🎉 अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीत ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ सोहळा उत्साहात संपन्न! 🎉

🎉 अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीत ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ सोहळा उत्साहात संपन्न! 🎉
📍 SNDT Women’s University, Mumbai : सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा
सोहळ्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय Chhagan Bhujbal साहेब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil, अप्पर मुख्य सचिव Venugopal Reddy, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक Dr. Shailendra Deolankar, एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलगुरू Dr. Ujwala Chakradev, University of Mumbai चे कुलगुरू Dr. Ravindra Kulkarni, सहसंचालक Dr. Archana Borhade आणि Dr. Vilas Nandvadekar यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ, मुंबई येथे आयोजित ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ वितरण सोहळा माननीय नामदार Chhagan Bhujbal साहेब यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना या कार्यक्रमात एक लाख रुपये व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्त सर्व सन्मानार्थींचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या भविष्यातील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. हा पुरस्कार म्हणजे शासनाची प्रेरणादायी शाबासकी असून, अधिक जोमाने कार्य करण्यासाठी नवी ऊर्जा देणारा आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.
महात्मा Jyotirao Phule आणि क्रांतीज्योती Savitribai Phule हे सामाजिक क्रांतीचे खरे अग्रदूत होते. सावित्रीबाई फुले यांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी अविरत कार्य केले. प्लेगसारख्या कठीण काळात गरिबांची सेवा करताना त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली; त्यांचा हा महान त्याग सदैव प्रेरणादायी आहे.
ज्या देशातील महिला शिक्षित असतात, तो देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जातो; मात्र ज्या समाजात महिला शिक्षणापासून वंचित राहतात, तो समाज मागासलेला राहतो. त्यामुळे सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेणे ही काळाची गरज आहे. शिक्षित महिलांनी निर्भयपणे पुढे येत समाजाच्या विकासात आणि सेवाकार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
तसेच, पंतप्रधान Narendra Modi यांनी भूमिपूजन केलेल्या पुण्यातील Bhide Wada येथील राष्ट्रीय स्मारकाचे काम वेगाने सुरू असून, ११ एप्रिलपासून महात्मा फुले यांचे द्विशताब्दी जन्मवर्ष सुरू होत असल्याचा अभिमान यावेळी व्यक्त करण्यात आला.
—
📢 दिनबंधू न्यूज (Dinbandhu News) | शिवक्रांती टीव्ही (Shivkranti TV)
✍️ संपादक: सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 73 87 37 78 01
👉 हा क्रमांक आपल्या सामाजिक माध्यम गटात (Social Media Group) जोडा
👍 बातमी पसंत (Like) करा | 🔄 शेअर (Share) करा | ▶️ सदस्यत्व घ्या (Subscribe)
📢 पुढे पाठवा (Forward) | 💬 अभिप्राय द्या (Comment) | 🔔 घंटा चिन्ह (Bell Icon) दाबायला विसरू नका
—
🔥 हॅशटॅग:
#सावित्रीबाईफुले #छगनभुजबळ #एसएनडीटीविद्यापीठ #महिलासक्षमीकरण #शिक्षणहक्क #फुलेविचार #मुंबईकार्यक्रम #सामाजिककार्य #शिवक्रांतीटीव्ही #दिनबंधून्यूज


















