सोशल

निळूभाऊ फुले यांच्या जन्म 4 एप्रिल 1930 उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे

निळूभाऊ फुले यांच्या जन्म 4 एप्रिल 1930 उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे

निळूभाऊ फुले यांच्याशी माझा पहिल्यांदाच संबंध आला तो 1985 ला कथा अकलेच्या कांद्याची नाट्यप्रयोगाच्या वेळेला अकलूजला त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था माझ्याकडे होती तेव्हापासून माझी चांगली ओळख होती आणि प्रत्येक वेळेला सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर ते आवर्जून मला कळवायचे आणि त्यानंतर आमचं दिवसभर त्यांच्याबरोबर फिरणं जेवण खाणं होत राहीचे 2003 सांगोला येथील लिंगे उद्योग समूहाच्या वतीने शंभर जोडप्याचा सामूहिक विवाह सत्यशोधक सामुदायिक विवाह साठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते त्यांना पाहण्यासाठी सांगोला तालुका आणि आसपासच्या पंचक्रोशीतील 70 80 हजार जनसमुदाय जमला होता

जाणकार पत्रकार सांगत होते ज्या सांगोला विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणामध्ये सामुदायिक विवाह होता त्याच पटांगणामध्ये इंदिरा गांधीची सभा होती इंदिरा गांधीच्या सभेनंतर एवढी मोठी गर्दी जमलेली लोकांना पाण्याची संधी मिळाली त्या कार्यक्रमास राज्याचे कॅबिनेट मंत्री लक्ष्मण रावजी ढोबळे साहेब सोलापूरच्या महापौर नलिनीताई चंदेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते अथांग जनसागर पाहून निळूभाऊ फुले यांनी लिंगे उद्योग समूहाच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या त्यानंतर सत्यशोधक परिषद म्हसवड मध्ये झाली त्या परिषदेलाही मी हजर होतो त्या ठिकाणी सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष एडवोकेट वसंतराव फाळके होते अनेक वेळा सोलापूर शहरांमध्ये आणि माढा तालुक्यामध्ये त्यांच्या एका घरी नोकर असलेल्या त्यांच्या विनंती वर त्यांच्या घरी आले होते त्यावेळेला त्यांनी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र आरण इथे भेट दिली

आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की सावता महाराजांच्या जीवन कार्यावर एक चांगला रंगीत चित्रपट काढण्याची गरज आहे आणि ते आपण सर्वांनी मिळून काढण्याचा प्रयत्न करू टेंभुर्णी ला त्यांचा न्हावी समाजाचा मित्र होता आणि अकलूजचे मुस्लिम समाजाचे सेम टू सेम निळू फुले यांच्यासारखे ॲक्शन आवाज करण्याचा प्रयत्न करणारे युसुफ मोहोळकर म्हणून त्यांचे अनुयायी होते

त्यांच्याबरोबर आमचे जेवण खाण्याचा कार्यक्रम टेंभुर्णी मध्ये झाला असे अनेक प्रसंग मला परंतु त्यानंतर ते जास्त काळ जगले नाहीत त्यांनी पुण्यातील आपल्या घरी ही बोलवून पाहूनचार केला होता त्यानंतर त्यांचे पौड फाट्यावरील फार्म हाऊस वर ही नेले होते अशी आमचे जवळचे नाते असलेले निळू भाऊ चित्रपट नाट्यसृष्टी सक्रिय कलाकार अभिनेते सत्यशोधक समाज एस एम जोशी यांच्या बरोबरील समाजवादी चळवळ राष्ट्रसेवादल अनेक सामाजिक कार्यासाठी त्यांनी त्यांच्या नाटकाचे प्रयोग अत्यंत कमी दरात केलेले आहे

त्यांची प्रमुख गावचा पाटील आणि त्यांनी केलेले अन्यायकारक कार्य खलनायकाची भूमिका तमाशाप्रधान गावरान भाषेतील भूमिका अशा आशयाचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत पुढारी सरपंच आमदार असे राजकारणी लोकांची ही वेशभूषा पद भूमिका त्यांनी पार पडलेल्या आहेत पण वास्तविक जीवनामध्ये ते असे नव्हते ते सच्चे सत्यशोधक होते त्यांच्या घरामध्ये सर्व धर्माची लोक राहत होते एक जावई बौद्ध समाजामधला एक जावई मुस्लिम समाजातला एक जावई ब्राह्मण समाजातला मंडळी जैन समाजातील आणि आपण स्वतः सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते त्यामुळे त्यांचं ते ध्येय होतं ते आपल्या घरामध्ये सर्व धर्माचे लोक राहत असल्यामुळे सर्वांनी हे गुण अंगीकारले तर खरा भारत निर्माण होईल आणि दंगे दंगली द्वेष कोणी कोणाचा करणार नाही

आणि महात्मा फुले यांच्या स्वप्नातील सार्वजनिक सत्य धर्म उदयास येईल अशी त्यांची पक्की धारणा होते आणि त्यावर ते नुसते बोलत नव्हते त्यांनी कृतीतून दाखवून दिलं होतं अस्सल मराठमोळी गावठी खेडेगावातील राजकारण जनतेवर आधारित ऊस पट्ट्यातील राजकारण आधारित इरसाल शेकडो पिक्चर शेकडो नाटक इरसाल कलाकृतीने भरलेले काम त्यांनी सहजपणे केलेले होते अंधश्रद्धेच्या निर्मूलनाचे ही काम करत होते महात्मा फुले यांच्या विचाराचा सार्वजनिक सत्य धर्माचा ही प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करत होते त्यांनी अनेक धर्मामध्ये सत्यशोधक चळवळ पोहोचवली होती

जन्म उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button