महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य उद्योग विभागाचे सह-संचालक आणि मेक इन इंडिया कार्यक्रमाचे वरिष्ठ अधिकारी मोठे बंधू श्री.नितीनजी कोळेकर साहेब त्यांना भेटण्याचा आणि चर्चा करण्याचा योग आला….

काल मंत्रालय मुंबई या ठिकाणी गेलो असता उद्योग व MAKE In INDIA विभागातील एका कार्यालयात एक उत्कृष्ठ सनदी अधिकारी, आपल्या राज्याच्या सामाजिक आर्थिक प्रश्नासंबंधी अत्यंत संवेदनशील आणि आपल्या कृतीतून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आलेख कायम उंचावत असलेले महाराष्ट्र राज्य उद्योग विभागाचे सह-संचालक आणि मेक इन इंडिया कार्यक्रमाचे वरिष्ठ अधिकारी मोठे बंधू श्री.नितीनजी कोळेकर साहेब त्यांना भेटण्याचा आणि चर्चा करण्याचा योग आला…. मित्रांनो, एक सनदी अधिकारी म्हणल कि पदाचा थाट लावेजमा आपल्याला पाहायला मिळतो पण आपण स्वतः IAS आहोत हे मला त्यांच्या सोबत चर्चा करताना वाटलं नाही अशा एकदम डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्त्वाला भेटून खरंच महान माणसं किती जमिनीवर पाय ठेवून वागतात याची प्रचिती आली…

.फलटण जि. सातारा मधील अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून जन्म घेऊन कष्ट प्रामाणिकपणा संवेदनशीलता आणि नितीतत्वे या उद्दिष्टांच्या जोरावर गाव ते मंत्रालय हा प्रवास साहेबांनी सहज शक्य केला…. गावाखेड्यातून आपले प्रश्न घेऊन थेट मुंबईला येणाऱ्या सामान्य माणसाशी एकदम कसलाही दूजाभाव न करता संबंधित व्यक्तीचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून साहेब प्रथम प्राधान्य देतात….. आपण कितीही मोठे झालो तरी आपली माणसं त्यांच्यासाठी आपण या पदावर याची पूर्ण जाणीव ठेवून साहेब आज महाराष्ट्रातील टॉप अधिकारींपैकी एक आहेत….

साधी रहाणी पण उच्च विचारसरणी, अनिल हें कर तें कर हकांना सांगणारे साहेब कोणत्याही समस्येवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काढलेला उपाय आणि आपल्या पदाचा वापर गाव खेड्यात जाणाऱ्या विकास गंगे साठी व्हायला पाहिजे यासाठी अतोनात मेहनत करणारे उत्कृष्ट सनादी अधिकारी म्हणून साहेब संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत…. आमच्या स्नेही मैत्रीण महसूल अधिकारी पुणे कु.वैशालीजी कोळेकर मॅडम यांचे साहेब ज्येष्ठ बंधू आहेत….. आपण कितीही मोठे झालो तरी जमिनीवर पाय घट्ट रोवून हिमालयासारखी उत्तुंग उंची घेऊन स्वाभिमानाने जगायला शिकणारे साहेब आज भेटून खरंच खूप काही शिकलो आणि खूप काही गोष्टी आत्मसात केल्या…..💐😊🙏

Explore D World With Anilkumar ✍
9767341444

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button