सोशल

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 43

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 43

कुंभार
धोंडीराम नामदेव (जन्म सुमारे १८३८-मृत्यू सुमारे १९०५ पूर्वी)

सत्यशोधक साहित्यिक, कुडगॉलच्या शंकराचार्याकडून गौरविलेले पंडित धोतिराम नामदेव कुंभार यांचा जन्म सुमारे १८३८ सालचा असावा. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील दहिवडी असून त्यांचे वंशज व्यवसायानिमित्त पुणे येथे वास्तव्यास गेलेले दिसतात. पंडित धौडिराम आणि धोंडिबा आवजी रोडे यांनी सनातन्यांकडून एक हजाराची सुपारी घेऊन १८५६ साली महात्मा फुले यांच्यावर भ्याड हल्ला केला होता. सुदैवाने या प्रसंगी गुख्याची लढाई न होता मुख्याची लखाई झाली. या मुद्देसूद चर्चेने पंडित घोडिराम आणि धोंडिबा आवजी रोडे यांचे मत्त परिवर्तन झाले. ते महात्मा फुले यांना शरण गेले. येथून पुढे दोघे धोंडिबा फुले यांचे शिष्य झाले.

सत्यशोधक समाज स्थापन होण्यापूर्वीच्या बैठकांना दर रविवारी घोडिराम कुंभार आवर्जून उपस्थित राहत असत. शेवटी विचारांती २४ सप्टेंबर १८७३ रोजी सायंकाळी (दिवे लागण्याच्या वेळी) सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी धोंडिरामांनी तळीभंडार उचलून सत्यशोधक समाजाचे सभासदत्व स्वीकारले, पुढे कार्तिक महिन्यात जोतिरावांनी विना पुरोहित तुळशीचे (स्वतः पौरोहित्य केले) लग्न लावले. अशा धार्मिक क्रांतिकारी प्रसंगी धोंडिराम आवर्जून उपस्थित होते.

सत्यशोधक समाजाच्या आरंभीच्या (१८७४ ते ७६) अहवालावरून असे लक्षात येते की, धूर्ताच्या चकव्यात गुरफटलेल्या बहुजन समाजात फिरस्ती करून पंडित धोडिरामांनी अनेक पदे रचून व गाऊन बहुजनांचे प्रबोधन केले. सत्यशोधक पंढरीनाथ आबाजी चव्हाण, कृष्णराव भालेकर, नारायण रामजी पांढरे आदीसमवेत स्यांनी सत्यशोधक समाजाचा प्रचार-प्रसार केला. १३ नोव्हेंबर १८७५ रोजी प्रिन्स ऑफ वेल्स यांनी पुणे शहरास भेट दिली. युवराजांच्या आगमनप्रसंगी पंडित

धोडिरामांनी कृष्णराव भालेकरांसमवेत स्वागतपर सत्यशोधकी पदे गायली.

इ. स. १८७२ला जोतिरावांचा ‘गुलामगिरी’ नावाचा स्फोटक, क्रांतिकारी संच प्रसिद्ध झाला. जोतिराव आणि धोंडिबा यांच्या संवादवजा बाजातून सनातनी
धार्मिक गुलामगिरी अव्हेरण्याचे आवाहन जनसामान्यांना जोतिरावांनी या ग्रंथात केले. या ग्रंथात जोतिरावांव्यतिरिक्त, धोंडिबा ही व्यक्तिरेखा आहे. ही व्यक्तिरेखा बहुधा धोंडिराम नामदेव कुंभारांची असावी असे वाटते. इ.स. १८८३-८४ च्या

सुमारास जुन्नर ओतूर ग्रामीण पट्ट्यात सत्यशोधक चळवळ अतिशय जोमात होती. अशा प्रसंगी आणि पुढेही जोतिरावांचे या परिसरात येणे-जाणे वाढले. या दौऱ्यात फुले यांच्या समवेत पंडित धोंडिराम राहत असत. पुढे २८ नोव्हेंबर १८९० रोजी पुणे मुक्कामी जोतिरावांची इहलोकीची यात्रा संपली. या दिवशी दुपारनंतर जोतिरावांच्या शवाला अग्नी दिल्यावर स्मशानभूमीत श्रद्धांजलीपर शोकसभेत पंडित धोंडिरामांनीही भाषण करून आपल्या जन्म उद्धारक नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. पुढे १८९५ साली कोकणासारख्या दुर्गम भागातील ४०० गावांत भटकंती करून सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसार केला.

गोंदवले (दहिवडी) येथे वास्तव्यास असताना ज्येष्ठ शृंगेरी कुडगीलचे शंकराचार्य

(पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री बाळकृष्ण करंदीकर) आणि पंडित घोडिरामांची धर्मचिकित्सेवर (दि. १२/२/१८८४) पाच तास साधक बाधक चर्चा झाली. या वादविवादातून पंडित धोंडिरामांचे वैचारिक मोठेपण मान्य करून शंकराचार्य यांनी पंडितांना ‘सरसुभे’ (मुख्य कारभारी) केले, प्रस्तुत बैठकीनंतर पंडित धोंडिराम यांनी संवादशैलीत ‘वेदाचार’ (वेदातील आचार) हा सत्यशोधकी पठडीतला ग्रंथ लिहून वेदातील आचार हे असत्य असल्याचे जोरकसपणे नमूद केले, वेद है सत्यशोधकांपुढे बापुडे असल्याच्या निष्कर्षापर्यंत श्रीडिराम आले. वेदप्रामाण्य खूळ असून, वेदांचा अभिमान बाळगणे गैर असल्याचे म्हटले, यज्ञ संस्थेत कसलेही पावित्र्य नसून पूर्णपणे गौडबंगाल असल्याचे पंडितांनी पुढे म्हटले, आज ब्राह्मण मांसाहार वर्ज्य मानत असले तरी त्यांचे पूर्वज ऋषीमुनी यज्ञाच्या प्रसंगी विविध प्राण्यांची आहुती देऊन मांसाहार करीत असल्याचे पंडितांनी नमूद केले आहे. थोडक्यात, वैदिक धर्मातही आपले ब्राह्मणी वर्चस्व कायम राहातो म्हण्णून उच्चवर्णीयांनी वेदातही लबाड्यांच्या नोंदी केल्या असल्याचे मतही पंडितांनी समारोपात मांडले आहे. असा हा वेदाचार पंडित धौडिराम आणि शिवराम गोपाळ सावंत यांच्या संवादात्मक शैलीतून उतरला आहे, या ग्रंथावर महात्मा फुले यांच्या ‘गुलामगिरी’ ग्रंथाचा प्रभाव जाणवतो. हा ग्रंथ नोव्हेंबर १८९६ साली एक सत्यशोधक लक्ष्मणराव गोपाळराव सावंत, देसाई, बॉम्बे ४थी रावपाल, जमादार,

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button