सोशल

आज नाही तर कधीच नाही” “उठ ओ बी सी वेळीच जागा हो, तुझ्याच भविष्यासाठी संघर्षाचा धागा हो.”

🌷 प्रबोधन – ९५ ‌🌷
“आज नाही तर कधीच नाही”

“उठ ओ बी सी वेळीच जागा हो, तुझ्याच भविष्यासाठी संघर्षाचा धागा हो.”

ओबीसी म्हणजेच इतर मागास (BC) वर्गिय,त्यात सध्या धनगर, माळी, वंजारी,बंजारी,तेली,वड, गोलेवार कुणबी, पद्मशाली, धोबी परिट, शिंपी,निराळी,रंगारी,भोई, यलम, कैकाडी,गोंधळी,वासुदेव, वैदू, मसनजोगी ,सुतार,लोहार, सोनार,पाटकरी,गंवडी, बेलदार, वडार,जोशी,जंगम,वाणी,गोसावी,घिसडी,भावसार,विश्वकर्मा असे अलुतदार,बलुतेदार,भटके,विमुक्त जाती‌ वैगरे महाराष्ट्रात ३७२पेक्षा जास्त जाती ओबीसींत मोडतात.
यात बरेच जाती एससी,एसटी मध्ये जाण्यासाठी संघर्ष करीत आहेत.पंरतू त्यांची आज तारखेला संख्या किती हे माहीत नसल्यामुळे आणि बोगस संख्या (उदा .मराठा ३२टक्के बोगस संख्या सांगून शासनाची,कोर्टाची फसगत करीत आहे म्हणून कोर्टात टिकत नाहीत) सांगून कोर्टात टिकत नाहीत.कारण दर दहा वर्षाला जनगणनेत एससी, एसटी ची जशी जनगणना होते तशी ओबीसीची जात निहाय जनगणना होत नाही ,जातनिहाय जनगणना झाली तरच आपणाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मागण्याचा हक्क राहील आणि एससी,एसटी प्रमाणे विधानसभा,लोकसभा , शैक्षणिक,नौकरी व सर्व क्षेत्रात आरक्षण मिळेल. ओबीसीची जातीनिहाय जनगणना न झाल्यामुळे उपेक्षित राहीला आहे,आणि ओबीसीचे शासनातील १००टक्के बजेट प्रस्थापित वर्ग लाटत आहे. आपली संख्या माहीत नसल्यामुळे आपण कोर्टात टिकत नाही.म्हणून आपली जातीनिहाय जनगणना होणे जरूरी आहे. आपण आपल्या मतावर निवडून दिलेले सरकार केंद्रात बसले आहे तर मग आपल्यावर अन्याय होत आहे म्हणून त्यांना सांगणे हे आपले कर्तव्य आहे. आपणच म्हणतो आई रडल्या शिवाय दुध पाजत नाही.मग आपल्या सरकारला सांगीतलं पाहिजे. आपण आपल्या जातीच नेतृत्व करतो,त्या जातीची समश्या सरकार दरबारी मांडणे आपले कर्तव्य नाही का ? आहे समजून राष्ट्रपती,प्रधानमंत्री यांना जातीनिहाय जनगणना करा म्हणून आजच ग्रामपंचायतचे ठराव पाठवा,संघटणेचे निवेदन द्या, धरणे आंदोलन करा,मोर्चा काढा,आणि शासनावर दबाव वाढवून जातीनिहाय जनगणना करून घ्या,आपण मर्द आहात मग आजा नाही तर कधीच नाही या भावनेने सर्व समाज संघटनेच्या‌ समदुःखी समाज बांधवांनी व नेत्यांनी एकत्र या आणि आजच कामाला लागा आणि तुमचे भविष्य उज्ज्वल करून घ्या.
(लोक जागृती साठी समाजात मॅसेज पाठवत जावे)

” प्रेम हे अहो हम सब बंधू है ”
— जय भारत
— गोविंदराम शूरनर
राष्ट्रिय सत्यशोधक समाज संघ

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button