सावता प्रतिष्ठान हे समाजासाठी ऊर्जा केंद्र बनावे- एड.सुभाष राऊत

बीड (प्रतिनिधी) ता.३ समाजातील ज्येष्ठ लोकांनी एकत्रित येऊन सावता प्रतिष्ठान बाबत जो संकल्प केला आहे आणि हा संकल्प प्रत्यक्षात ते उतरवत आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे.सावता प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री संत सावता महाराज मंदिर आणि मंगल कार्यालय असा संकल्प आहे. मात्र त्यांनी एवढ्यावरच न थांबता समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, वाचनालय आणि स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका असे देखील उपक्रम राबवावेत.
माळी समाजासाठी हे एक ऊर्जा केंद्र बनावे ,समाज यासाठी निश्चितपणाने सकारात्मक आहे. मी देखील माननीय भुजबळ साहेबांकडून भरीव स्वरूपाची आर्थिक मदत मिळवून देण्यात कमी पडणार नाही.असे आश्वासन महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष आणि सिनेट मेंबर एड.सुभाष राऊत यांनी दिले.
एड.राऊत हे येथील सावता प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या माळी समाजातील इयत्ता दहावी, बारावी आणि अन्य स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजातील ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक श्री नामदेवराव दुधाळ होते.प्रमुख अतिथी म्हणून अ.भा. माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शंकरराव लिंगे, पंचायत समितीचे सदस्य राजाभाऊ गवळी, नामदेव काळे, दिलीप बनसोडे तसेच मंदिर ट्रस्टचे मोहनराव गोरे,पी आर दुधाळ संतराम पानखडे, नितीन साखरे इत्यादींची उपस्थिती होती.
प्रारंभी श्री संत सावता महाराज, म.ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत देखील यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे प्रा.लक्ष्मण गुंजाळ यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी ट्रस्टचा गेल्या सहा महिन्यापासून च्या कामाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. प्रतिष्ठानचा संकल्प जाहीर केला. समाज बांधवांच्या वर्गणीवर हे मंदिर होतअसले तरी याचे मंगल कार्यालयात रूपांतर करण्यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज असल्याचे सांगून प्रत्येकाने यासाठी खारीचा वाटा उचलावा. ट्रस्टचे पदाधिकारी आणि माळी समाजातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत राजकीय लोकांपर्यंत जाऊन आर्थिक निधी जमा करण्याची कल्पना देखील त्यांनी मांडली. उपस्थितांनी या भूमिकेचे जोरदार समर्थन केले.
अ.भा. माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शंकर अण्णा लिंगे यांनी उपस्थितांना तसविस्तर मार्गदर्शन केले. माळी समाज नवनिर्माता आहे.कष्ट आणि प्रामाणिकपणा त्याच्या रक्तातच आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे पारंपरिक मागासलेपण आपल्या समाजात आहे. हे मागासले पण दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. माळी समाजाला ओबीसीच्या प्रवाहात आणून आपले आत्मभान जागविले पाहिजे. समाज विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण आपले आदर्श निश्चित केले पाहिजेत. कर्मयोगी सावता बाबा ,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले हे तर आपले आदर्श आहेतच परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेली राज्यघटना देखील आपले आदर्श आहेत. आपल्या समाजात आता ऐक्य वाढले पाहिजे. आपल्या ताकतीचे प्रदर्शन आपल्याला करता आले पाहिजे. आणि प्रसंगी लढाऊ बाणाआपण दाखवलाच पाहिजे. असे प्रतिपादन केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते एकूण 40 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सह त्यांच्या पालकांचा सन्मान महापुरुषांचे आत्मचरित्र पर पुस्तके आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला .या कार्यक्रमासाठी स्मृती चिन्हांचे प्रायोजकत्व विज्ञानशिक्षक श्री श्यामसुंदर घाडगे यांनी स्वीकारलेहोते. प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांना समायोजित मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेसाठी काही टिप्स दिल्या. विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने संगीता दुधाळ यांनी माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला याबद्दल आनंद व्यक्त केला.
दरवर्षी असे कार्यक्रम आयोजित करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.समाजाचे ऐक्य,बळ अशा कार्यक्रमातून वाढेल आणि समाजाने देखील समाजाने सावता प्रतिष्ठान कडे सकारात्मक पहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.याच कार्यक्रमात श्री नामदेव काळे( प्राचार्य, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय मानूर) यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करण्यात आला. त्यांनी सत्काराला उत्तर देऊन 11000 चा चेक मंदिरासाठी देणगी म्हणून ट्रस्टीकडे सोपवला तर राजाभाऊ गवळी यांनी देखील पाच हजार रुपये रोख ट्रस्टींकडे मंदिर बांधकामासाठी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद ढवळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालक, विविध संघटनांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन साखरे यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले.
**शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा *

