सोशल

केली. रत्नम्माबाईंचे प्रस्तुत सत्यशोधकीय कार्य सत्यशोधक चळवळीसाठी प्रेरणादायक ठरले. संदर्भ महात्मा फुले दुर्मिळ वाड्मय आणि समकालीन चरित्रे, संपादक – डॉ. मा. गो. माळी, डॉ. सुभाष सावरकर

केली. रत्नम्माबाईंचे प्रस्तुत सत्यशोधकीय कार्य सत्यशोधक चळवळीसाठी प्रेरणादायक ठरले. संदर्भ महात्मा फुले दुर्मिळ वाड्मय आणि समकालीन चरित्रे, संपादक – डॉ. मा. गो. माळी, डॉ. सुभाष सावरकर



अय्यावारू केशवस्वामी रामय्या

सत्यशोधक केशवस्वामी हे मुंबईकर सत्यशोधक स्वामी रामय्या अय्यावारूंचे चिरंजीव होत. स्वामी अय्यावारू निवर्तल्यावर अय्यावारूंच्या पत्नीने महात्मा फुले यांच्या ‘गुलामगिरी’ ग्रंथाची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध केली. केशवस्वामींच्या आईने प्रसिद्ध केलेली ‘गुलामगिरी’ ग्रंथाची तिसरी आवृत्ती संपल्यावर ‘गुलामगिरी’ ग्रंथाची चौथी आवृत्ती केशवस्वामी यांनी प्रसिद्ध केली. प्रस्तुत आवृत्ती ६ सप्टेंबर १९२१ रोजी मुंबई येथून प्रसिद्ध झाली होती. या आवृत्तीची किंमत आठ आणे असून एक छोटेखानी प्रस्तावना केशवस्वामी यांनी या आवृत्तीसाठी लिहिलेली आहे. सत्यशोधक

चळवळीच्या उत्थानासाठी केशवस्वामीचे हे योगदान मोलाचे ठरले. संदर्भ महात्मा फुले दुर्मिळ वाङ्मय आणि समकालीन चरित्रे, संपादक – डॉ. मा. गो. माळी, डॉ. सुभाष सावरकर

अनपट माधवराव सूर्यभान

(जन्म १९०४) सत्यशोधक माधवराव सूर्यभान अनपट हे मौजे येडशी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथील सत्यशोधक असून, त्यांचा जन्म १९०४ साली येडशी येथे झाला.

त्यांचे शिक्षण इयत्ता दुसरीपर्यंत बेताचेच झाले होते. येडशी येथील ज्येष्ठ सत्यशोधक हरिभाऊ सस्ते यांच्यापासून प्रेरणा घेऊन ते सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते बनले. अमरावती जिल्ह्यातील सत्यशोधक गोविंदराव नारायण फुटाणे यांचे ‘सुधर्म विजय’ नाटक त्यांनी बसविले होते. या सत्यशोधकी नाटकात अनपट यांनी अभिनय केला होता. या नाटकाचे अनेक प्रयोग विदर्भात खेडोपाडी झाले होते.

अमृतकर नारायणराव गणपतराव (२९ डिसे. १८९७-१४ ऑगस्ट १९५८)

विदर्भातील ब्राह्मणेतर-सत्यशोधक विनीचे पुढारी, अमरावतीच्या दुसऱ्या काँग्रेस आयोजन समितीचे सरचिटणीस, महात्मा फुले चरित्राचे प्रस्तावनाकार आणि नाभिक परिषद आयोजन नियोजनाचे शिल्पकार, अमरावती येथील अंबादेवी मंदिर सत्याग्रहाचे एक सहभागी सत्यशोधक अॅड. अमृतकर नारायणराव गणपतराव, वकील हे विदर्भातील आघाडीचे ध्येयवेडे सत्यशोधक होते. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १८९७ रोजी झाला.

अॅड. अमृतकर हे मोर्शी, जिल्हा अमरावतीचे सत्यशोधक असले तरी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फग्र्युसन महाविद्यालयात झाले. पुढे अमृतकरांनी विदर्भ ब्राह्मणेतर पक्षाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारीही स्वीकारली. १९२४ साली ब्राह्मणेतर काँग्रेसचे पहिले अधिवेशन बेळगाव येथे पार पडले. या अखिल भारतीय अधिवेशनाला आनंदस्वामींसह अमृतकर आवर्जून उपस्थित होते. या अधिवेशनाचे सूप वाजल्यावर आनंदस्वामी आणि अमृतकरांनी ब्राह्मणेतर काँग्रेस अधिवेशन संयोजकांकडून दुसरे काँग्रेस ब्राह्मणेतर अधिवेशन मागून घेतले, त्यानुसार २७, २८ व २९ डिसेंबर १९२५ रोजी ब्राह्मणेतर अ. भा. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन अमरावती येथील माळटेकडीच्या पायथ्याला भरले. या अधिवेशनात अ. भा. ब्राह्मणेतर परिषद, तसेच अ. भा. अस्पृश्यता निवारक परिषद, अ. भा. सत्यशोधक परिषद, अ. भा. महिला परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले

होते. पुणे येथील महात्मा फुले स्मारक (पुतळा) प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या सत्यशोधकांचे अंतरंग ७

क्रमशा भाग 12


🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴*

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button