सोलापूर

सोलापुरात हैदराबाद गॅझेट फाडून बहुजनएकीकरण सभेत ठराव मंजूर; ओबीसी आरक्षणासाठी हाक, मराठ्यांना खोटी कुणबी दाखलेधारकांना मतदान न देण्याचा निर्धार

  • . दिनबंधू न्यूज | संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

सोलापुरात हैदराबाद गॅझेट फाडून बहुजनएकीकरण सभेत ठराव मंजूर; ओबीसी आरक्षणासाठी हाक, मराठ्यांना खोटी कुणबी दाखलेधारकांना मतदान न देण्याचा निर्धार

सोलापुर जिल्ह्यातील पाटकुळ येथे प्रा. लक्ष्मण हाके, ओबीसी आरक्षण योद्धा आणि ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या नेतृत्वाखाली भव्य बहुजनएकीकरण सभा संपन्न झाली. हैदराबाद गॅझेटचा जीआर फाडून, त्याला पायदळी तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला.
सभेत आरक्षणवाल्यांनी आरक्षणवाल्यांनाच मतदान करावे, जीआर रद्द करण्याची मागणी करावी, तसेच मराठा समाजाला खोटी कुणबी दाखले घेणाऱ्यांना मतदान न करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे आत्महत्या केलेल्या शहीद तरुण भारत कराड, लातूर रेनापूर; गोरख देवळकर, बीड; माणिकराव डोळेफोडे, धाराशिव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समता परिषदेचे नेते अनिल अभंगराव यांच्या निधनाबद्दलही शोक व्यक्त करण्यात आला.

प्रमुख मान्यवर मंचावर

प्रमुख पाहुण्यांमध्ये प्रा. लक्ष्मण हाके सर, ओबीसी आरक्षण योद्धा; ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे; ज्येष्ठ नेते आरक्षण योद्धा माऊली हळणार; काळूराम चौधरी, ओबीसी योद्धा बारामती; शंकरराव वाघमारे, भाजप नेते; बापूसाहेब भंडारे, समता परिषद जिल्हा अध्यक्ष; बाळासाहेब वसेकर, चेअरमन; गणेश नामदे, उपसरपंच पाटकुळ; भिमराव वसकर, टाकळी शिकंदर; शिंदे विकास वसेकर; नितीन युवराज वसेकर; नितीन दादासाहेब वसेकर; कालिदास वसेकर; भैय्या सलगर; बालाजी राऊत; सागर नामदे; यश घोडके; निलेश घोडके; सचिन गावडे; समाधान काटे; सतीश रासेराव; गणेश नामदे; अतुल शिंदे; चांगदेव गावडे; सज्जन लोंढे; अभिजित लोखंडे; रवि माळी; यशवंत नामदे; वैभव ननवरे; सचिन पवार; महेश वसेकर; बापु धोत्रे; किरण हाके; भैय्या लोंढे; पंकज वसेकर; दिपक माने; तेजस चव्हाण; काळे भाऊसाहेब; दिलीप काळे; अरविंद काळे; पवार रावसाहेब; नंदकुमार वसेकर सर; आनंदा बापु वसेकर; राहुल वसेकर; नितीन गावडे; संतोष गावडे; अजित काटे; सुनिल परदेशी; सचिन नामदे; ज्योतीराम काटे; सुनिल सुतार; सुहास परदेशी; लक्ष्मण भिसे; बंडु वाघमोडे; चेतन लोंढे; दिपक गावडे; मंगेश काटकर; भारत पांढरे; माऊली राऊत; अमोल वसेकर; दिपक भंडारे; गुरुदेव वलेकर; अरविंद वाघमोडे; अबा शिंदे; बिरूदेव शिंगाडे; भीमराव वसेकर; अण्णा कांबळे; रामचंद्र काटे; अंकुश काटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी हजेरी लावली. गजी ढोल-ताशा, हलगी, फटाक्यांची आतषबाजी, आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते. बंदोबस्तासाठी 200 पोलिसांचा पथक तैनात करण्यात आला. सभा शांततेत यशस्वीरीत्या पार पडली.

संपर्क : 7387737801
आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सामील व्हा
बातमी व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉरवर्ड आणि कमेंट करा
बेल आयकॉन दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button