सोशल

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.35

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.35

बायबल हा पवित्र ग्रंथ आहे असे त्यांनी वारंवार म्हटले आहे. तरीदेखील त्यातील अद्भुत कथाभाग वगळून उदात्त नीतितत्त्वांचाच त्यांनी उदोउदो केला आहे. तसेच महाराष्ट्रात खिस्ती धर्मोपदेशकांनी खालच्या जातींतील लोकांना वियेची गोडी लावण्याचे कार्य हाती घेतले होते. जोतीरावांच्या स्वतःच्या कामातही त्यांनी त्यांना वेळोवेळी साह्य केले होते. त्यांच्याशी काही मतभेद झाले, तरी त्यांच्याविषयीची कृतज्ञतेची जाणीव जोतीरावांनी सदैव कायम ठेवली होती.

पेन यांचे राजकीय-सामाजिक विचार

पेन यांच्या धार्मिक विचारांनी जोतीराव प्रभावित झाले होत. त्यावरोबरच त्यांनी त्यांच्या राजकीय व सामाजिक विचारांच्या अंतःसूत्राचाही शोध घेतला होता. मानवतेची प्रतिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह आणि गुलामगिरीचा निषेध ही तत्त्वत्रयी हेच पेन यांच्य समग्र विचारप्रणालीचे अंतःसूत्र होय. वास्तविक पाहता ही तीन तत्त्वे एकमेकांपासून अलग काढता येत नाहीत. स्वातंत्र्याचा आग्रह आणि गुलामगिरीचा निषेध या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; आणि ही दोन्ही तत्त्वे मुळात मानवतेच्या प्रतिष्ठेत अंतर्भूत आहेत. जोतीरावांनी देखील आपल्या लेखनांतून आणि कृतींतून याच तत्त्वत्रयीचा सातत्याने पाठपुरावा केला आहे.

पेन यांनी विविध विषयांवर लिहिले आहे, परंतू त्यांचे लक्ष प्रथम निग्रोंच्या गुलामगिरीच्या प्रश्नाकडे गेले. ‘Justice and Humanity’ हा त्यांचा पहिला लक्षणीय लेख. त्यात त्यांनी या प्रश्नाची चर्चा केली आहे. गुलामांच्या व्यापारात किती अमानुषता भरलेली आहे आणि गुलामगिरीची पद्धत किती असमर्थनीय, अनैतिक व उद्वेगजनक आहे ते पेन यांनी आपल्या अजोड युक्तिवादाने या लेखात सिद्ध करून दाखविले आहे. एवढ्या मोठ्या लोकसमूहाला आपल्या देशात आपण अन्यायाने गुलाम म्हणून राबवतो. तेव्हा आपल्याला ब्रिटिश राज्यकर्त्यांना दोष देण्याचा काय नैतिक अधिकार आहे असा प्रश्न त्यांनी अमेरिकेतील लोंकांना विचारला आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी अस्पृश्यांच्या संदर्भात काढलेला अशा अर्थाचा उद्‌गारही सर्वश्रुत आहे. पेन यांचा हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या पाच आठवड्यांत फिलाडेल्फियात

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button