राजमार्ग विकासाचा… चौफेर प्रगतीचा..!

राजमार्ग विकासाचा… चौफेर प्रगतीचा..!

महेश अण्णा विष्णुपंत कुठे यांनी चौथ्यांदा विधानसभेसाठी अर्ज भरलेला आहे यावेळी त्यांनी शहर उत्तर मधून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार काँग्रेसच्या तुतारी गट वतीने विधानसभेसाठी अर्ज भरला आहे मी आणि माझ्या वडिलांनी केलेल्या कामाची यादी द्यायची म्हटले तर 2000 पाणी ग्रंथ तयार होईल परंतु मतदार बंधू-भगिनींना फक्त थोडक्यात केलेल्या कामाची मांडणी आपणासमोर करत आहे या सर्व बाबींचा विचार करून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान करून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे ही नम्र विनंती
नमस्कार,
श्री महेश विष्णूपंत कोठे, २४८ शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. आपण मला १९१२ पासून विही घरकुल भागातून नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे. तुमच्या विश्वासाला किंचीतही तड़ा न जाऊ देता मी प्रामाणिकपणे आपल्या सर्व अडचणी सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आपल्या भागात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नव्हती, ड्रेनेज सुविधा नव्हती, त्या भागात रस्ते, शैक्षणिक सुविधा, दिवाबत्ती व इतर कोणत्याही नागरी सुविधादेखील उपलब्ध नव्हत्या. आज विडी घरकूलचा कायापालट झाला, हे आपल्या सर्वांना माहित आहे, विडी घरकूल वसले तेव्हा म्हाडाची केवळ ३००० घरे होती. नागरीकांच्या सर्व दैनंदिन अडचणी दूर करून विडी घरकूल भागाचा कायापालट केल्यामुळे आज आजूबाजूला जवळपास १५००० घरे नवीन वसलेली आहेत. आज इतकी लोकवस्ती वाढलेली असतांना देखील त्या नवीन भागातील विकास कामे करण्यासाठी मी कधीही कमी पडली नाही व कमी पडणार नाही.
विडी घरकूलमध्ये शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून बस व शेअर रिक्षाने धोकादायक प्रवास करून शहरातील शाळांमध्ये शिक्षणासाठी जावे लागत होते. विडी घरकूल परिसरात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी भव्य अशी शाळा सुरु केल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी कुचंबना थांबली. आज या शाळेचा व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल सतत १५ टक्केच्या पुढे असल्यामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा शहरातील सुप्रसिध्द शाळांमध्ये समावेश झाला आहे. आज या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी परदेशात मोठमोठ्या कंपन्यामध्ये व महाराष्ट्र शासनातील उच्च पदावर कार्यरत आहेत. त्याचवेळी चालू शैक्षणिक प्रवाह टिकून राहण्याकरिता विनादेणगी विनाचाचणी द्वारे केवळ माफक फीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाच्या सोयी विडी घरकूल, मुरारजी पेठ आणि हगलूरसारख्या ग्रामीण भागातही सुरु केल्या आणि या सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहून आज अभिमान तर वाटतोच पण आपण केलेल्या कार्याचे सार्थक झाले याचे मनाला समाधान वाटते आहे.
विडी घरकूलमधील सर्व खुल्या जागेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सर्व खुल्या जागा कंपाऊंड वॉलने बंदिस्त करून विविध समाजासाठी समाज मंदिरे
बांधली, पाण्याची अडचण लक्षात घेऊन १.५० लाख लिटरचा पंप व संप (अंडरग्राऊंड टाकी) तयार केली. सुरुवातीला ६ लाख लिटरची ओव्हरहेड टाकीचे बांधकाम कैले परंतु, भविष्यकाळातील अडचण लक्षात घेऊन पुढील ५ वर्षात दूसरी पाण्याची टाकी बांधावी लागली. तसेच वाढलेल्या विस्तारित नगरांमुळे पाणीपुरवठ्याची अडचण येत होती. पुन्हा नवीन ४ लाख लिटर आणि २० लाख लिटर ओव्हरहेड टाक्यांची निर्मिती केली, तरीदेखील मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत असल्यामुळे भविष्याचा विचार करता अजून २ नवीन पाण्याच्या टाक्यांची गरज आहे. याबद्दलदेखील शासनासोबत नियमित पाठपुरावा सुरु आहे.
या भागातील नागरीकांच्या आरोग्य समस्या आणि कौटुबिक भांडणामुळे होणारे कलह यामुळे त्या विभागात दवाखाना आणि पोलीस चौकीची तातडीची गरज आहे असे मला वाटले. नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुरुवातीला शासकीय परवानगी घेऊन स्वतच्या ऑफीसच्या जागेत दवाखाना आणि पोलीस स्टेशन सुरु केले. कालांतराने निधीची तरतूद करून १२ वर्षापुर्वी पोलीस चौकी आणि दवाखान्यासाठी जागा निश्चित केली आणि स्वतंत्र पोलीस चौकी आणि स्वतंत्र दवाखाना बांधून आरसीएचच्या माध्यमातून त्या भागातील नागरीकांच्या आरोग्य विषयक अडचणी दूर केल्या.
२००९ साली मी सुरुवातीला २४८ शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली. परंतु त्यात माझा निसटल्या मतांनी पराभव झाला, त्याची कारणे अनेक आहेत. माझे वडील स्व. विष्णूपंत (तात्या) कोठे यांचे सोलापूरच्या अनेक विकास कामामध्ये महत्वपूर्ण योगदान होते. त्यांनी संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून अनेक लोकांच्या अडचणी सोडविल्या. परंतु पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेतली नाही, अनेक वेळा त्यांना विधान परिषदेवर संधी देतो म्हणून त्यांना डावलण्यात आले ही खंत माझ्या मनात कायम सल करणारी होती, याच कारणामुळे मला २०१४ साली नाईलाजाने पक्ष सोडावा लागला. २०१४ ला शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेना या पक्षाकडून निवडणूक लढविली, परंतु ऐनवेळी युती तुटल्यामुळे मला पराभव पत्करावा लागला. २०१९ ला शिवसेनेने शेवटच्या क्षणी तिकीट नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि आपल्या सहकार्याने पक्षाच्या उमेदवारापेक्षा मला जास्त मते मिळाली.
मी सोलापूर महानगरपालिकेमध्ये महापौर व सभागृह नेता असतांना शहर उत्तर विधानसभा मतदारसंघा मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामासाठी निथी दिलेला आहे. याची कल्पना अनेक माजी नगरसेवक व नागरिकांना आहे. मी आजपर्यंत आमदार, खासदार नसतांनाही वैयक्तिक राजकीय संबंध व विविध शासकीय प्रकल्पाचा असणारा अभ्यास यामुळे शासनाच्या विविध योजनांतून सोलापूरसाठी निधी आणलेला आहे.
सध्या सोलापूरातील युवक नौकरीच्या निमित्ताने सोलापूर सोडून पुणे, हैद्राबाद, बंगलौर, मुंबई इत्यादी ठिकाणी स्थलांतरीत होत आहेत. सोलापूरातील प्रत्येक ४ कुटुंबामागे एका कुंटुबातील मुले आज नोकरीच्या निमित्ताने शहर सोडत आहेत. खरंतर सोलापूरात नवीन उद्योगधंदे आणून हे स्थलांतर थांबविण्याचे काम आतापर्यंतच्या आमदार-खासदारांचे होते. परंतु त्यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्णक लक्ष दिले नाही. त्यामुळे या सर्व युवकांना सोलापूरमध्ये काम मिळवून देण्यासाठी मा. शरदचंद्रजी पवार स्वहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला. सोलापूरचे आय. टी. पार्कचे स्वन कैवक मा. शरद पवार साहेबच पूर्ण करू शकतील असा मला पुर्ण विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सतीश मगर यांनी पुण्यातील मगरपट्टा भागात आय.टी. सेक्टर मध्ये आज १.५० ते २ लाख मुला-मुलींना रोजगार दिलेला आहे. अतुल चोरडिया यांच्या पंचशील ग्रुपद्वारे आज ५ लाख मुला-मुलींना रोजगार उपलब्ध झालेला आहे. सोलापूरात सुध्दा मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या काम पूर्ण करण्यासाठी योगदान देतील यात शंका नाही महेश कुठे यांना यांच्या वडिलांपासून किमान राजकारणाचा पन्नास वर्षांचा अनुभव आहे असा अनुभवी नेत्याला शहर उत्तर मतदार संघातून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे ही नम्र विनंती
२०/२६ राधाश्री, मुरारजी पेठ, सोलापूर। ९९२३३१००००, ९४२२०६५९६५ |.दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोध.क शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा maheshkothe100@gmail.com



