विनम्र अभिवादन! भावपूर्ण श्रद्धांजली

: विनम्र अभिवादन! भावपूर्ण श्रद्धांजली>
अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय कैलास जी लगड यांचे अल्पशा आजाराने 18 डिसेंबर 2023 रोजी निधन झाले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच निर्मिका चरणी प्रार्थना करतो
प्राध्यापक कैलासजी लगड हे नुकतेच एक वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला राज्याचे ओबीसी मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब आले होते त्यांच्या हस्ते त्यांचा कैलास लगड सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता आणि वयाच्या 59 व्या वर्षी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा दोन विवाहित मुली दोन जावई नातवंडे असा परिवार आहे
प्रा.लगड हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते.सेवा काळात त्यांनी एम कॉम बीएड असून देखील मराठी आणि संस्कृत हे विषय शिकवले. एक उत्कृष्ट अध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांची अनेकदा यशदा या उच्चस्तरीय संस्थेद्वारे शिक्षक- प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती. निवड श्रेणी वरिष्ठ वित्त श्रेणीचे प्रशिक्षण देखील त्यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना दिले. मुळात सामाजिक कार्याचीआवड असलेले प्रा. लगड हे अनेक वर्ष म.फुले समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष होते. नंतरच्या काळात त्यांची अ.भा.माळी महासंघाचे विश्वस्त म्हणून निवड झाली होती. आजपर्यंत ते या पदावर कार्यरत होते. केवळ जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात त्यांचा संपर्क माळी महासंघाच्या द्वारे मोठ्या प्रमाणात होता. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे ते कट्टर समर्थक होते.त्यांच्या पश्चात आई,पत्नी आणि मुलगा असून दोन विवाहित मुली आणि नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अतिशय संघर्षातून शेतकरी कुटुंबातील कैलास लगड यांनी डबल ग्रॅज्युएट पीजी केले होते त्यांच्या पत्नीही शिक्षकी पेशामध्ये नोकरीला आहेत त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू संघटन कौशल्य असलेला एक धाडसी वक्ता माळी समाजातील एक नेता म्हणून प्रसिद्ध होते 40 वर्षापासून ते समाजकार्यांमध्ये आणि शैक्षणिक कार्यामध्ये कार्यरत होते समाजातील अडले-नढलेल्या लोकांची सर्व कामे करणे नोकरी विषयक सल्ला देणे शिक्षण कशाप्रकारे कोणत्या प्रकारे घेतल्यास आपणाला नोकरी मिळू शकते याचा मार्गदर्शन करणे अखिल भारतीय माळी महासंघाच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून ते कार्यरत होते काही वर्षे त्यांनी अखिल भारतीय समता परिषदेमध्ये ही काम केले आहे चे माजी मंत्री माननीय जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचे ते विश्वासू लाडके कार्यकर्ते होते त्यांच्या माध्यमातून समाजाची गोरगरिबांची अनेक कामे ते सहज करत होते त्यांच्या निधनानंतर आज त्यांच्या शेतातील राहत्या घरी जाऊन त्यांची आई श्रीमती रुक्मिणी पंढरीनाथ लगड पत्नी श्रीमती रजनी कैलास लगड मुलगा अक्षय कैलास लगड दोन मुली जावई संचित सुभाषराव गिरमे. दिगंबर विनोद गिरमे. सुरेंद्र भोडवे यांचे सांत्वन अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे सोलापूर राष्ट्रीय उपाध्यक्ष अभामाळी महासंघ विठ्ठल आबा तोडकर लातूर अखिल भारतीय माळी महासंघ बीड जिल्हाध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ सर यांनी केले त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी माजी सभापती पंढरीनाथ जगन्नाथ लगड साहेब आप्पासाहेब रंगनाथ लोखंडे राजेंद्र बबनराव विधाटे चेअरमन जयंत एकनाथराव लोखंडे इत्यादी स्नेह मित्रमंडळी पाहुणेमंडळी उपस्थित होती
दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा

