सोशल

विनम्र अभिवादन!

विनम्र अभिवादन!

🍄🍄‍🟫🪸🌾💐🌷🌹🥀🪻🪷🌺🌸🌻🌼🍏🍎🍐🍊🍋🍋🍋‍🟩🍉🍇🍓🫐🍈🍒🍑🍍🍍🥥🥝🟣🟡🟠🔴
डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी लिंगे बी ए एम एस/MS/ स्त्री रोग तज्ञ बालरोग तज्ञ यांचा निधनाचा अकरावा सुतक फेडणे गोडाचे जेवण अकरा सुहासिनीना सौभाग्य लेणं देऊन गोडाचे जेवण पाहुणे मंडळींना मित्र सहकारी परिवारांना गोड जेवण व पुष्पांजली चा कार्यक्रम 15 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी पेनुर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मोहोळ पंढरपूर रोड पेनुर येथे होणार आहे शोकाकुल: लिंगे, गवळी परिवार🟥

🔵🔴🟠डॉ. जयश्री प्रशांत गवळी BAMS MS स्त्रीरोगतज्ञ (सत्यशोधक उद्योगपती ओबीसी नेते अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे व सौ सुनंदा शंकरराव लिंगे यांची लाडली दि ग्रेट जेष्ठ कन्या) यांचे शुक्रवार दि ०५-०७-२०२४ रोजी दुपारी एक वाजता दुःखद अकस्मात निधन झाले.

🛑🟠🔵🔴🟨🟥🟦डॉक्टर जयश्री लिंगे-गवळी यांचा जन्म २० जानेवारी १९८५ रोजी अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे झाला. लिंगे कुटुंबांमधील ती पहिलीच मुलगी असल्याने लिंगे परिवारात सर्वांची लाडकी होती सर्व लिंगे परिवारामध्ये तिला मानाचे स्थान होते सर्वजण तिचा सन्मान करत होते आदर्श घेत होते तिच्या प्रेरणेने भावाच्या चार मुली डॉक्टर झाल्या मी गर्वाने सांगत होतो मी डॉक्टर नाही एमबीए नाही इंजिनीयर नाही परंतु मी या सर्वांचा बाप आहे मुलगी डॉक्टर मुलगा इंजिनियर मुलगा एमबीए आहे तिच्या जन्मानंतर लिंगे कुटुंबाची अतिशय वेगवान प्रगती झाली KG ते १०वी पर्यंत शिक्षण इंग्लिश मीडियम मध्ये शंकरराव मोहिते-पाटील इंग्लीश स्कूल, धवलनगर, अकलुज येथे झाले.

११ वी १२वी सायन्स साईडने सदाशिवराव माने विद्यालय, अकलुज येथे झाले. BAMS वैद्यकिय शिक्षण विजापुर येथील BDL कॉलेज मध्ये झाले. नंतर २००९-१० युनिक हॉस्पिटल सोलापूर येथे स्त्रीरोगतज्ञ बालरोग निदान तज्ञ म्हणुन प्रॅक्टिस केली.०९ डिसेंबर २०१० रोजी त्यांचे लग्न डॉ. प्रशांत केराप्पा गवळी पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्या बरोबर झाले. दोघांनीही पेनुर मधील सावता माळी शॉपींग सेंटर मधील एका गाळ्यामध्ये वैद्यकिय सेवेचे काम चालु केले. तेथे चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर स्वतःचे पेनूर मध्ये सहा गुंठे जागेत
पंढरपुर रोड सुसज्ज असे बांधकाम करुन श्री साईकृपा हॉस्पिटल नावाने सेवा चालु केली.

त्यामध्ये डिलेव्हरी, महिलांचे रोग, बालरोग X-Ray, सोनोग्राफी, सर्व तपासणीचे लॅब लहान मोठी ऑपरेशनची सेवा देत होते. डॉ. जयश्रीने बेळगांव जिल्हातील बेलहुंगल कॉलेजमधून लग्नानंतर M.S.ची डिग्री संपादन केली त्यांना बालरोग निदान करण्याचाही चांगला अनुभव होता. डॉक्टर जयश्री लिंगे परिवारातील पहिल्या केजी ते पीजी शिकलेल्या उच्चशिक्षित होत्या त्याचा मला अभिमान वाटतो! त्यांचे पती प्रशांत गवळी यांचे कोडोली-कोल्हापूर येथे BAMS झाले होते. त्यांनीही लग्नानंतर M.D. मेडिसीन ची डिग्री कर्नाटकातून मिळवली. दोघांच्या सहकार्याने चांगली वैद्यकिय सेवा सोलापुर, पंढरपुर शहरापेक्षा ४०- ते 50 टक्के कमी दराने देत होते. डॉ. जयश्रीची सेवा २४तास चालु होती,

त्यामुळे त्यांचे नाव पेनूर आणि आसपासच्या २०-२५ गावात प्रसिद्ध झाले होते. डॉ. जयश्री गवळी हिचा स्वभाव प्रेमळ, कनवाळू दयाळू मनमिळाऊ हर्ष उल्हासित आणि सेवाभावी होता. त्यांना महाराष्ट्र मध्ये मेडिकल प्रवेश मिळाला नाही तरी तीने डॉक्टर बनण्याची जिद्द सोडली नाही. कर्नाटक मध्ये प्रवेश मिळवुन कन्नड भाषेतील अभ्यासक्रम समजून घेऊन मेडिकलचे पेपर इंग्लिश मध्ये देऊन डॉक्टर बी. ए.एम.एस. ही पदवी जिद्दीने मिळवली. त्यांना हिंदी मराठी इंग्लिश कन्नड भाषा चांगल्या बोलता येत होत्या जिद्द, चिकाटी, अहोरात्र परिश्रम करण्याची सचोटी वाखाणण्याजोगी होती.

डॉ. जयश्री यांना स्वयंपाकातील निरनिराळे १५० पदार्थ बनवण्याचीही कला ट्रेनिंग हस्तगत केले होते सु गृहिणी होत्या. कोणतेही काम करण्यास लाजत नसत, नकार देत नव्हत्या.कामगार आला नाही तरी त्यांचे सर्व काम बाथरूम साफ करण्यापासून झाड‌लोट, धुणेभांडी, स्वयंपाक स्वयंस्तुतीने आनंदाने करत होत्या. हरहुन्नरी कष्टाळू स्वाभिमानी अभिमानी स्वयंपूर्ण सेल्फ होत्या.त्यांना भाषण करणे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणे, कार्यक्रमाचे आधुनिक नियोजन करणे, कोणत्याही सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेणे इत्यादी गोष्टीची ही आवड होती. कोणत्याही गोष्टीचा अहंकार नव्हता

🛑🟠🔴
डॉ. जयश्री प्रशांत गवळी लिंगे यांच्या अचानक निधनाने पेनूर पंचक्रोशितील सर्व जनता हळहळ करत होती. त्यांचे पार्थिव पंढरपूरहून रात्री १० वाजता आले तरीसुद्धा अग्नि दहन अंतयात्रेस हजारो नागरीक महिला लहानथोर गावातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संखेने उपस्थित होती. गोरख गवळी गुरुजी आणि सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी श्रध्दांजलीचे भाषण करून अभिवादन केले. सर्वांनी दोन मिनीटे उभे राहुन- श्रद्धांजली वाहिली. लिंगे परिवारास धीर दिला सांतवन केले दहाव्या चा कार्यक्रम, दशक्रिया अस्थि विसर्जन कार्यक्रम रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी सकाळी सात वाजता चंद्रभागा-भीमा नदीच्या काठावर मुंडेवाडी, ता. पंढरपूर येथे डॉक्टर प्रशांत केराप्पा गवळी साई डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी यांचे मुंडन करून करण्यात आला हस्ती विसर्जन लिंगे गवळी परिवाराने चंद्रभागेच्या पात्रात केले रक्षा सावड ने तिसरा आणि आज दहाव्याला कावळ्याने नैवेद्य शिवला नाही दोन्ही वेळा गाईला नैवेद्य खाऊ घालण्यात आला

त्यामुळे सर्वांच्या मनात डॉक्टर जयश्री यांच्या अकाली निधनाने त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्याचे दबक्या आवाजात कुजबुजण्यात येत होते दशक्रिया विधी कार्यक्रमास गवळी परिवार डॉक्टर के टी गवळी निर्गुणा केराप्पा गवळी डॉक्टर प्रशांत गवळी कुमार साई डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी कुमारी सई जय श्री प्रशांत गवळी कुमारी सिद्धी जयश्री प्रशांत गवळी श्री हनुमंत बनकर सौ रतन आनंदकर जयश्री चे वडील सत्यशोधक शंकरराव लिंगे आई सुनंदा शंकरराव लिंगे चुलती विमल पांडुरंग लिंगे संगीता भारत लिंगे चुलते भारत लिंगे पांडुरंग लिंगे लक्ष्मण लिंगे मामा राजेंद्र हरी शिंदे भाऊ जयदीप लिंगे जयसिंग लिंगे मल्हारी लिंगे माधव लिंगे बहीण सौ डॉक्टर राजश्री विवेक रासकर लिंगे कुमारी डॉक्टर भाग्यश्री भारत लिंगे कुमारी डॉक्टर विजयश्री भारत लिंगे कुमारी डॉक्टर अंजली भारत लिंगे वहिनी सो सायली जयदीप लिंगे भाची क्रांती जयसिंह लिंगे भाचा ज्योतिरादित्य जयसिंह लिंगे वहिनीवनिता जयसिंह लिंगे यांच्यासह मोठ्या संख्येने गवळी लिंगे परिवार प्रेमी मान्यवर उपस्थित होते

तिसरा रक्षा सावडण्याचा विधी पेनुर ता. मोहोळ जिल्हा सोलापुर येथील स्मशानभूमित रविवार दि. ७ जुलै रोजी सकाळी संपन्न झाला यावेळी हजारोच्या संख्येने पेनुर पंचक्रोशीतील नागरिक प्रतिष्ठित मंडळी वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी जयश्रीच्या मैत्रिणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते अखिल भारतीय माळी महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमर बोराटे सर प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर सर पेनुर चे कस्तुरे मालक यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जयश्री गवळी यांचे पिताश्री मातोश्री सौ सुनंदा लिंगे परिवारास अश्रू अनावर झाले सत्यशोधक शंकरराव लिंगे प्रेमीं जयश्रीच्या चाहत्यांना शोक अनावरण झाला सत्यशोधक शंकराव लिंगे त्यांनीही मोठ्या दुःखी कष्टी अंतकरणाने शोक संदेश देऊन श्रद्धांजली वाहिली

शोक संदेशातलिंगे म्हणाले बहिणींनी मेहुण्या पाहुणेणि किती हस्तक्षेप करावा त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे गवळी कुटुंबीय माझ्या लाडक्या जयश्री सारखे निष्पाप जीव यापुढे जाऊ नये यासाठी सासरच्या मंडळींनी मेव्हण्या पाहुण्यांनी नंदाने सासू-सासर्‍याने नवऱ्याने डॉक्टर जयश्री सारख्या मुलींना त्रास देऊ नये निष्पाप जीव घेऊ नये भावी पिढीचे मुला मुलींचे जीवन उद्ध्वस्त करू नये लहानपणीच मुलांचे असलेले मायेचे छत्र हिरावून घेऊ नये त्यांना पोरके वनवासी करू नये अशी सर्व समाजातील नागरिकांना विनंती व आवाहन केले वीस पंचवीस दिवसापूर्वीच जयश्री ची मैत्रीण डॉक्टर सौ रुपनवर भाऊसाहेब रुपनवर यांच्या सून या विवाहित डॉक्टरांची छळ करून नवऱ्याने बायकोचा देह अंत केला सुशिक्षतापेक्षा अडाणी माणसं बरी माणसापेक्षा मेंढर बरी म्हणण्याची पाळी आली आहे महिना उलटत नाही तोपर्यंत डॉक्टर सौ जयश्री गवळीलिंगे यांचा बळी गेला अशा सुशिक्षित महिलांचा छळ होणे अत्यंत दुर्दैवी आहे असा अंत होणे भारतीय संस्कृतीला न शोभणारे कृत्य आहे असे भावुक होऊन हृदयस्पर्शी भावना लिंगे यांनी व्यक्त केल्या सर्व नागरिकांनी दोन मिनिट उभा राहून श्रद्धांजली वाहिली जयश्री यांच्या निधनानंतर फोन करून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी शोक संदेश दिला त्यांचे प्रतिनिधी म्हणून रवी सोनवणे साहेब नाशिकहून लिंगे गवळी कुटुंबियाचे सांत्वन करण्यासाठी उपस्थित होते सांगली सातारा पुणे सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातून लिंगे गवळी परिवारांचे नातेवाईक सकाळी साडेसहा वाजता रात्रभर प्रवास करून रक्षा सावडण्याचा कार्यक्रमाला उपस्थित होते

ऋणी शोकाकुल गवळीलिंगे परिवार

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button