मराठ्यांपासून ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी राजकीय आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. नारायण काळेल माढा लोकसभा निवडणूकीच्या मैदानात!

प्रेस नोट सांगोला 29 एप्रिल 2024
मराठ्यांपासून ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी
ओबीसी राजकीय आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. नारायण काळेल माढा लोकसभा निवडणूकीच्या मैदानात!
2004 सालापासून दिलेली सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा, जातनिहाय जनगणनेचा कायदा व रोहिणी आयोगाच्या अंलबजावणीचा कायदा करण्यासाठी ओबीसी राजकीय आघाडीतर्फे 2024च्या लोकसभा निवडणूकीत माढा मतदारसंघात प्रा. नारायण काळेल यांना अधिकृत उमेदवार उभे केले आहे. मतपत्रिकेतील त्यांचा क्रमांक 21 असून त्यांचे चिन्ह चालण्याची काठी आहे.
नारायण काळेल हे फुलेशाहूआंबेडकरी चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्ते असून विद्यार्थी जीवनापासूनच त्यांनी ओबीसी चळवळीत सहभाग घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीय व भारतातील दलित-ओबीसी साहित्यावर त्यांनी संशोधन करून डॉक्टरेट (पीएचडी) प्राप्त केलेली आहे.
माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ‘शिंदे समिती’ स्थापन करून प्रत्येक मराठा कुटुंबाला कुणबी प्रमाणपत्र दिले आहे. भारताच्या इतिहासात आजवर कोणत्याही सरकारने एका जातीच्या नोंदी शोधण्यासाठी समिती स्थापन केलेली नाही. परंतू स्वजातीच्या हितासाठी सरकारी यंत्रणा राबवून त्यांना गैरमार्गाने ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवून देणारे मुख्यमंत्री ओबीसी आरक्षण नष्ट करायला निघालेले आहेत. महाराष्ट्रात आता यापुढे कोणत्याही नोकरभरतीत खोटे ओबीसी अर्ज करतील व खर्या ओबीसीला शिपायाची नोकरीसुद्धा मिळू देणार नाहीत. ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर आता निवडणूका लढवून सत्ता हस्तगत केल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
ओबीसी राजकीय आघाडीचे उमेदवार नारायण काळेलसर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. श्रावण देवरे यांनी केले.
डॉ. काळेल निवडून आल्यानंतर लोकसभेत कायदे करण्यासाठी विधेयक मांडतील-
1) 2004 सालापासून कुणबी-मराठा व मराठा-कुणबी अशा प्रकारची खोटी कुणबी प्रमाणपत्र देण्याचे सुरू झालेले आहे. माननीय मुख्यमंत्री शिंदे यांनी निजामाच्या कागदपत्रातून खोट्या नोंदी तयार करून खोटी कुणबी प्रमाणपत्रे दिलेली आहेत. ही सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करणे 2) दर दहा वर्षांनी जातनिहाय जनगणना करणे तसेच दलित, ओबीसी व आदिवासींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण व बजेटमध्ये तरतूद करणे 3) तसेच मायक्रो ओबीसींना न्याय देणारा रोहिणी आयोगाच्या अमलबजावणी करणे. 4) आरक्षणासारख्या सर्व उपक्रमांमध्ये दलित, ओबीसी, आदिवासी व मॉयनॉरिटीज महिलांना 50 टक्के हिस्सा देणे 5) शेतकर्यांसाठी स्वामीनाथन अहवालाच्या अमलबजावणी करणे. 6) ईव्हिएम-मुक्त निवडणूका करण्यासाठी बॅलेटपेपरवर निवडणूका घेणे 7) एलेक्र्टोरल बॉण्ड रद्द करणे भ्रष्टाचारमुक्त निवडणूका घेणे. 8) आजवर झालेले सर्व कामगारविरोधी कायदे रद्द करणे 9) शेतीसाठी वीज पाणी खते बी-बियाणे मोफत कर्जपुरवठा बिनव्याजी देणे रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करणे देशात मिळणारे पावसापासून पाणी 141000 टीएमसी इतके आहे त्यापैकी 75 हजार टीएमसी हवेत बाष्पीभवन होते 40,000 टीएमसी अडविले आहे राहिलेले पस्तीस हजार टीएमसी पाणी अडवणे बाष्पीभवन कमी करणे पाण्याचे समान वाटप करणे तुषार सिंचन ड्रिप इरिगेशन वापरणे साठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे
10) केजी ते पीजी शिक्षण मोफत देणे वैज्ञानिक दृष्टिकोन व्यवसायभिमुख फिलॉसॉफी वापरून शिक्षण देणे 11) खाजगीकरण थांबविणे सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवणे12) श्रेणी एक मधील पगार कमी करून श्रेणी चारच्या दुप्पट देणे जुनी पेन्शन योजना लागू करणे अग्निविर योजना बंद करून पूर्वीप्रमाणे सैन्य भरती करणे13 )सर्व क्षेत्रात लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण देणे तशी बजेट तरतूद करणे14) स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुका ताबडतोब घेणे115) सहकार क्षेत्रासह पूर्ण मंडल आयोग लागू करणे 16 शेतकरी शेतमजूर यांना पेन्शन देणे सुशिक्षित बेकारांना प्रशिक्षण भत्ता बेकार भत्ता देणे
अशाप्रकारचे कायदे करण्याचे ठोस आश्वासन देणारा ओबीसी राजकीय आघाडी हा एकमेव पक्ष आहे. ओबीसींच्या हक्कांसाठी रस्त्यावरची, शासकीय व न्यायालयीन लढाई लढणारा एकमेव पक्ष म्हणजे ओबीसी राजकीय आघाडी आहे. त्यामुळे ओबीसी, दलित, आदिवासी व मॉयनॉरिटिज जनतेने ओबीसी राजकीय आघाडीचे अधिकृत उमेदवार क्रमांक 21 डॉ. नारायण काळेल यांना चालण्याच्या काठीसमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
वरील प्रमाणे बातमी आपल्या लोकप्रिय बातमीपत्रात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती
आपले विनीत
प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी
सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन
डॉ. नारायण काळेल, माढा लोकसभा निवडणूक उमेदवार
ओबीसी राजकीय आघाडी
माढा लोकसभा मतदार संघ संपर्क कार्यालय सत्यशोधक शंकरराव लिंगे एकतपुर रोड हायवे ब्रिज जवळ सांगोला 73 87 37 78 01
🔴🔴🔴🔴🟡🟡🟡🟡🟠🟠🟠🟠
सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
💐💐💐💐💐💐💐💐
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधकj शंकरराव लिंगे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
७३८७ ३७७८ ०१




