महाराष्ट्र

इंदापूरच्या आमदार साहेबांची नेहेमीची परंपरा कायम, कामे करण्याची परंपरा नाही तर दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याची परंपरा..

इंदापूरच्या आमदार साहेबांची नेहेमीची परंपरा कायम, कामे करण्याची परंपरा नाही तर दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याची परंपरा..

आपल्या इंदापूरचे आमदारसाहेब सातत्याने दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. हे श्रेय घेत असताना आपण आमदार कधी झालात कामाचा पाठपुरावा कधीपासून सुरू आहे. आणि ते काम कोणी मंजूर केले याचा तरी अभ्यास आमदारांनी करायला हवा होता.

मात्र एखादे काम मंजूर झाले की लगेच इंदापूरचे आमदारसाहेब जाहिरात आणि श्रेय घेण्यास तयारच असतात. ते काम कोणत्या विभागामार्फत झाले आहे याची देखील माहिती त्यांना अनेकदा नसते पण लगेचच तालुक्यात गाजावाजा करायला मोकळे होतात.

केल्यावर केलंच म्हणा, पण आपल्या आमदारकीच्या अपयशाचे खापर आपण दुसऱ्यांनी मंजूर केलेली कामे करून करत असाल तर हे खूप खेदजनक आहे. आणि आता तालुक्यातील जनता सगळं काही ओळखून आहे. ही जनता आता फक्त 2024 ची वाट बघत आहे.

तेव्हा हीच इंदापूरची जनता सांगेल की कोणी कोणती कामे केली. कोणी कोणत्या संस्था आणल्या चालवल्या आणि हीच जनता सांगेल कोणी संस्था चालवत असताना अडचणी निर्माण केल्या. कोणत्या संस्था बंद पडण्यास हातभार लावला.

त्यामुळे आता राहिलेल्या काळात तरी काहीतरी चांगलं करा आणि दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचे बंद करा. श्रेय हे लोकांनी द्यावं लागतं, ते स्वतःच घेयचं नसतं. आमदार साहेब लक्षात ठेवा आता जनतेने लक्षात ठेवलंय…!!

दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधन करावे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button