सोशल

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.138

नावावर असून इतर सत्यशोधक लेखनही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्यशोधक अॅड. नानासाहेब अमृतकर (मोर्शी) आणि पंढरीनाथ पाटील (बुलडाणा), आनंदस्वामी आदींचे डवरे यांच्याकडे येणे-जाणे होते.

अकोला येथे भरलेल्या सत्यशोधक समाजाच्च्या आठव्या अधिवेशनाला (१९१८) आणि अमरावती येथील (१९२५) च्या अधिवेशनाला ते उपस्थित असावेत. तसेच १९१८ सालच्या खामगाव येथील मराठा शिक्षण संस्थेच्या परिषदेलाही त्यांची उपस्थिती असावी. सत्यशोधक समाजाचे उपदेशक शाहीर भीमराव महामुनी यांचा जलशाचा खेळ (भीमपुराण) १ जानेवारी १९०५ रोजी बेलोरा येथे घेण्यात आला होता. सत्यशोधक समाज बेलोरा शाखेच्या वतीने शाहीर महामुनी प्रशस्तीपत्रही देण्यात आले. या पत्रावर बेलोरा सत्यशोधक शाखेचे सचिव म्हणून राजाराम डवरे यांचा नामोल्लेख आहे. अशा या निधड्या छातीच्या सत्यशोधकाचे इ. स.

१९३३ च्या दरम्यान बेलोरा येथे निधन झाले. संदर्भ- १. विद्याप्रकाश – भीमराव महामुनी, २. पूजापद्धती भाग – २-शास्त्री

महाधट, शास्त्री डुंबरे, ३. नागपूर, मुंबई, मद्रास, कलकत्ता हायकोर्ट ठराव- संपादक – मो. तु. वानखडे, ४. अॅड. नानासाहेब शंकरराव डवरे, अमरावती यांची मुलाखत – जून २०१०

डाके

भिकाजी बाबाजी

(मृत्यू – १९४२)

। सत्यशोधक भिकाजी बाबाजी डाके हे मौजे शेवगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथील फुलेतर कालखंडातील एक कडवे सत्यशोधक होत. ‘दीनमित्र’ कार मुकुंदराव पाटील यांचे स्नेही असलेले डाके यांचे ‘मराठी मुलांची शाळा, शेवगाव’ येथे पाचवीपर्यंत शिक्षण झाले. भिकाजी डाके यांना २८ एकर शेती होती, मारुती, विष्णु, शंकर, गेणू अशी चार मुले व कासाबाई ही मुलगी अशी पाच अपत्ये डाके यांना होती. या चारही मुलांचे शिक्षण डाके यांनी केले. हल्ली शेवगाव बसस्थानकाच्या जवळ असलेल्या सहकार बँकेच्या इमारतीच्या जागेवर

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button