शिपाई नाही तर पाणी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातलं हे प्रकरण काय आहे नक्की वाचा.

शिपाई नाही तर पाणी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातलं हे प्रकरण काय आहे नक्की वाचा.
– परमेश्वर बनकर, बीड 9503288282
अस्पृश्यतेचे चटके जेवढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला आले तेवढे कोणत्याच महापुरुषांच्या वाट्याला आले नाहीत हे वास्तव आपल्या सर्वांनाच माहिती आहे.सातारा येथील सातारा हायस्कूल मधील इंग्रजी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1904 मध्ये रामजी आंबेडकरांनी सहपरिवार मुंबई ला जाण्याचा निर्णय घेतला.
रामजी सहपरिवार मुंबई मधील लोअर परळ भागात राहु लागले. मुंबई मधील एल्फिन्स्टन हायस्कुल मध्ये बाबासाहेबांचे नाव दाखल केले. एल्फिन्स्टन हायस्कुल मध्ये बाबासाहेबांना अस्पृश्यतेचा मोठ्या प्रमाणात अनुभव आला.बाबासाहेबांना इतर मुलांपेक्षा वेगळं बसाव लागत होतं. बाबासाहेबांना हायस्कूल मध्ये पाणी पिण्यासाठी असलेल्या भांड्याला किंवा पेल्याला हात लावू दिला जात नव्हता.
त्या शाळेतील शिपाई बाबासाहेबांना उंचीवरून ओंजळीत पाणी टाकायचा आणि मग बाबासाहेब पाणी पियायचे. शिपाई जर सुट्टीवर असेल तर बाबासाहेबांना दिवसभर पाणी सुद्धा मिळत नव्हतं. या घटनेची नोंद करताना बाबासाहेब म्हणतात कि शिपाई नाहीतर पाणी नाही.एवढच नव्हे तर अस्पृश्य म्हणून बाबासाहेबांना संस्कृत विषय सुद्धा घेता आला नव्हता त्या जागी बाबासाहेबांनी पर्शीयन विषय निवडला होता.
हा प्रसंग वाचताना आपल्याला वाईट वाटतं तर ज्या बाबासाहेबांनी हे सगळं अनुभवलं आहे त्यांना किती वाटत असेल. तरीही खचून न जाता बाबासाहेबांनी जी क्रांती केली त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.जय भीम जय भारत.. आहे देण बंधू संपादक सत्यशोधक शंकरराव विद्या 73 87 37 77 शून्य एक हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा




