राजकारण

जागो ओबीसी जागो जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा

” गोंधळलेल्या अवस्थेत धनगर ओबीसी ”

सन १९५2ला डॉ बाबासाहेबाच्या दडपणा मुळे कालेलकर आयोग बसवल पंरतू लागू केल नाही कारण पंतप्रधान ब्राम्हण नेहरू होता. सन १९७८ ला कालेलकर आयोग लागू करतो म्हणून समाजवादी विचारांच्या व विषमतावादी विचारांच्या लोकानी जनता पक्षाची निर्मीती करून सत्तेवर आले, आणि वैश्य ब्राम्हण पंतप्रधान मोरारजीनी वेळ निभावून नेण्यासाठी कालेलकर आयोग लागू न करता मंडल आयोगाची निर्मिती केली.पंरतू मंडल आयोग लागू करण्या अगोदरच जनसंघवादी लोकानी सरकार पाडले. मंडल आयोगाचा अहवाल संसदेत आलं तेव्हां काँग्रेसन हा मंडल आयोग धूडकावन लावलं आणि कचराकुंडीत टाकले.
मंडल आयोग लागू करतो म्हणून क्षत्रीय व्हि पी सिंगानी जनतादल व भाजपा मिळून १९८९ ला सत्तेवर आली.त्या सरकारात ओबीसी चे नेते लालूयादव , शरद यादव,मुलायम यादव व्हि पी सिंगा बरोबर सत्तेत होते.
त्यानी व्ही पी सिंगाल निवडनूक जाहिरनाम्यात दिलेल्या वचना प्रमाणे ओबीसीला मंडल आयोग देण्यास भाग पाडले. पंरतू सत्तेतला सहयोगी पक्ष भाजपने सरकारचा पांठीबा काढून घेवून सरकार पाडले आणि ओबीसी चे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी मंडल आयोगाच्या विरोधात रामरथयात्रा काढून मंडल आयोगाला विरोध केले.
एवढ्यावर न थांबता भाजप-काँग्रेसच्या ब्राम्हण खासदारा मार्फत मंडल आयोगावर स्टे आणले.हा स्टे ओबीसी योध्दा लालू यादवनी १९९२ला उठवला. पंरतू त्या वेळेसचे ब्राम्हण पंतप्रधान नरसिंहराव आणि ब्राम्हण विरोधी पक्ष नेता अटलजी या दोघनी मिळून ओबीसीना लोकसभा व विधानसभा आरक्षण न मिळवून देण्याच ठरवून फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देण्याच ठरवल. त्यातही ओबीसीला आरक्षणाचा लाभ घेता येवूने म्हणून क्रीमिलिएरची खुटी मारून ५२% लोकाना २७% च आरक्षण दिल. त्या आरक्षणाची आता पर्यतं खरी अमंलबजावणी केलीच नाही, म्हणून ओबीसी लोकशाही पासून आजही उपेक्षीतच आहे.
याचेकारण ओबीसीला राष्ट्रिय नेता नाही व राष्ट्रिय पक्ष नाही.जे पक्ष आहेत ते विषमता टिकवणारी ब्राम्हणी पक्ष आहेत. त्यानी ओबीसीचा वापर करून आपल्याच समाजाच हित जोपासत आहेत. म्हणून ओबीसी व ओबीसीचा मोठा भाऊ धनगर समाज उपेक्षित आहेत.
आता धनगर समाजा बदल थोड पाहू या, देशात धनगर समाजाला कांही राजात अनुसूचित जातीत तर कांही राज्यात अनुसुचित जमातीत आरक्षण देण्यात आलेल आहे.महाराष्ट्रात अनुसुचित जमातीच्या यादीत ३६ नंबरला धनगड, ओरान या जातीना आरक्षण देणयात आलेल आहे.मराठी,इंग्रजी त धनगर आणि हिंदीत धनगड असा उच्चार होतो.यामुळे विदर्भ मध्यप्रदेशात असताना हिंदी भाषातून विदर्भात धनगड म्हणून धनगराना आरक्षण मिळत होते.परंतू विदर्भ महाराष्ट्रात आल्यावर महाराष्ट्र सरकारची निती धनगराना आरक्षणाचे हक्क घेवू द्यावयाचे नाहीत म्हणून धनगड जात गडचिरोलीतच आहे असे दाखवून धनगराची फसवणूक जाणून बुजुन त्या वेळेचे मराठा मुख्यमंत्री व ब्राम्हण सचिव यानी केलेली आहे.तीच री आज पवार,गडकरी ओडत असतील तर नवल वाटण्याचे कारण नाही.आज ही पवार गडकरी धनगर समाजाला बेकूब समजून मताच राजकारन करीत आहेत.कारण धनगर समाजाला राष्ट्रीय नेता नाही व पक्ष नाही.
धनगर आरक्षणाची चळवळ अँड बनसोडे यानी सुरू केली पंरतू त्यांच्या त संघटन कौसल्य व आक्रमता नसल्यामुळे त्यांच्या चळवळीत तीव्रता निर्माण झाली नाही.
हा आरक्षणाचा मुद्दा १९८९ ला यशवंत सेनेच्या माध्यमातून बी के कोकरेनी उचलला आणि ह्या मुद्दाला आमदार अनंतकुमार पाटील व लक्ष्मणराव येडतकर गुरूजी यानी सहकार्य करून महाराष्ट्र पिंजून काढून नागपूरला भव्य मोर्चा काढण्यात आल. हा मोर्चा पाहून शरद पवार हादरले .त्यानी एस टी आरक्षण मिळवून न देण्यासाठी छकल लढवली आणि समाजात अशिक्षित नेतृत्व शिवाजीराव शेंडगे याना पुढे करून २०% धनगराला ३.५% एन टी केल आणि बी के कोकरे, अनंत कुमारला संपवून चळवळ मोडीत काढली. आणि भविष्यात धनगराला एस टीच आरक्षण न मिळण्यासाठी खुटी मारली. एन टी आरक्षण हा मंडल आयोगाचाच भाग आहे. या नंतर आरक्षणा बाबत धनगर समाजातील अज्ञानी कार्यकर्त्यांनी वेगवेगळे मोर्चे काढून समाजाचे नेते आणि प्रस्थापित पक्षाचे चमचे बनले.
१९९४ ला नांदेडहून महाका, अँड बनसोडे यांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरसिहंराव याना निवेदन देण्यासाठी गेलो असताना मंत्री गुलाबनभी आजाद यांची मुलाखत झाली,त्यानी स्पष्ट सांगीतले की,असे निवेदन कचराकुंडीत पडतात.जर तुम्ही शक्ती प्रदर्शन दाखवलात तर हा प्रश्न विरोधी पक्ष उचलून धरतो आणि सत्तधारी चर्चास तयार होतो.जर सत्तेत आपल कोणी असेल तर पाठपुरावा करतो आणि आपला प्रश्न सुटेल असे आजाद म्हणाले.आपले सत्तेत कोणीच नाही.
या काळात कांशीरामची चळवळ बसपा जोरात होती.या चळवळीला रोखण्यासाठी आर एस एस ने या पुर्वीच चळवळी निर्माण केल्या होत्या.स्वाध्याय, शेतकरी संघटना, आणि भारीपला जीवंत करण्यात आल होत.महाराष्ट्रात भारिपबहूजन महासंघात ओबीसीला घेवून सत्तेत जाण्याची तयारी झाली होती. आणि मखराम आणि अनंतकुमार यांच्यात मुख्यमंत्री साठी चुरस लागली होती.
पोटनिवडणूकीत केराम आमदार झाल्या मुळे ओबीसींना मंत्रीमंडळाचे स्वप्न पडू लागले होते. धनगर चळवळी मुळे पवारसाहेब आदीच विजय मोरेना आमदार केले होते.आ. मोरेच्यां अध्यक्षेते खाली परभणी येथे आ. अनतंकुमार पाटील धनगर समाजाला भारिप बहुजन महासंघात नेले होते. शेवटी मोरे स्वतः काँग्रेस सोबतच राहीले,ऐन वेळी बहुजनमहासंघाचा वाद विकोपाला गेला आणि आ मोरेनी अनंतकुमारला काँग्रेस मध्ये नेले.या वेळी परिस्थिती व्यवस्थित हाताळली असती तर सत्तेतही आले असते आणि धनगर समाजाचे पंचवीस आमदार झाले असते. याला भारिपबहूजन महासंघाच नेतृत्व ही जिमेदार होत कारण कांहीही असो.
१९९७ ला यशवंत सेने तर्फे संसदेवर मोर्चा ठेवण्यात आला होता,मोर्चाच नेतृत्व महादेव जानकर, अनंतकुमार पाटील, विजय मोरे करणार होते पंरतू मोर्चाला लोक निघाले असताना पाटील,मोरेनी मोर्चा रद्द झाला अशी बातमी दिली.तरी ही पाच हजाराचा मोर्चा संसदेवर धडकला,ऐन वेळी या मोर्चाच नेतृत्व मा.खा कांशीराम यानी केल आणि सांगीतल आपला समाज मागणारा नसून देणारा आहे.त्या साठी दल निर्माण करा आणि समाजाचे प्रतिनिधी सत्तेत पाठवा.हा मंत्र घेवून धनगर ओबीसी बहूजनासाठी राष्ट्राला पोसणार्या पंरतू उपेक्षीत राहीलेल्या समाजासाठी महादेवजी जानकर यांनी राष्ट्रिय समाज पक्षाची निर्मिती केली. त्यासाठी आपल आयुष्य राष्ट्राला समर्पित केले.
आरक्षणाच्या नावा खाली मेळावे हे आता पंर्यत फसवेगीरीचे निघालेले आढळून येतात.म्हणून वडील माणस म्हणतात दुध पोळल तर ताक फुकून पितात. आदरणिय आमदार गणपतराव देशमुख आपल्या कोणत्याही कार्यक्रमाला येतील पंरतू ते राजकारणात पवाराला सोडूच शकत नाहीत असा अनुभव आहे.
धनगर ओबीसीनो आपल राष्ट्रिय नेतृत्व कोणत ? आणि राष्ट्रीय पक्ष कोणता आदी ठरवा आणि ठाम निर्णय घ्या तरच यशस्वी व्हाल. केंव्हाही भावनिक होऊन केलेले काम कधिही सफल होत नाही.आजच योग्य निर्णय घेवून कामाला लागावे आणि सत्तेत जावे. आपण यशस्वी व्हावे हिच सदिच्छा
” सब समान तो देश महान ”

— जय भारत
— गोविंदराम शूरनर पण नसते वाफ घेऊन येता
” राष्ट्रिय सत्यशोधक समाज संघ ” सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button