सोशल

मंडलनामा क्रमशःमंडल आयोगाच्या राष्ट्रीय चळवळीत सहभाग 12.राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघ स्थापन

मंडलनामा क्रमशःमंडल आयोगाच्या राष्ट्रीय चळवळीत सहभाग 12.राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघ स्थापन

मंडल आयोगाने केंद्र सरकारला ३१ डिसेंबर १९८० रोजी अहवाल सादर केला. जनता पक्षाच्या सरकारने ३० डिसेंबर १९७८ रोजी खासदार बी. पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोग स्थापन केला होता. या आयोगाने देशातील ४०७ जिल्ह्यांचा दौरा केला. शेकडो शिष्टमंडळांची भेट घेतली. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अनेक जातींचे राहणीमान, त्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थितीची पाहणी केली. प्रचंड अभ्यास करून अहवाल सादर करण्याची वेळ येईपर्यंत मतभेदामुळे जनता पक्षाचे सरकार कोसळले व १९८० मध्ये केंद्रात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. मंडल आयोगाने कोणताही वेळकाढूपणा न करता ऐतिहासिक अहवाल सादर केला. मंडल आयोगाने ३७४३ मागासलेले वर्ग (जाती) शोधून काढले. त्यात महाराष्ट्रातील २७२ वर्ग (जाती) होते.

मंडल आयोगाने केंद्र सरकारला अहवाल सादर केल्यानंतर देशभरात इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) अपेक्षा प्रचंड वाढल्या. पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारचा मंडल आयोग स्वीकारण्याचा इरादा दिसत नव्हता. इंदिरा गांधी, आयोगाचे सदस्य, मागासवर्गीय खासदार यांच्यात समोरासमोर चर्चा झाली. त्यावेळी पंतप्रधान गांधी आयोगाच्या सदस्यांना म्हणाल्या की, ओबीसींची नेमकी ओळख पटवावी लागेल, म्हणजे कोणते समूह ओबीसी आहेत ते पुन्हा शोधावे लागेल. इंदिरा गांधी आयोगाच्या शिफारसी स्वीकारणार नाहीत,

असा याचा सरळ अर्थ. त्यामुळे आयोगाचे सदस्य व खासदारांना धक्का बसला. ‘काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत केलेल्या दौऱ्यामुळे देशभरातील ओबीसींमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली असून त्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. केंद्र सरकार या अहवालाचीही कालेलकर आयोगाप्रमाणे वासलात लावू शकते, अशी भीती जनतेला वाटत आहे. केंद्र सरकारने अहवालाच्या शिफारसी स्वीकारल्या नाहीत, तर देशातील ओबीसींची घोर निराशा होईल,’ असे आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्या चर्चेत सांगितले. मात्र त्याचा इंदिरा गांधींवर काहीही परिणाम झाला नाही.

मंडल आयोगाच्या संदर्भात या घटना घडत असतानाच माझा अॅड. जनार्दन पाटील यांच्या मार्फत ओबीसी आंदोलनाशी संपर्क आला. मी चळवळीत नवीन होतो, पण मला त्याबद्दल प्रचंड उत्सुकता असल्याने मंडल आयोगाबद्दल घडत असलेल्या सर्व घटना माहीत करून घेत त्यात सामील होत होतो.

मंडल आयोग सादर झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय केंद्रातील काँग्रेस सरकारने घेतला नाही. अहवाल सादर होऊन तब्बल वर्ष उलटत आल्यानंतरही काहीही हालचाल होत नसल्याने मागासवर्गीय खासदारांत अस्वस्थता वाढली. केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी २५ नोव्हेंबर १९८१ रोजी १२ मागासवर्गीय खासदारांनी लोकसभेत सभापतिंना घेराव घातला. मंडल आयोग पटलावर ठेवून चर्चा करावी व त्याच्या शिफारसी स्वीकाराव्यात, अशी मागणी केली.

खासदारांच्या या कृतीचा संदेश देशभरात गेला. संसदेचे सदस्य नसलेल्या नेत्यांनी एकत्र येऊन मंडल आयोगाच्या बाजूने लढा देण्यासाठी राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघाची स्थापना केली. या महासंघात महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटना सामील झाली. संघटनेचा पदाधिकारी म्हणून मी सुद्धा महासंघाचा सदस्य झालो. संसदेत व संसदेबाहेर मंडल आयोगाचा मुद्दा ऐरणीवर आणून सरकारवर दबाव निर्माण करणे हे महासंघाचे प्रमुख उद्दिष्ट ठरविण्यात आले. नवी दिल्ली येथील हिंदू सभा भवन येथे ६ व ७ डिसेंबर १९८१ रोजी महासंघाचे पहिले देशव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले.

या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष चौधरी ब्रह्मप्रकाश हे होते. परिषदेचे उ‌द्घाटन बिहारचे थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांनी केले. अधिवेशनाच्या मंचावर चंद्रजीत यादव, रामलखन गुप्ता, जयपाल सिंह इत्यादी खासदारांसह बहुजनांचे नायक म्हणून देशभरात उदयास येत असलेले कांशीराम यांची प्रमुख उपस्थिती होती. अधिवेशनाला देशभरातील ओबीसी चळवळीतील नेते, ओबीसी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. महाराष्ट्रातून अॅड. जनार्दन पाटील यांच्या नेतृत्त्वात ६० जण उपस्थित होते, त्यात मी एक होतो. या अधिवेशनात नवी दिल्ली येथे २८ फेब्रुवारी १९८२ रोजी शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविण्यात आले.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button