🌼 महात्मा फुले गौरव वर्ष : सामाजिक न्यायाच्या नव्या युगाची सुरुवात ! 🌼

महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती गौरव वर्षा निमित्त केलेला व्यापक कृती आराखडा हा सामाजिक न्याय, शिक्षण, कौशल्य विकास आणि समतेच्या विचारांना बळ देणारा ऐतिहासिक निर्णय ठरत आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत आणि कौतुक होत आहे.
🌼 महात्मा फुले गौरव वर्ष : सामाजिक न्यायाच्या नव्या युगाची सुरुवात ! 🌼
महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ या कालावधीत विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कौशल्य विकास उपक्रम राबविण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे.
इतर मागास बहुजन कल्याण मंत्री मा. अतुल सावे यांनी मंत्रालयात घेतलेल्या आढावा बैठकीत या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्ररथ प्रजासत्ताक दिन संचलनात सादर करणे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगाराभिमुख टूलकिट योजना, तसेच महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे मोफत वितरण हे उपक्रम सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
हा निर्णय महात्मा फुले यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांशी पूर्णतः सुसंगत आहे. महाराष्ट्र शासनातील सर्व मंत्रालयांनी अशाच प्रकारचे शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार युवक, महिला सबलीकरण आणि सामाजिक न्यायाशी संबंधित भरीव कार्यक्रम राबवावेत, अशी महाराष्ट्रासह देशातील फुलेप्रेमींची मागणी आहे.
✍️ असे ठाम मत
दिनबंधू न्यूज संपादक
सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी व्यक्त केले आहे.
📢 सोशल मीडिया सूचना 📢
📱 73 87 37 78 01
हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी LIKE करा
📲 SHARE करा
🔔 SUBSCRIBE करा
📤 FORWARD करा
💬 COMMENT करा
🔔 बेल आयकॉन दाबा
📰 दिनबंधू न्यूज WhatsApp ग्रुपला FOLLOW करा
🌺 महात्मा फुले गौरव वर्ष — समतेचा, शिक्षणाचा आणि सामाजिक न्यायाचा विजय असो ! 🌺
#महात्माफुले
#फुलेद्विशताब्दी
#महात्माफुलेगौरववर्ष
#सावित्रीबाईफुले
#सामाजिकन्याय
#OBCविकास
#AtulSave
#महाराष्ट्रशासन
#दिनबंधून्यूज
#शिवक्रांतीटीव्ही
#सत्यशोधकशंकररावलिंगे
#शिक्षण
#समता
#महिलासबलीकरण
#रोजगार
#शेतकरी
#बहुजनविकास




