🌟 प्रेरणादायी आदर्श 🌟

🌟 प्रेरणादायी आदर्श 🌟
📍 एनकूळ, तालुका खटाव | 🗓️ 26 एप्रिल 2026
एनकूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अत्याधुनिक डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे साहेब यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत आधुनिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे मा. अध्यक्ष व पुणे जिल्हा (दक्षिण) भाजपा प्रभारी मा. श्री. सदाभाऊ खाडे यांच्या ब्रह्मचैतन्य फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून १५ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून, त्या माध्यमातून डिजिटल क्लासरूमचे काम पूर्ण झाले आहे. तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी १५ लाखांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली.
या डिजिटल वर्गखोलीमुळे विद्यार्थ्यांना स्मार्ट क्लासरूम, संगणकीय सुविधा, एलईडी स्क्रीन बोर्ड यांसारख्या आधुनिक साधनांचा लाभ मिळणार असून शिक्षण अधिक आकर्षक, सुलभ व गुणवत्तापूर्ण होणार आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळत असून उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी होत आहे.
या कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रियाताई महेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, युवानेते विशाल बागल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजयशेठ शितोळे, पंचायत समिती सभापती वनिता दुबळे, विविध मान्यवर, शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📢 मीडिया सूचना – दिनबंधू शिवक्रांती टीव्ही
संपादक: सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01
👉 आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये हा नंबर जरूर जोडा
👍 बातमी लाईक करा | 🔁 शेअर करा | 📲 सबस्क्राईब करा
📤 फॉरवर्ड करा | 💬 कॉमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबा
📸 आपल्या परिसरातील सत्य बातम्या, फोटो व व्हिडिओ आम्हाला पाठवा – विसरू नका
#प्रेरणादायीआदर्श #DigitalClassroom #ग्रामीणशिक्षण #शिक्षणक्रांती #Satara #Khatav #एनकूळ #CSRInitiative #SmartEducation #BJP #Maharashtra #EducationForAll #DigitalIndia 📚✨






