मीडिया शरद पवार सांगतात तेच प्रसारित करतात,….

मीडिया शरद पवार सांगतात तेच प्रसारित करतात,…..
मनोज जरांगेच उपोषन, रॅली, सभा हे सर्व बारामतीचे काका घडवून आणतात हे आता उघड झाले आहे,.. शिपाई होता हे काकांचाच डाव आहे. त्यामुळे ओबीसी समाज बांधवांनो काका आणि काकांची तूतारी पासून सावध व जपून रहा आता फक्त ओबीसी योध्दे…..ॲड. मंगेश ससाणे, प्रा.लक्ष्मण हाके,…नवनाथराव वाघमारे यांच्या आंदोलनास सहकार्य करा, वेळ द्या,. आम्हाला समाजात विषमता निर्माण करायची नाही, जातीय तेढ निर्माण करायची नाही जे की मनोज जरांगे करतात, मराठा समाजातील तरुण, होतकरू, तसेच सुशिक्षित यूवकांची दिशाभूल करून त्यांना योग्य मार्ग दाखवण्या ऐवजी प्रसोभक वक्तव्य करून, जे घटनेत नाही,
जे आरक्षण देताच येत नाही परंतू बारामतीच्या काकांचाच दूत माजी मंत्री,साखर सम्राट, जालन्याचे माजी पालक मंत्री अंतरवलीच्या दगडफेकीचे माहीतगार यांच्या मार्फत मनोज जरांगेस भडकावू भाषण करण्यास प्रवृत्त करतात आणि त्यामुळेच मराठा समाजातील या प्रस्थापित नेत्यांमुळे विस्थापित मराठा विस्थापितच राहीला आहे, आणि आज बारामतीचे काका मराठा समाजातील तरुणांची, माता भगिनींची, सुशिक्षित बेरोजगारांची मनोज जरांगे नावाचा प्यादा वापरून दिशाभूल करीत आहे, बारामतीचे काका चार वेळेस मुख्यमंत्रीपदावर विराजमान होते, तर केंद्रात देखील मंत्रीपद उपभोगत होते तेव्हाच मराठा आरक्षणचा प्रश्न का नाही सोडवला हे जरांगेला दिसत नाही का ?
ज्या शरद पवारांनी मराठ्यांना आरक्षण देताच येत नाही हे मत जाहीरपणे व्यक्त केलेले असतांना मनोज जरांगे मात्र ओबीसी नेत्यांना टार्गेट करून राज्यात समाजा समाजात तेढ निर्माण करून ओबीसी समाजात भीती निर्माण करत आहे
मनोज जरांगेने मराठा समाजातील तरूणांच्या मनात ओबीसी समाजा बद्दल फक्त आणि फक्त द्वेष निर्माण केला आहे, जरांगे एक गोष्ट लक्षात घ्या ओबीसी हा शब्द घटनात्मक आहे ओबीसी हा शब्द समूह वाचक आहे तर मराठा हा शब्द जातीवाचक आहे, ओबीसी हा शब्द घटनात्मक असल्यानेच मला ओबीसी असल्याचा अभिमान आहे, मनोज जरांगे विनाकारण शिवरायांचा विचारास गालबोट लावू नका, बारामतीचे काका फक्त तुमचा वापर करून घेत आहेत,…
विशेष म्हणजे तूम्हास घटनेचा कसलाच अभ्यास नाही तमाम मराठा समाज तूमच्या भडकावू भाषणावर आक्रमक वक्तव्यावर आकर्षित झालाय ,ओबीसी नेत्यांनवर बेछूट बोलण्यापेक्षा स्वत:ची लायकी पहा, तमाम मराठा समाजातील होतकरू समजदार, हूशार तरूण वर्गास विनंती आहे की जरांगे बरोबर भरकटू नका राज्याच हीत पहा, आपल्या गावाच हित पहा, तूम्हास जर वाटत असेल की पोलिसांनीं आपल्यावर कारवाई केली नाही तर अनुभवातून सांगतो पोलीस कारवाई करत असते, जेव्हा कोर्टातून समन्स तेव्हाच कळत किंवा नौकरीच्या वेळेस जेव्हा कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतात तेव्हाच समजते आपल्यावर गून्हा दाखल आहे
मराठा तरूणांनो जर तूम्हाला नच्चीपन कमिटीचे तसेच ” मराठा आरक्षण भ्रम की वास्तव ” ही पूस्तके वाचा म्हणजे तूमच्या लक्षात येईल
मनोज जरांगेच आंदोलन कस भरकटलय ,आपलाच एक ओबीसी बांधव
लक्ष्मण ढवळे दादा
मराठवाडा विभागीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी परिषद
बीड
शिवक्रांती टीव्ही न्यूज ,राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन संपादक: शंकरराव लिंगे
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴




