टॉप न्यूजमहाराष्ट्रराजकारण
सावता महाराज यांच्या चंदन उटी कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब ओबीसी विकास मंत्री अतुलजी सावे साहेब अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे अरणला उपस्थित!
संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी सावता महाराज यांची चंदन ओटी चा कार्यक्रम या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमारजी गोरे साहेब राज्याचे ओबीसी बहुजन विकास मंत्री अपारंपारिक ऊर्जामंत्री माननीय अतुलजी सावे साहेब इत्यादी मान्यवर आरण तीर्थक्षेत्राला भेट देऊन सावता महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण विकासाबाबत बोलत होते

सावता महाराज यांच्या चंदन उटी कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब ओबीसी विकास मंत्री अतुलजी सावे साहेब अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे अरणला उपस्थित!
- संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी सावता महाराज यांची चंदन ओटी चा कार्यक्रम या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमारजी गोरे साहेब राज्याचे ओबीसी बहुजन विकास मंत्री अपारंपारिक ऊर्जामंत्री माननीय अतुलजी सावे साहेब इत्यादी मान्यवर आरण तीर्थक्षेत्राला भेट देऊन सावता महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण विकासाबाबत बोलत होते
चंदन ओटी कार्यक्रमास अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे सासवड माळी शुगर डायरेक्टर रंजन भाऊ गिरमे अखिल भारतीय समता परिषद माजी जिल्हध्यक्ष हरिभाउ गावंधरे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे माननीय राजाभाऊ भंडारे शेज बाभूळगाव माजी सरपंच आमदार अभिजीत पाटील रणजीत बबन शिंदे शिवाजीराजे कांबळे भारत आबा शिंदे प्रकाश अण्णा काटे अण्णा दामू अण्णा माळी गोरे पांडुरंग शिंदे राजकुमार हिवरकर कुंडलिक माळी सर चंदाराणी आतकर आदी मान्यवर संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी तीर्थक्षेत्र अरण मंदिराचे पुजारी सावता महाराजांचे मुलीचे वंशज सावता वसेकर पुजारी त्यांच्याबरोबर इतरही काही सावता महाराजांचे वंशज उपस्थित होते सर्व पुजारी कार्यक्रमाच्या ठिकाणी मंचकावर दिसत नव्हते अचानक मंत्री महोदयाचा समजलेला कार्यक्रमास अरण पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात सावता भक्त उपस्थित होते
सावता महाराज यांची पुण्यतिथी आषाढ वैद्य चतुर्दशीला असतो त्यावेळी चंद्रभागेच्या नदीला पूर आलेला असतो नेहमी पाणी असते त्यामुळे नदीच्या पलीकडे दहा-पंधरा गावातील सावता भक्त या कार्यक्रमाला येऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी या गावातील सर्व मंडळींनी म्हणजे भीमा नदीच्या पलीकडे माळशिरस तालुक्यातील संगम नेवरे बोरगाव श्रीपुर महाळुंग या भागातील सर्व सावता भक्तांनी मिळून चैत्र महिन्यामध्ये हा चंदन ओटी चा कार्यक्रम शेकडो वर्षापासून चालू ठेवलेला आहे याच दिवशी महाराजांच्या समाधीला चंदनाचे लाकूड घासून घासून त्याचा लेप सर्व समाधीला लावला जातो आणि उष्णतेपासून रक्षण होण्यासाठी या चंदन ओटी चा कार्यक्रम करून महापूजा केली जाते भजन कीर्तन आरती होते महाप्रसादाचा कार्यक्रम होतो असा हा पारंपारिक कार्यक्रम शेकडो वर्षापासून चालू आहे सावता महाराज यांच्या संजीवन समाधीस अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा म्हणून सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी अनेक आंदोलन केली निवेदन दिले आठ सामुदायिक विवाह या ठिकाणी अखिल भारतीय माळी महासंघाच्या अनेक मीटिंग वार्षिक अधिवेशन मेळावे वधु वर मेळावे शिबिर अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम राबवून सावता महाराज तीर्थक्षेत्राचे महत्त्व गेल्या 30-35 वर्षापासून वाढवण्याचा कार्यक्रम महाराजांच्या 700 व्या पुण्यतिथी पासून म्हणजेच 1995 पासून या ठिकाणी 700 पुण्यतिथी ला सातशे दिवे सावता नावाच्या व्यक्तीच्या हस्ते लावून सोलापूर जिल्ह्यात 25 दिशादर्शक फलक लावून सावता महाराज यांची सातशे वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली होती तेव्हापासून या गावचे महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली आणि अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्यामार्फत मोठ्या मोठ्या मिठींगा घेऊन महाराजांचे नाव अरण पासून अमेरिकेपर्यंत लिंगे यांनी पोहोचविले सावता महाराज यांच्या संजीवन समाधीचे शासनामार्फत सुशोभीकरण अ वर्ग दर्जा देऊन गावचा विकास सावता महाराज यांच्या नावाने वनौषधी संशोधन केंद्र संत महात्मे यांच्या विचाराचा प्रचार प्रसार केंद्र यात्रेसाठी मोठे पटांगण नारळ हंडी साठी मोठे पटांगण स्टेडियम गटार नळ पाणी योजना रस्ते सुशोभीकरण कारण ते गिड्डेवाडी पालखी मार्ग शिषोभीकरण वनीकरण असे अनेक उपक्रम या ठिकाणी सावता भक्तासाठी भक्तनिवास मंगल कार्यालय इत्यादीची मागणी सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी अनेक वेळा शासनास केली होती या अगोदर 12 फेब्रुवारी 1998 गोपीनाथ रावजी मुंडे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अ वर्ग तीर्थक्षेत्राची घोषणा केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनीही गेल्या वर्षी निवडणुकीच्या अगोदर चार ऑगस्ट 2024 रोजी ही घोषणा केलेली होती अ वर्ग तीर्थक्षेत्राला दर्जा देऊन विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवल्याचे सांगितले होते परंतु आज तागायत या कामाची सुरुवात झालेली नाही आराखडा तयार झालेला नाही किंबहुना तो मंजूर झालेला नाही तस गॅजेट किंवा शासकीय अध्यादेश निघालेला नाही आजही ग्रामविकास मंत्री गोरे साहेब यांनी आदेश निघाला असल्याचे सांगितले नाही राजपत्रित आदेश निघाल्यानंतरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केलेली आहे ते सध्या मुख्यमंत्री आहेत ते याचे काम पाहत आहेत आणि हा आराखडा मंजूर झाल्यानंतरच ते या ठिकाणी उपस्थित राहून या संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधीचे अ वर्ग तीर्थक्षेत्र वर्गात रूपांतर करून या गावचा विकास करण्यासाठी उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन या गावचा विकास आराखडा मंजूर करून त्याचे उद्घाटन करतील असे सांगितले ओबीसी विकास मंत्री अतुलजी सावे साहेब यांनी ओबीसी समाजासाठी आपण काय काय योजना करीत आहेत ते सांगितले परंतु ओबीसी समाजासाठी या बजेटमध्ये फक्त पाच कोटी दिल्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी घोषित केले होते पाच कोटी म्हणजे एका माणसाला 55 पैसे फक्त येतात असा ठोस कार्यक्रम ओबीसीसाठी अद्याप केलेला नाही जात निहाय जनगणना केली नाही त्यामुळे ओबीसीची आरक्षण 40 टक्क्यांनी कमी झाले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी चे आरक्षण कोर्टात टांगणीला लावले आहे त्यामुळे पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच नाहीत तरी पण अतुलजी साहेब यांनी ओबीसी समाजासाठी अनेक योजना तयार करत असून त्या राबविण्याचे काम पूर्वी ज्या ठिकाणी 10 विद्यार्थी परदेशी शिकण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळत होती परंतु आत्ता ती 75 वर आम्ही नेलेली आहे असे अनेक लहानशी काम त्यांनी सांगितली परंतु ठोस काही सांगितलेले नाही आज मंत्री महोदयाच्या हस्ते अ वर्ग तीर्थक्षेत्राचा आराखडा उद्घाटन कार्यक्रम होणार होता तो तो झाला नाही यामुळे सावता भक्तामध्ये थोडीशी नाराजी पसरली होती आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आले

