सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण

यशवंत झगडे यांनी काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. ते म्हणतात, ‘मराठा आरक्षणाच्या वाढत्या मागणीचा दबाव खाली येत २००४ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘कुणबी मराठा या नवीन जातीला जन्म दिला. अभ्यासक राजेश्वरी देशपांडे यांच्या मते कोणत्याही मानववंशशास्त्रीय पुराव्याशिवाय ही प्रक्रिया पार पाडली गेली.’

मराठा आरक्षण सत्य की राजकारण’ या लेखात प्रदीप ढोबळे यांनी एक महत्त्वपूर्ण प्रश्न अधोरेखित केला आहे. ते म्हणतात, इंदिरा साहनी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले आणि संपूर्ण २७ टक्के आरक्षणाला क्रिमिलियर लावलाः मग हाच न्याय संपूर्ण खुल्या वर्गाच्या जागांसाठी का नाही ? कमीत कमी खुल्या वर्गातील ५० पैकी २५ टक्के आरक्षण गरिबांसाठी का नाही?’ आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम समजणा-यांना हा त्यांनी टोला लगावला आहे.

डॉ. राजू जाधव यांनी आपल्या ‘ओबीसी मराठा आरक्षण आणि जातीउच्चभ्रूचे वर्गीय हितसंबंधांचे राजकारण’ ह्या दीर्घ लेखात अनेक महत्वाच्या मुद्यांची साधार उकल केली आहे. ते म्हणतात, ‘ओबीसी विरुद्ध मराठा असा हा सामाजिक संघर्ष जातीव्यवस्थेच्या अरिष्टाकडे निर्देश करत असला तरी शास्तावर्ग या अरिष्टांचा उपयोग जाती समूहांमध्ये तेढ निर्माण करत स्वतःची वोट बैंक मजबूत करून निवडणुकांमध्ये जय मिळविण्यासाठी पद्धतशीर व्युहरचना राबवत आहे’. तसेच ते म्हणतात, ‘प्रभावशाली मराठा नेत्यांनी मराठ्यांची संख्या वाढविण्यासाठी कुणब्यांना मराठ्यांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला.

कारण प्रतिनिधित्वावर आधारलेल्या निवडणूक पद्धतीत संख्याबळ महत्त्वाचे वाढ वा निर्णायक ठरत असल्याने स्वतःच्या जातीची वोट बैंक वाढवणे आवश्यक असल्याची समज तत्कालीन मराठा नेत्यांना झालेली होती. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी कुणब्यांना जनगणनेत आपली नोंद मराठा म्हणून करण्याचे आवाहन केले. तिरळे पाटील ह्यांचे उदाहरण प्रसिद्ध आहे.’ तसेच त्यांनी अजून एक महत्त्वपूर्ण सवाल उपस्थित केला आहे,’ छगन भुजबळ घणाघातीपणे मनोज जरांगे पाटलावर टीका करतात,

मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करतात, पण सरकारमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व असणाऱ्या सरकारमधून बाहेर पडत नाहीत. मराठा आरक्षणासाठी आम्ही बांधील आहोत म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेचा निषेध करत नाहीत’. खरे तर मराठ्यांनी ओबीसींशी जातीयुद्ध नव्हे तर आपल्या स्वजातीच्या व बाहेरच्या वर्गशत्रूची लढण्याची वेळ आली असल्याचे विधान डॉ. राजू जाधव करतात.

‘भान नसलेले आंदोलन’ हा राजाराम सूर्यवंशी यांचा लेख अनेक महत्त्वाची

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण
प्राप्त करून दिले, त्यातून काही अंशी जाती अस्मितेच्या राजकारणाला बळ मिळाले. परंतु हे जाती अस्मितेचे राजकारण जात्यांतक दिशेने न जाता जात्योन्नतीकडे आणि बरंतु जातीसमर्थक शक्तीच्या जनाधार बनण्याकडे घेऊन गेले. त्यामुळे ओबीसी ही फक्त एक शासकीय व आरक्षणविषयक ओळख बनून राहीली. तिला समाजपरिवर्तक आशय स्वतःमध्ये भरण्यास अपयश आले. त्यामुळे जातीसमर्थक उजव्या शक्तीचा जनाधार मोठ्या प्रमाणावर ओबीसी जनसमूह राहिला आहे.

परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे, भारतातील समाज परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ओबीसी जातीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. साहजिकच ओबीसी जनसमुहाला उजव्या शक्तीच्या आश्रयापासून तोडावे लागणार आहे. अलीकडील काळात ओबीसींमध्ये स्वभान विकसित होण्याची प्रक्रिया काहीशी गतिमान बनल्याचे दिसून येत होते. मराठा आणि ओबीसी या जनसमुहांना एकमेकांच्या विरुद्ध उभे करणे त्यामुळेच उजव्या शक्तींना आवश्यक वाटत होते. म्हणूनच सध्याच्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा गुंता उजव्या शक्तींनी ओबीसींचा जनाधार टिकून ठेवण्यासाठी केलेली योजना आहे की काय अशी शंका येण्याला जागा आहे. उजव्या शक्तीचा हा डाव ओळखून त्याला पर्याय उभा करायचा असेल तर ओबीसी आणि मराठा अशा दोन्ही बाजूंच्या नेतृत्वाच्या वर्गीय हितसंबंधाचे राजकारण उघड केले पाहिजे.

हे पुस्तक त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्रात अनेक शेतकरी मराठे विपन्नावस्थेमध्ये आहेत. पण त्यांची विपन्नावस्था आरक्षणाच्या मार्गाने दूर होणार नाही. तर ती शेती, शेतीचे आधुनिकीकरण, जोडधंद्यांची उभारणी, शिक्षणाच्या सोयीची उपलब्धता, शेतीस पूरक व पर्यायी रोजगाराची उपलब्धता अशा बहुविध उपायांच्या माध्यमातून गरीब शेतकरी मराठ्यांना आपल्या उन्नतीचा मार्ग सापडणार आहे. आपल्याला त्यांना स्वजातीतील उच्चभ्रूचे स्वार्थी राजकारण उघड करून दाखवावे लागणार आहे. तरच मराठा आंदोलनाला सकारात्मकता प्राप्त होऊ शकते.

त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ओबीसींनीही आपल्या जातींच्या नेत्यांचे वर्गीय राजकारण समजून घ्यावे लागेल. त्यांना संघपरिवाराची उजवी विचारधारा नव्हे तर फुले-शाहू आंबेडकरांची विचारदृष्टीच अंगीकारावी लागेल. परंतु हे काही आपोआप घडून येणार नाही. त्यासाठी विविध पातळ्यांवरती सक्रिय प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रस्तुतचे पुस्तक हा या सक्रिय प्रयत्नांचाच एक भाग आहे. पुस्तकात समाविष्ट लेख या क्षेत्रातील विविध मान्यवरांनी लिहिले आहेत. ते या प्रश्नांची बहुमुखी व सर्वांगीण चर्चा करण्याचा प्रयत्न करतात.

‘मराठ्यांचे ओबीसीकरण : राजकीय लोकशाहीला आव्हान’ या लेखात तेवरही

क्रमशः भाग 3
🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button