सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 42

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 42
व्यक्त केला होता. दि. २०-३-१९२०च्या ‘माणगाव अस्पृश्य परिषदेला’ गंगाराम कांबळे आवर्जून उपस्थित होते.
इ. स. १९२२ ला शाहू महाराजांचे मुंबई येथे अकस्मात निधन झाले. दुःखी अंतःकरणाने शाहू स्मारक स्थापन करण्यासाठी कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी गंगाराम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा होऊन नियोजित स्मारक उभे करण्याचे ठरले (६ ऑगस्ट १९२५). पुढे कोल्हापुरातील ‘नर्सर बागेत’ गंगाराम कांबळे आणि त्यांच्या महार सहकाऱ्यांनी राजर्षीचे स्मारक उभे केले, महार समाजाने शाहू महाराजांचे स्थापन केलेले हे देशातील पहिले स्मारक होय। परंतु कालौघात प्रस्तुत स्मारक नष्ट झाले !! संदर्भ – राजर्षी शाहू महाराज स्मारक ग्रंथ-संपादक जयसिंगराव पवार
कांबळे
मानाजी दगडूजी
सत्यशोधक मानाजी दगडूजी कांबळे हे फुले यांच्या नंतरच्या कालखंडातील नाशिक येथील बिनीचे कार्यकर्ते असून नाशिक जिल्हा सत्यशोधक शाखेचे १९१० पासून ते सचिव व कोषाध्यक्ष होते. १७ एप्रिल १९११ रोजी सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन पुणे येथे
पार पडले. या अधिवेशनासाठी मानाजी कांबळे उपस्थित राहिले असून त्यांनी या अधिवेशनाच्या फंडासाठी दोन रुपयांचा निधी दिलेला आहे. या नंतरचे दुसरे अधिवेशन ५ एप्रिल १९१२ रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरात संपन्न झाले. या अधिवेशन समितीचे सचिव कांबळे हेच होते. नाशिकच्या सत्यशोधक शाखेच्या कार्यकत्यांच्या मदतीने कांबळे यांनी हे अधिवेशन सफल केले. याही अधिवेशनाला त्यांनी वीस रुपये निधी दिलेला आहे. या अधिवेशनातील एका ठरावाचे ते अनुमोदकही आहेत. २३ मार्च १९१३ रोजी ठाणे येथील तिसऱ्या अधिवेशनाला ते उपस्थित असून या अधिवेशनातील चौथ्या ठरावाचे कांबळे अनुमोदक आहेत.
सासवड येथील २५ व २६ एप्रिल १९१४ च्या चौथ्या सत्यशोधक अधिवेशनाला कांबळे उपस्थित राहिले असून या अधिवेशनाने निवडलेल्या सत्यशोधक समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे ते एक सन्माननीय सभासद आहेत. यानंतर सत्यशोधक समाजाचे पाचवे अधिवेशन ११ व १२ मे १९१५ रोजी अहमदनगर येथे प्रा. अण्णासाहेब बाबाजी लड्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपत्र झाले. या प्रसंगी अध्यक्ष लड्डे यांच्यासमवेत ते विचारपीठावर विराजमान झाले. मानाजी कांबळे यांनी नाशिक सत्यशोधक शाखेच्या वतीने सत्यशोधक मताची लग्ने, सत्यनारायण पूजा, दशक्रिया आणि श्राद्धाचे अनेक धार्मिक कार्यक्रम घडवून आणले.
नाशिक येथील नवापुरा (भद्रकाली परिसर) येथील त्यांचे घर या कालखंडात सत्यशोधक समाजाचे केंद्रच बनले होते. तसेच २८ डिसेंबर १९१३ रोजी मराठा शिक्षण परिषदेचे सातवे अधिवेशन नाशिक येथे भरले होते. या अधिवेशनाच्या प्रमुख पाहुण्यांना नाशिक सत्यशोधक समाजाच्या वतीने नाशिक शाखेचे सचिव म्हणून कांबळे यांनी पानसुपारी केली होती. याच प्रसंगी सत्यशोधक ना. भास्करराव जाधव आणि विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील सत्यशोधक मो. तु. वानखडे यांची व्याख्याने नाशिक येथे आयोजित केली होती.
नाशिक सत्यशोधक शाखेने गंगारामजी घोलप यांची कन्या चंद्राबाईसमवेत चांदवड येथील रखमाजी बागूल यांचा विवाह १९१४ सालच्या मे महिन्यात (वैशाख-११) नाशिक येथे मोठ्या धडाडीने सत्यशोधक मते पार पाडला. बा नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी सत्यशोधक समाजाचे सचिव मो. तु. वानखडे, शास्त्री, वि. ले. ताजने मुद्दाम उपस्थित होते. हा विवाह संपन्न होण्यासाठी मनाजी कांबळे आणि सावळाराम घोलप यांनी परिश्रम घेतले.
अशा या बिनीच्या सत्यशोधकाचे १९३३ सालापूर्वी निधन झाले असावे. संदर्भ – १. सत्यशोधक समाज परिषद-अ. भा. व. कार्यवृत्तांत-संपादक प्राचार्य गजमल माळी, २. दीनमित्र अंक ३-६-१९१४
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴


