राजकारण

*ओबीसी विरुद्ध मराठा प्रस्थापिताचे राजकारण क्रमशः भाग 15*

:
*ओबीसी विरुद्ध मराठा प्रस्थापिताचे राजकारण क्रमशः भाग 15*
उदयात पूरक भूमिका बजावली. ब्राह्मण सावकारांवर किमान काही प्रमाणात आळा बसून कुणब्यातील श्रीमंत शेतकरी स्वतःच कर्ज देऊ लागले होते. कालवे सिंचन आणि सहकारी पतपुरवठा या दोन बाबी यापुढील काळात



श्रीमंत शेतकऱ्यांच्या उदय आणि त्यांच्या प्रभुत्व प्रस्थापनेत कळीच्या ठरल्या. १९०४ ला सहकारविषयक कायदा करून राज्यात सहकाराच्या वाढीला प्रोत्साहन दिले. त्याअगोदर सत्यशोधक नेते कृष्णराव भालेकर यांनी सहकाराच्या तत्वांचे सुतोवाच केलेले दिसून येते. राजर्षी शाहू महाराजांनी तर स्पष्टपणे सहकारी तत्वांचा पुरस्कार करून आपल्या संस्थानात सहकारी क्षेत्राच्या वाढीस सक्रिय प्रोत्साहन दिले होते. कालवे सिंचन आणि सहकारी पतपुरवठा या दोन बाबींच्या परिणामी श्रीमंत शेतकऱ्यांनी ऊसाचे पिक घेण्यास सुरुवात केली.

१९११ मुंबई प्रांत सह‌कारी बैंक’ (Bombay Provincial Co-operative Bank) स्थापन केली तर १९२० च्या दशकात प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली, यातून दोन प्रमुख गोष्टी दिसून येतात. एक म्हणजे व्यापारी पिके घेण्यासाठी प्राथमिक स्तरावर कर्जाची वाढलेली मागणी आणि किमान शेतकऱ्यांमधील एका विभागाची अशी व्यापारी पिकांसाठी वित्तपुरवठा उभा करण्याची वाढलेली क्षमता ही दुसरी गोष्ट होय.

अशाप्रकारे पश्चिम महाराष्ट्रात ब्रिटीशांच्या प्रोत्साहनाने सुरु झालेल्या कालवे सिंचन व सहकारी पतपुरवठा या दोन घटकांच्या परिणामी ऊस या व्यापारी पिकाचा परिचय येथील श्रीमंत शेतकयांना झाला. या श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये बहुतांशः मराठा जातीय शेतकरी होते. महाराष्ट्रात १९४१ ला लोणी-प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे-पाटील

यांच्या पुढाकारातून पहिला सहकारी साखर कारखाना अस्तित्वात आला. त्यानंतर महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारीचा विकास व विस्तार वेगाने घडून आला. परंतू त्याआधी येथील मराठा जातीय प्रभुत्वशाली शेतकऱ्यांना ऊसाचे पिक घेणे आणि सहकारी साखर कारखान्यांद्वारे साखरेची निर्मिती करणे यांचे महत्व कळलेले होते. कारण, तोपर्यंत (पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन होईपर्यंत) येथे सहकाराच्या पायाभूत सोयींचा विस्तार बराच घडून आला होता. प्राथमिक सहकारी पतसंस्थांची संख्या, त्यांचे महत्व आणि गावातील श्रीमंत शेतकऱ्यांचे त्यावरील नियंत्रण वाढले होते (Baviskar १९८०: २७), एवढेच नव्हे तर मुंबई प्रांत सहकारी बँकेवरील त्यांच्या प्रभावातही वाढ झाली होती. ऊसाच्या पिकामुळे अल्प उत्पन्न गटातील शेतकरी श्रीमंत बनले. त्यांनी स्वतःची बचत वापरून किंवा कर्ज काढून शेतात कुपनलिका (बोअरवेल) घेतल्या काहींनी

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण

१०० खोदल्या. अशाप्रकारे पाण्याची सोय करून त्यांनी ऊसाचे पिक घेतले. ऊस हे मराठा शेतकऱ्यांसाठी आर्थिक प्रगतीचे मानक तर ठरलेच पण बरोबर ऊसाच्या पिकाने मराठा शेतकऱ्यांच्या सांस्कृतिक जीवनात महत्वाची भूमिका बजावली (जाधव २०१३: ४९). पुढील काळात सहकारी साखर कारखानदारीभोवती सहकाराचे जाळे विणले गेले. आणि त्याच्या माध्यमातून यांच्या आर्थिक प्रभुत्वाची घडी बसण्यास मोठी मदत झाली.

सहकार क्षेत्राबरोबरच मराठ्यांची शिक्षणक्षेत्रावरील पकड ही त्यांचे आर्थिक प्रभुता स्थापित करण्यात महत्वाची ठरली. राज्यातील बहुतांश शिक्षण संस्था मराठा जातीय व्यक्तींच्या ताब्यात आहेत. जवळपास प्रत्येक तालुक्यात मराठ्यांची सालीळा-महाविद्यालये आहेत. ह्या संस्थांना मिळणारे वित्तीय अनुदान मोठ्या प्रमाणावर साहितसंबंधांसाठी वापरले जाते. बहुतांश शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षक, चपरासी, प्राध्यापक, कारकून यांच्या नेमणुकीसाठी लाखो रुपये घेतले जातात. या शिक्षणसंस्थांमधून मोठ्या प्रमाणावर स्वजातीय व्यक्तींची नेमणूक केली जाते. खुल्या प्रवर्गातील जागांवर अपवाद वगळता मराठा जातीच्या उमेदवारालाच घेतले जाते.

१९९५ च्या आधी तर एससी, एसटी प्रवर्गातील राखीव जागा न भरता विविध कारणे दाखवून भरली जात नसत व काही काळाने आपल्या जातीच्या माणसाला त्या जागेवर घेतले जाई, म्हणून लाखो राखीव जागांचा अनुशेष शिल्लक राहिला होता. १९९५ नंतर मात्र या परिस्थितीत बराच फरक पडलेला दिसून पेतो, मात्र आजही एखाददुसरा अपवाद वगळता खुल्या प्रवर्गातील जागेवर मागास जातीतील उमेदवार कितीही पात्र असला तरी त्यास घेतले जात नाही. खुल्या प्रवर्गातील जागा म्हणजे जणू खुल्या प्रवर्गातील लोकांना राखीव ठेवल्यासारखी

परिस्थिती आहे. आरक्षण धोरणाचा हा प्रचंड विपर्यास त्याच्या मूळ तत्वांना

मारणारा असून त्याचे प्रचलन सार्वत्रिक असल्याचे दिसून येते.

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी खाजगी व विनाअनुदानित शिक्षणसंस्थांना परवानगी दिली आणि एका अर्थाने महाराष्ट्रात शिक्षणाच्या खाजगीकरणाची पायवाट पाडली. त्यांच्या या धोरणामुळे एका बाजूला शिक्षणाच्या व्यापारीकरणाची सुरुवात झाली आणि दुसऱ्या बाजूला मराठ्यांच्या शिक्षण क्षेत्रावरील प्रभुत्वाला अधिक बळकटी मिळाली. ह्या बळकटीने त्यांचे आर्थिक साम्राज्य अधिक भक्कम झाले. खाजगी वैद्यकीय, अभियांत्रिकी संस्थांचे पेव फुटून त्यामुळे मराठ्यांच्या आर्थिक ताकदीमध्ये कमालीची वाढ झाली.

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण


🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴*

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button