वास्तविक ही आमच्या समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे.

वास्तविक ही आमच्या समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे.
एकतर बऱ्याच कालावधीनंतर प्रथमच ओबीसी आंदोलनात आपला नाभिक समाज आणि आपल्या समाजा बाबत विषय यावर चर्चा, वाद,विवाद होताना दिसत आहे.अन्यथा आजवर ओबीसी प्रवर्गात असून देखील आम्ही कुठेच दिसत नव्हतो.आजवरच्या प्रत्येक ओबीसी आंदोलनात सहभागी होऊन देखील आमची केवळ फरफट होत होती.आमच्या प्रश्नांना कधीही वाचा फोडली गेली नाही,अथवा आमच्या मागण्यांचा कधी साधा विचारही केला गेला नाही.
आणि याचाच परिणाम की काय पण, ओबीसी प्रवर्गाला मिळणाऱ्या शासकीय सवलती,योजना कधी आमच्या पर्यंत पोहचल्याच नाहीत.
परंतु बांधवांनो,
सध्याची परिस्थिती वेगळी आहे.कधी नव्हे असे कणखर आणि दमदार ओबीसी नेतृत्व आज भुजबळ साहेबांच्या रूपाने ओबीसी प्रवर्गाला मिळाले आहे.सरकार मधे मंत्री असून देखील मंत्री पदाची पर्वा न करता सकल ओबीसी समाजासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत.
आमच्या नाभिक समाजासाठी तर अभिमानाची गोष्ट म्हणजे प्रथमच ओबीसी आंदोलनातील प्रत्येक सभेत आणि पत्रकार परिषदेत भुजबळ साहेब नाभिक समाजाचा विषय घेत आहेत.आजवर कोणत्याही ओबीसी आंदोलनात कोणत्याही ओबीसी नेत्याने आपल्या समाजाचा विषय अशा प्रकारे कधीच घेतला नव्हता.परिणामी प्रत्येकवेळी आमचे समाज नेतृत्व हतबल ठरत होते.
बांधवांनो,आज राज्यभर मराठा आरक्षणा सोबतच आमचे ओबीसी आंदोलन देखील गाजत आहे आणि त्यात प्रामुख्याने भुजबळ साहेब आपल्या समाजाचाच मुद्दा घेत आहेत.आमच्यासाठी ही खरोखर खुप अभिमानाची बाब आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नाभिक नेतृत्व म्हणून सन्माननीय कल्याण दळे साहेब देखील भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन पूर्ण ताकदीनिशी या आंदोलनात उतरले आहेत.
वास्तविक पाहता हा सकल नाभिक समाजाचा विषय आहे.या आंदोलनात महामंडळाच्या सर्वच गटांसह समाजातील सर्वच संघटनांनी या आंदोलनात सहभागी व्हायला हवे.भुजबळ साहेबांच्या रूपाने कुणीतरी नेता आमच्या समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडत आहे,मग आम्ही का मागे राहावे??
एकतर असेही आमच्या अलग अलग गटबाजीमुळे आमचे सामाजिक ऐक्य निर्माण होत नाही,परिणामी सरकार दरबारी आमची कुणीही दाखल घेत नाही.
आज बऱ्याच वर्षानंतर ओबीसी समाजाला दमदार नेतृत्व मिळाले आहे.अशातच दळे साहेबांच्या सहभागामुळे आपल्या नाभिक समाजाचे विषय प्रामुख्याने आंदोलनात घेतले जात आहे.
आमच्यासाठी ही खुप महत्वाची बाब आहे.
आम्ही आता वेळेचे गांभीर्य ओळखले पाहिजे.ही अशी वेळ पुन्हा येणार नाही. मीडियात देखील आज भुजबळ साहेबांमुळे आमच्या सामाजिक विषयाबाबत चर्चा सुरू आहे.
हीच वेळ आहे आमची सामाजिक अस्मिता वाढविण्याची…
बांधवांनो,राज्यातील प्रस्थापित मराठी समाजाला भुजबळ साहेब ओबीसी लढ्याच्या माध्यमातून मुंहतोड जवाब देत आहेत.
मुळात ओबीसी आंदोलन हे मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात नाहीच,
पण ओबीसी आरक्षणात त्यांना सहभागी करू नका ही मात्र आमची प्रमुख मागणी आहे.
बांधवांनो,आमच्या हिस्स्याचे आरक्षण त्यांना दिल्यास आमची अवस्था अतिशय कठीण होणार आहे.सध्याचआमच्या हाती काहीही लागत नाही,अशातच जर हा प्रस्थापित मराठा समाज यात आल्याने परस्थिती अधिकच बिकट होणार आहे.
म्हणूनच आता आम्हाला पूर्ण ताकदीनिशी या आंदोलनात उतरावे लागणार आहे. आमच्यातील सर्व गैरसमज,हेवेदावे बाजूला ठेवून आमच्या सामाजिक अस्मितेसाठी भुजबळ साहेबांना पाठिंबा देऊन सक्रियपणे या आंदोलनात सहभागी व्हावेच लागणार आहे.
हीच तर खरी काळाची गरज आहे.
बांधवांनो,एक लक्षात असूद्यात,आमच्या समाजासाठी ही नामी संधी आहे.आत्ता नाही तर भविष्यात पुन्हा कधीच नाही…!!.
*उठ,उठ नाभिका जागा हो,*
*तुझ्या ओबीसी आंदोलनाचा धागा हो…!!*
…आज आपल्या समाजातील बऱ्याच संघटना जाहीरपणे समाजहितासाठी पाठिंबा देत आहेत.त्यांचा हा निर्णय स्वागतार्ह असून इतर संघटनांनी आणि समाज कार्यकर्त्यांनी देखील यातून प्रेरणा घेऊन सक्रियपणे या आंदोलनात उतरावे हीच अपेक्षा…
🙏🙏
आपलाच,
संजय पंडित


