सोशल
एकादशी निमित्त गोशाळेत भजन, गोमातेस फळहार म्हणून केळी वाटप….

एकादशी निमित्त गोशाळेत भजन, गोमातेस फळहार म्हणून केळी वाटप….
आषाढी एकादशी निमित्त आपल्या यशोदानंद गोशाळेमध्ये भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यादिवशी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजन, हरिपठाचा आनंद घेतला.
त्यादिवशी पासून ठरले प्रत्येक एकदशी दिवशी आपल्या गोशाळेमध्ये हरिपाठ, भजन, प्रवचन कार्यक्रम घ्यायचा. त्यानुसार “कामिका एकादशी” निमित्त महिलांनी भजनांचा आनंद घेतला.
एकदशी निमित्त गोशाळा ट्रस्टी श्री बुवासाहेब राऊत यांच्या वतीने गोमातेस फळहार म्हणून एक कॅरेट केळी देण्यात आली.
आपले मनःपूर्वक आभार🙏
श्री बुवासाहेब राऊत
प्रत्येक एकादशीस हरिपाठ, भजन करण्यासाठी सायं. 4.00 वा. आपल्या यशोदानंद गोशाळा येथे उपस्थित रहावे.
यशोदानंद गोशाळा, राशीन
ता- कर्जत, जि- अहिल्यानगर
संपर्क – मिलींद राऊत
735012. !!!!5007.

[gspeech-button]



