सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 65

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
65
गुंड श्यामराव यादवराव (जन्म सुमारे १८८५ मृत्यू १९४८)
डॉ. पंजाबराव देशमुखांचे एकनिष्ठ सहकारी, अनुयायी, इतिहासाचे गाढे अभ्यासक, महाराष्ट्र केसरी पत्राचे आद्य संपादक, सत्यशोधक श्यामराव यादवराव गुंड यांचा जन्म मोशीं, जिल्हा अमरावती येथे सुमारे १८८५ साली झाला. अमरावती हायस्कूलमधून गुंड मॅट्रिक झाले. पुढे अभियांत्रिकी विद्याशाखेचा अभ्यास करून ते ओव्हरसियर पदापर्यंत चढले. समाजसेवेच्या तळमळीतून त्यांनी ओव्हरसियरच्या नोकरीचा राजीनामा दिला. थोडक्यात, सरकारी नोकरीचा त्याग करून श्यामराव गुंड सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीत सहभागी झाले.
इ. स. १९२०च्या सुमारास त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मोर्शी बसस्थानकाजवळील जरूडकर विनायकराव आनंदराव देशमुख यांच्या वाड्यात ‘श्री शिवाजी मराठा बोर्डिंग’ची स्थापना केली. शंभर विद्यार्थी असलेल्या या वसतिगृहात मोशींचे अॅड. नारायणराव अमृतकरांसारखे सत्यशोधक भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असत. सत्यशोधक वीर उत्तमराव मोहिते, शंकरराव इंगोले, अॅड. बेलसरे, अॅड. अकर्ते आदी सत्यशोधकांना श्यामरावांनी येथेच मार्गदर्शन केले. थोडक्यात, मोर्शी येथील कर्मभूमीत वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये श्यामरावांनी सत्यशोधक ब्राह्मणेतर तत्त्वज्ञान रुजविले. विदर्भातील सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळ सतत खळखळत ठेवण्यात श्यामराव गुंड यांचे मोठे योगदान राहिले.
१९२३ सालच्या जानेवारी महिन्यात मोर्शी येथे ना. भास्करराव जाधवांच्या अध्यक्षतेखाली विदर्भातील पहिली ब्राह्मणेतर प्रांतिक परिषद भरली. ही परिषद यशस्वी करण्यासाठी श्यामराव गुंड यांनी अथक परिश्रम घेतले. इ. स. १९२४ मध्ये श्यामराव गुंड यांनी मोर्शी येथे श्रावणीचा जाहीर कार्यक्रम घेऊन महार- मांगांच्या मुलांना जानवे घातले. इ. स. १९२७ साली डॉ. पंजाबराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथील अंबादेवी संस्थानमध्ये अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहात श्यामराव अग्रभागी होते. याच साली हिंदू महासभेचे अधिवेशन मोशीला लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली भरले. डॉ. पंजाबराव देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तुत अधिवेशन सत्यशोधकांनी उधळून लावून दुसऱ्या दिवशी शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये लाला लजपतरायांना सत्यशोधकांनी एका जाहीर कार्यक्रमात मानपत्र बहाल केले. याही कार्यक्रमात श्यामराव गुंड अग्रेसर होते. ‘भगवा झेंडा’ चित्रपट विरोधी आंदोलनात त्यांनी चित्रपट पाहून आंदोलकांना टिपणे घेऊन मार्गदर्शन केले.
श्यामराव गुंडांनी उतारवयात ‘महाराणी जिजाबाई’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांचे संबंध’ असे सत्यशोधकी पठडीतील दोन ग्रंथ लिहून पूर्ण केले होते. दरम्यान, १९४८ साली श्यामराव गुंड यांची प्रकृती बिघडली. त्यांना नागपूरच्या दवाखान्यात भरती करण्यात आले. दवाखान्यात भरती होण्याअगोदर गुंड यांनी हे दोन्ही ग्रंथ प्रेसमध्ये छापण्यासाठी दिले होते. श्यामराव गुंड यांच्या आणि सत्यशोधक चळवळीच्या दुर्दैवाने एका सनातनी विचाराच्या गृहस्थाने हे दोन्ही ग्रंथ प्रेसमधून गहाळ केले. श्यामराव गुंड यांच्या निधनानंतर म. फुले चरित्रकार पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी या गहाळ हस्तलिखितांचा कसून शोध घेतला, मात्र हाती काहीच लागले नाही. असो.
विदर्भात अत्यंत निर्लेप वृत्तीने सत्यशोधक चळवळीचे कार्य करणाऱ्या या त्यागी सत्यशोधकाचे १९४८ साली नागपूर मुक्कामी निधन झाले.
संदर्भ – १. जागतिक कृषक क्रांतीचा विधाता लोकनेता डॉ. पंजाबराव देशमुख – वीर उत्तमराव मोहिते, २. विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य – डॉ. अशोक चोपडे
गुजरवैद्य
बी. एम.
(सुमारे १८९५ – १३-१०-१९१७)
बी. एम. गुजरवैध हे मौजे सिरसगाव, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती येथील सत्यशोधक असून, त्यांचा जन्म सुमारे १८९५ साली झाला. ते शिक्षित लेखक, विचारवंत सत्यशोधक होते. सत्यशोधक पत्र ‘दीनमित्र’, ‘सत्योदय’,
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




