठबळ देणे आवश्यक आहे. विशेषतः सुशिक्षित वर्गाने पुढाकार घेत अशा सकारात्मक विचारांना चालना देणे ही काळाची खरी गरज आहे.

हा विवाह कोणताही दिखावा, आडंबर किंवा अनावश्यक खर्च न करता अत्यंत साधेपणाने आणि आनंदी वातावरणात पार पडला. उपस्थित सर्वांनी नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या निर्णयाचे मनापासून स्वागत केले.

या विवाह सोहळ्यास आटपाडी, बार्शी, सोलापूर, टेंभुर्णी तसेच परिसरातील पंचक्रोशीतील पाहुणेमंडळी, मित्रपरिवार, नातेवाईक व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मंगल शुभेच्छा व्यक्त केल्या।

📢 सोशल मीडिया सूचना

📰 दीनबंधू न्यूज | शिवक्रांती ठेवी
✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 संपर्क : 7387377801

👉 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👉 बातमी Like • Share • Subscribe • Forward • Comment करा.
🔔 बेल आयकॉन दाबा.
📢 दीनबंधू न्यूज WhatsApp Channel Follow करायला विसरू नका.

#दीनबंधू_न्यूज
#शिवक्रांती_ठेवी
#सत्यशोधक
#पुनर्विवाह
#महात्मा_फुले
#सामाजिक_संदेश
#टेंभुर्णी
#शुभविवाह
#पुरोगामी_विचार
#समाजप्रबोधन
#सत्यशोधक_शंकरराव_लिंगे

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button