०१ जानेवारी ख्रिचन धार्मिक नववर्ष, गुढीपाडवा समस्त हिंदू नववर्ष नव्हे तर शक राजाने चालू केलेले शक कालगणना नववर्ष आहे

०१ जानेवारी ख्रिचन धार्मिक नववर्ष, गुढीपाडवा समस्त हिंदू नववर्ष नव्हे तर शक राजाने चालू केलेले शक कालगणना नववर्ष आहे
कारण उत्तर भारतात हिंदूंचे नववर्ष दुसरे आहे तर दक्षिण भारतात पोंगलला तेथील हिंदूंचे नववर्ष असते. आज रोजी भारतीय आर्थिक नववर्ष आहे पण भारतात धार्मिक साक्षरता जास्त आहे पण आर्थिक साक्षरता खूप कमी आहे व ती कायम कमी रहावी आणि लोक कायम मुर्ख रहावेत, ही कपटनीती धुर्तानी केल्यामुळे तो दिवसच April Fool बनवला आहे, हे कितीजणांना माहिती आहे. आजच्या दिवशी १९३५ साली भारताच्या रिझर्व्ह बॅकेची स्थापना झाली आहे.
पैसे नसतील तर काळे कुत्रे पण तुम्हाला विचारत नाही, ही पूर्वजांची म्हण आहे त्यामुळे आर्थिक साक्षर व्हा व या आर्थिक नववर्षाचे महत्त्व समजून घेवून आजपासून आर्थिक बचत करायला शिका. आपल्या उत्पन्नातील फक्त १% सामाजिक बचतीसाठी ही मदत करा. समाज, देश असेल तरच आपण सुखी. टॅक्स रुपाने आपले दान सरकारला जाते म्हणून सरकार चालते जनतेच्या पैशावर, तसेच सामाजिक उपक्रम ही सामाजिक बचतीतून चालतात, त्यास ही थोडी मदत करावी व मोठ्या प्रमाणात बचत स्वतःच्या कुटुंबासाठी करा.
व्यसन, मोठमोठे दिखावे व स्वतःची प्रतिष्ठा दाखवण्यासाठी वाढदिवस, लग्नसोहळे,
धार्मिक कर्मकांडे हे न करता बॅकेत खात्यावर मोठी रक्कम सतत बचत असली पाहिजे, हे तुम्हाला कोण शिकवणार नाही. मुलांच्या शिक्षणाला व आकस्मिक दवाखान्यात फक्त पैसाच कामाला येतो. ज्यावेळी पैसा असतो तेव्हा उधळायचा व गरज पडली की मित्रांना, नातेवाईक यांना उसने भिख मागत रहायचे म्हणजे स्वतःची आर्थिक निरक्षरता आहे पण दोष उसने न देणाराला दिला जातो, ही ग्रामीण भारताची व शहरी इंडियाची वास्तविकता आहे म्हणून आर्थिक साक्षर बना व जास्तीत जास्त बॅकेत खात्यावर, जागेत, व्यवसायात किंवा दागदागिन्यात तरी बचत करा पण कराच…
April Fool नाही तर Economic Cool बना, तरच डोके पण cool रहाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं माणूस नुसता अक्षर साक्षर होऊन चालणार नाही तो आर्थिक साक्षर झाला पाहिजे जलसाक्षर झाला पाहिजे कृषी साक्षर झाला पाहिजे विद्युत साक्षर झाला पाहिजे व्यवहार साक्षर झाला पाहिजे उद्योग साक्षर झाला पाहिजे विज्ञान साक्षर झालं पाहिजे सामाजिक साक्षर झाला पाहिजे सांस्कृतिक साक्षर झाला पाहिजे अनेक बाबतीत तो साक्षर झाला पाहिजे राजकीय साक्षर झाला पाहिजे तर तो परिपूर्ण होऊ शकतो एक डिग्री किंवा एका विषयातलं ज्ञान घेऊन चालणार नाही अनेक विषयातलं ज्ञान आलं पाहिजे जास्तीत जास्त विषयांमधलं ज्ञान आलं पाहिजे!
*आर्थिक नववर्षाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा…
*🌹शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील ज्या महत्वाच्या बातम्या व्हिडिओ असतील ज्याची कुणी दखल घेत नसेल अशा बातम्या व्हिडिओ फोटो पाठवा


