मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 55

मराठा आरक्षण विरुद्ध ऍडव्होकेट मंगेश ससाने, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 55
फायदा पोहोचल्याचे दिसून आले आहे. भांडवली स्पर्धेत ओबीसींमधील (आणि इतर जातसमूहांमधील सुद्धा) अधिक संपन्न जातीतील लोकच तुलनेने जास्त पुढे राहिले आहेत, आणि स्पर्धेवर आधारित भांडवली व्यवस्थेत असेच होऊ शकते. यातून निर्माण होत चाललेल्या असंतोषावर तोडग्याकरिता मोदी सरकारने रोहिणी आयोग नेमला आहे, ज्याच्या शिफारशींनुसार ओबीसींमध्ये ४ गट करून त्यांच्यामध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षण विभागले जाणार आहे. ओबीसी मध्ये सुद्धा आरक्षणाचा फायदा आता त्यातील पुढारलेल्या वर्गालाच मिळत आहे. यामुळेच ओबीसी आणि इडब्ल्युएस मुलींची फी सरकार भरणार असे जाहीर करत ओबीसी कामगार-कष्टकऱ्यांच्या असंतोषाच्या आगीवर पाण्याचे शिंतोडे उडवण्याचे काम सरकारला करावे लागत आहे. ओबीसींच्या सुद्धा एका अत्यल्प गटालाच आरक्षणाचा फायदा पोहोचला आहे, आणि तसेच होऊ शकते कारण आरक्षणाची कल्पनाच तशी आहे. रोहिणी आयोगाचे बनणे सुद्धा याच गोष्टीची साक्ष आहे की ओबीसींमधील वर्गविभाजन सुद्धा तीव्र झालेले आहे.
‘२०-५० एकरचा शेतकरी आज पाच एकरवर आला असेल, पण ज्याच्याकडे दोन एकरही नाही तो वीस पिढ्यांतही कुठे असेल याचा विचार तुम्ही करणार नाही?’ असे विजय वडेट्टीवारांनी मराठ्यांना प्रती प्रश्न करत ओबीसी एल्गार परिषदेत म्हटले. धनिक शेतकऱ्यांचे राजकारण करणाऱ्या कॉंग्रेस पुढाऱ्यांचे हे नक्राश्रू असले, तरी वस्तुस्थिती मांडल्याशिवाय जनतेच्या भावनेला हात घालणे शक्य नसते. आज मराठा असो वा ओबीसी वा इतर कोणत्याही जातीतील अल्पभूधारक शेतकरी वा भूमीहीन शेतमजूर, यांचे हित एक आहे, आणि ते त्या-त्या व सर्व जातीतील धनिक शेतकरी वर्गाच्या विरोधात आहे याची जाणीव मारण्याचे काम तडेट्टीवारांसारखे नेते अर्धसत्य मांडून करत आहेत. प्रत्येक जातीतील गरिब कामगार-कष्टकऱ्यांच्या नावाने आरक्षण मागितले जात आहे, जी मूळातच एक अत्यंत नगण्य संधींची मागणी आहे, आणि ह्या नगण्य संधींचे वाटेकरी सुद्धा त्या-त्या जात व जातसमूहातील मध्यमवर्ग, उच्च-मध्यमवर्ग आणि भांडवलदार वर्गच बनणार आहे कारण की भांडवली स्पर्धेत टिकण्याची तुलनात्मक जास्त क्षमता याच वर्गाकडे असते.
जरांगेचे अस्मितावादी आंदोलन
जरांगेची वैयक्तिक सामाजिक पार्श्वभूमी जरी कष्टकरी वर्गाची असली, आणि त्यांच्या आवाहनाची भाषा ग्रामीण गरीबांना केंद्रस्थानी ठेवून असली, तरी विचारधारात्मकरित्या, राजकीयरित्या ते अस्मितावादी विचारांचेच, एका निम्न- भांडवली विचारधारेचेच प्रतिनिधी आहेत. मराठ्यांमधील कामगार कष्टकरी वर्गाच्या अपेक्षांची भरकटलेली अभिव्यक्ती असले तरी हे आंदोलन अस्मितावादीच आहे, आणि त्यामुळेच कामगार-कष्टकरी वर्गाने यापासून दूर राहणे गरजेचे आहे. प्रत्येक अस्मिता ही तिच्या विरोधातील अस्मितेला जन्म देते, खतपाणी घालते. मराठा अस्मितेचे राजकारण त्यामुळेच कधी विरोधात दलित अस्मितेला, कधी ओबीसी अस्मितेला तर कधी इतर अस्मितांना शत्रू म्हणून जन्म देते, तणावही भडकावते आणि कामगार-कष्टकऱ्यांची वर्गएकता बाधित करते. जरांगेच्या व्यक्त विचारांच्या केंद्रस्थानी गरीब मराठे असले तरी मराठा म्हणून मांडलेली अस्मिता त्यांना उच्चवर्गीय मराठ्यांपासून विभक्त करत नाही, तर एकत्र यायला भागच पाडते. म्हणूनच धनिक शेतकरी वर्गाचे नेते असलेले संभाजीराजे जेव्हा भेटायला येतात, तेव्हा ‘छत्रपतींच्या वंशजां’च्या उपस्थितीने जरांगे भावनाशील होतात, आणि प्रस्थापित मराठा नेत्यांवर जरांगे आगपाखड तर करतात, परंतु उदयनराजेंसारख्यांच्या भेटीही घेतात, आणि धनिक मराठ्यांच्या काही हिश्श्यांच्या मदतीने सभाही करताना दिसतात. ‘अगोदर आरक्षण मिळवा, आणि मग हव्या त्या पक्षाचे राजकारण करा’ म्हणणारे जरांगे राजकारणाच्या वर्गवास्तवावर प्रहार करताना दिसत नाहीत आणि स्वतःचेही पर्याय खुले ठेवतात, आणि ‘९५ टक्के मिळवूनही आमची मुले घरी’ म्हणताना तीच भाषा येते जी इतर उच्चवर्णीय ‘मेरिट’च्या नावाने आरक्षणा विरोधात सतत करत आले आणि त्यामुळे यात निशाणा आरक्षण मिळवणारे इतर जातघटकच असतात. ‘जाणूनबुजून षडयंत्र रचण्यात आलं, ७० ते ७५ वर्षापासून सत्ताधारी मंडळींवर ओबीसी नेत्यांचा प्रचंड दबाव होता, मराठ्यांना आरक्षण असूनही लाभ दिला नाही. असे म्हणणारे जरांगे राज्यातील राजकारणावर असलेला उच्चभ्रू मराठा वर्गाचा दबदबा दुर्लक्षित करतात आणि ओबीसी अस्मितेला आव्हानही देतात. अशाप्रकारे सर्व कामगार- कष्टकरी वर्गाचे हित हे जरांगेच्या विचारधारेमध्ये कुठेही नाही.
अशामध्ये ओबीसी आणि दलित समुदायांचा एक हिस्सा मराठा आरक्षणाच्या मागणीच्या बाजूने उभा आहे असे दिसतेः परंतु ब्राह्मण-विरोधी तथाकथित ‘बहुजन’वादी राजकारणाच्या प्रभावाखाली हे समर्थन होत आहे, जी स्वतः एक वेगळी अस्मितावादी मांडणीच आहे. दीर्घकालिकरित्या पाहिले तर अशा सर्व प्रकारच्या अस्मितावादांच्या राजकारणाचा भाजपच्या हिंदुत्ववादी फॅसिझमला फायदाच होतो, कारण ते यातले पटाईत खेळाडू आहेत, आणि त्यांना जाणीव
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




