नाशिक जिल्ह्याचे तारणहार भाग्यविधाते लासलगाव येवला मतदार संघाचे आधुनिक भगीरथ पाणीदार नेता माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब!

नाशिक जिल्ह्याचे तारणहार भाग्यविधाते लासलगाव येवला मतदार संघाचे आधुनिक भगीरथ पाणीदार नेता माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब!
आमची माळीयाची जात’ l कोरडवाहू शेती करू बागाईत॥ अम्हा हाती
शासनाचा गाडा ।पाणी देऊ येवला लासलगावी फळझाडा ।।
कांदा लसूण रोप उगवली ‘ l मका केळी निसवली । प्रेमे समीर पंकज बहरली । येवला लासलगावी पाणी पाहिले डोहळा ।। आमची माळी याची जात । जिरायत शेत करू बागाईत ॥ अमची माळी चाची जात ।जिरायत शेत करू बागाईत॥ छगन भुजबळी शिरी ताज ॥ आमची माळीयाची जात । जिराईत शेतकरू बागाइत बागाइत॥
तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती, भुजबळ साहेबांची शब्दपुर्ती,
दुष्काळातून बागायतीची स्वप्न आणि 52 वर्षाची प्रतिक्षा आता नजरेच्या अंतरावर…
डॉ मोहन शेलार..पाणी आंदोलक
येवला म्हटल की नजरेसमोर उभा राहतो तो महाराष्ट्रातला तहानलेला दुष्काळी तालुका. बाराही महिने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, महिलांच्या डोक्यावर हंडे,दिवाळी झाली की मजुरांचे स्थलांतर, पिढ्यानपिढ्याची गरिबी ही तालुकावसियांच्या पाचवीला पुजलेली.पाण्याच्या टँकर साठी आंदोलन, तालुक्याच्या काही भागाला तारणाऱ्या पालखेड च्या पळवल्या जाणाऱ्या पाण्यासाठी रास्तारोको आणि अशाच संघर्षात आयुष्य घटवत गेलेला तालुका हीच येवल्याची ओळख. इतिहासासात मात्र येवला नाव अनेक संदर्भाने आदराने लिहिलं गेलं,सेनापती तात्या टोपेंची ही जन्मभूमी आणि सातासमुद्रापार पोहचलेली इथली पैठणी हे येवल्याचे वैभव. तीच पुण्याई असेल म्हणून येवल्यासाठी २००४ ची विधानसभा निवडणूक सुवर्णक्षण घेऊन आली आणि भुजबळ आणि येवला या नात्याची सुरुवात झाली. जनतेने टाकलेल्या विश्वासाला ना छगनराव भुजबळ यांनी सार्थ ठरवत येवला लासलगाव मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला. मतदारांच्या स्वप्ना पलीकडचे कामे साकारली.महाराष्ट्रातील पहिले शासकिय संकुल, येवलेकरांचे श्रद्धास्थान असलेले कोटमगाव येथे भव्य भक्तनिवास आणि इतर विकासकामे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुक्तिभुमिवर भव्य स्तूप, बाबासाहेबांचा भव्य पुतळा, देशासाठी आदर्श ठरलेली 38 गावं नळ पाणी पुरवठा योजना, स्वप्नपलिकडचे सुरू असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिवस्मारक आणि अशी अनेक कामे जी कोणी सांगायला लागले की वेळ पुरत नाही.
विकास कधी संपत नसतो. मात्र तरीही विकासाच्या दृष्टीने येवला परिपूर्ण झाला असे म्हणता येईल. मात्र येवला तालुक्यातील उत्तरपूर्व भागात हरितक्रांती करणारा पुनेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहच कालवाचे स्वप्न अजूनही पूर्णत्वास गेले नाही. 2019 ते 2023 या 4 वर्षात सर्व प्रयत्न करूनही केवळ बाळापूर पर्यंत पाणी पोहचविण्यात ना छगणरावजी भुजबळ यांना यश आले. त्यामुळे कालव्याला पाणी येणार नाही ही चर्चा केवळ राजकीय विरोधातून होत असली तरी या कालव्याला पाणी फक्त भुजबळच आणू शकतील हा विश्वास सामान्य शेतकऱ्याला वाटत होता तो विश्वास आज पूर्णत्वास येतो आहे. हाच सामान्य माणसाच्या मनात निर्माण केलेला विश्वास भूमिपुत्रांच्या नात्यापलिकडाचा आहे आणि हीच मतदारसंघातील भुजबळ साहेबांची खरी संपत्ती आहे.
इतिहासाची पाने उचकत मागे वळून पाहिले की मग खऱ्या अर्थाने कळते ती अंगावर शहारे आणणारी उत्तरपूर्व भागाला बागायती करणारी कालव्याच्या दिवा स्वप्नाची कथा. पाण्याअभावी बरबाद झालेल्या पिढ्यानपिढ्या आणि आजही डोळ्यासमोर अंगावर शहारे आणणारे त्या पिढ्यांचे गरीब वारसदार. हा कालवा म्हणजे पाणी उपलब्ध नसलेला आणि तरी शेतकऱ्यांना हरितक्रांतीचे स्वप्न दाखवणारा आणि शेतकऱ्याला या स्वप्नात दंग करणारा कदाचित हा एकमेव कालवा असावा. पूनेगाव धरण ओव्हरफ्लो झाले की ते पाणी दरसवाडी धरणात टाकणार, दरसवाडी या पाण्याने ओव्हरफ्लो झाले की मग ते ओव्हरफ्लो पाणी या कालव्यात टाकून पुढे ते ८७ किमी डोंगरगाव पर्यंत येणार असा हा कालवा. मात्र आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून ? पुनेगाव चे पाण्याने दरसवाडी धरण सुद्धा भरू शकत नाही मग कालव्याला पाणी सुटणार कुठून हे खरे वास्तव..तरीही सर्वच पक्षाचे नेतृत्व आमदारकी मिळवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत या कालव्याला पाणी येणार आणि क्रांती होणार असे चित्र निर्माण केले जायचे. ज्या उमेदवाराला असे चित्र शेतकऱ्याच्या मनावर चांगले रंगवता आले तो आमदार व्हायचा हा इतिहासातील अनेक निवडणुकांचा अनुभव आहे, हे अनेक निवडणुकात लोकांनी अनुभवले आहे. खरे सांगायचे तर याला भुजबळ साहेब पण अपवाद नाही असेच म्हणावे लागेल.२००४ ला पहिल्यांदा ना छगनराव भुजबळ यांनी येवल्यातून उमेदवारी केली आणि स्थानिक लोकांच्या मागणीवरून प्रत्येक विधानसभा उमेदवार देतो त्याप्रमाणे पुणेगाव दरसवाडी चे पाणी डोंगरगावला आणतो असे सांगूनही टाकले .साहेब राज्याचे हेविनेट नेते आहेत साहेब पाणी आनतीलच हा विश्वास भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांच्या माय माऊलीच्या ह्रुदयात ठसला आणि छगनरावजी भुजबळ मोठ्या मताधिक्याने येवल्याचे आमदार झाले, राज्यात मंत्री झाले आणि मतदारसंघात विकासपर्व सुरू झाले. अनेक विकासकामे सुरू असताना शासनाच्या कागदावर आणि शेतकऱ्याच्या स्वप्नात असलेला कोरडा कालवा २००६ सालि प्रत्यक्ष शेतात दिसायला लागला. शासनाच्या निधीतून कोरडा कालवा पूर्ण करण्याचे काम ना भुजबळ यांनी पूर्ण केले खरे मात्र पूनेगावं मधून पाणी येणे आणि ते दरसवाडी पार करून पुढे डोंगरगाव पोहचणे हे कधीच शक्य नाही हे वास्तव कालवा पूर्ण झाल्यावर समोर आले .स्वप्नपूर्ती करणारा कालवा भौतिक दृष्ट्या साकारला खरा पण पाण्याच्या उपलब्धते अभावी हरितक्रांती करण्याचे स्वप्न कोरडे राहिले.
पण शब्दाला मागे फिरतील ते भुजबळ कसले. मतदारसंघातील गोरगरीब लोकांना दाखवलेले स्वप्न मला पूर्ण करता येणार नाही अशी हार मानतील ते भुजबळ कसे असतील.1972 नंतर येथूनच खऱ्या अर्थाने या कालव्यासाठीचे नवे पर्व, नवा इतिहास, नवी लढाई सुरू झाली. राज्यात हेविनेत नेते म्हणून ओळख असलेल्या भुजबळांनी २००८ सली सगळी शासकीय यंत्रणा कामाला लावत मतदारसंघात पाणी नेण्यासाठी मला अडचणी माहित आहेत, अडचणी नको मला अडचणीवर पर्याय पाहिजे असा जणू अलिखित आदेशाच काढला. याच सगळ्या प्रयत्नातून समोर आला तो काल्पनिक महाकाय मांजरपाडा प्रकल्प.पाणी उपलब्धते चा पर्याय मिळाला मात्र हा पर्याय सत्त्यात उतरविने सहज नाही हे छगनरावजी भुजबळ जाणून होते.म्हणून छगनरावजी भुजबळ स्वतः डोंगरदऱ्यात पायपीट करून प्रकल्प कसा असेल आणि गुजरातला जाणारे पाणी कसे येवला तालुक्यात वळवता येईल हे पाहिले ,समजून घेतले आणि मग नोंद नसलेले पाणी शासकीय दप्तरी नोंद करत कागदावर आणले.
२००८ साली इतिहासात पहिल्यांदा राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक विभागीय कार्यालय नाशिक मध्ये घेण्याचे नियोजन भुजबळ यांनी केले. आणि याच बैठकीत मांजरपाडा प्रकल्पासाठी ५५० कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला. २००९ ला विधानसभा झाल्या, भुजबळ प्रचंड मताधिक्याने पुन्हा निवडून आले आणि मंत्री झाले .पाहता पाहता पाच वर्षात मांजरपाडा बोगदा साडेआठ किलोमीटर पूर्ण झाला. अवघा दीड किलोमीटर बोगदा पूर्ण होऊन येवलेकरांचे स्वप्न पूर्ण होणार पण या स्वप्नाला २०१३ साली नजर लागली. राज्यात सिंचन प्रकल्प घोटाळ्याचे आरोप झाले, तत्कालीन आघाडी शासनाने श्वेतपत्रिका काढायचे ठरवले. दुर्दैवाने श्वेतपत्रिका मध्ये मांजरपाडा प्रकल्पाचा संबंध नसताना श्वेतपत्रिका मध्ये समवेश झाला आणि चौकशी होईपर्यंत राज्यातील इतर सर्व प्रकल्पासोबत मांजरपाडा प्रकल्पाचे काम बंद झाले.
दरम्यान २०१४ ची विधानसभा आचारसंहिता सुरू झाली, निवडणूक झाली, भुजबळ पुन्हा आमदार झाले पण राज्यात सत्तांतर झाले. सिंचन घोटाळा श्वतपत्रिकेतून मांजरपाडा प्रकल्प वगळावा यासाठी भुजबळ यांनी शासनाकडे प्रयत्न सुरू केले. दरम्यान दुर्दैवाने भुजबळ यांना राजकीय द्वेषातून इडी ने अटक केली आणि येवलेकरांच्या पदरी निराशा आली.
तरीही मतदारसंघातील लोकांना दिलेल्या वचनाची जान ठेवत भुजबळ यांनी जेलमधून शासनाला पत्र लिहीत मांजरपाडा काम सुरू करा असे प्रयत्न सुरू ठेवले. दोन वर्षानंतर शासनाने मांजरपाडा प्रकल्प श्वेतपत्रिकेतून वगळला आणि २०१७ च्या सुरुवातीला राहिलेल्या दीड किमी बोगद्याच्या काम सुरू केले. २०१८ मध्ये भुजबळ यांचा जामीन झाला, २०१९ च्या मार्च एप्रिल दरम्यान राहिलेल्या दीड किमी काम भुजबळ यांनी प्रयत्न करून पुर्ण करून घेतले. जुलै २०१९ ला बोगद्यातून पहिल्यांदा पाणी पुणेगाव मध्ये आले. येवला तालुक्यातील हजारो लोकांच्या साक्षीने ना भुजबळ यांनी मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन केले. खऱ्या अर्थाने आता हरितक्रांतीचे सुरुवात होईल आणि दुष्काळी येवला बागायती होईल असा विश्वास घेऊन लोक घरी परतले.
२०१९ च्या पहिल्या प्रयत्नात पाणी ६३ किमी दरसवाडीत पोहचले, दरसवाडी मधून पाणी येवल्यात आले आणि बाळापूर पर्यंत म्हणजे 40 किमी पर्यंत पोहचले…दरम्यान २०१९ विधानसभा निवडणुका झाल्या. भुजबळ पुन्हा आमदार झाले. महविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि पुन्हा मंत्री झाले.
मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी उपलब्ध असताना पाणी डोंगरगाव पर्यंत पोहचले का नाही यावर भुजबळ यांचे काम सुरू झाले, प्रशासन कामाला लागले. पूनेगाव १ ते २५ किमी कालवा ११० क्यूसेस चा होता , त्यास तात्काळ २२० क्युसेस करण्यासाठी शासनाची मंजुरी घेऊन साडेसात कोटी निधी प्राप्त करून काम पूर्ण केले. दरम्यान मात्र जगाला कोरोणा च्या संकटाने घेरले होते. सर्व कामे बंद पडली होती. तरीही सन २०२० आणि २०२१ ला आहे त्या परिस्थितीत पाणी सोडले आणि पाणी पुन्हा बाळापूर पर्यंतच पोहचले. २००६ साली झालेला कालवा २०१९ पर्यंत पडीत असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. कालव्याची दुरवस्था झालेली होती. कालवा काँक्रीटीकरण हा एकमेव पर्याय आहे हे सर्वांना माहीत असेल तरी कोरोनाच्या संकटात शासन असताना, सगळी विकासकामे बंद केलेली असताना २४२ कोटी मंजूर होणार तरी कसे ? तरीही भुजबळ थांबलेले नव्हते. २०२१ च्या कोरोणा काळात आपल्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात अद्यावत यंत्रणेद्वारे संपूर्ण कालव्याचे सर्वेक्षण करून घेतले. याच काळात राज्यात राजकीय घडामोडी झाल्यात, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा भुजबळ साहेब विरोधात बसले. शासन विरोधात असल्याने पुन्हा या प्रकल्पाला अपेक्षित २४२ कोटी मिळणार नाही हे निश्चित झाले होते. मात्र येवले करांचे सुदैव ,पुन्हा राज्यात राजकीय घडामोडी घडल्या, भुजबळ साहेब यांनी मतदारसंघाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेत सरकार मध्ये सामील झाले आणि अवघ्या काही महिन्यात २४२ कोटी या कालव्याची मंजूर झाले
कामही सुरू झाले.
पूनेगावं ते दरसवाडी या ६३ किमी विस्तारीकरण अस्तरिकरण साठी ९६ कोटी तर दरसवाडी ते डोंगरगाव या ८७ किमी कालवा विस्तारीकरण अस्तरीकरण, गेट,पुल या कामासाठी १४६ कोटी असे एकूण २४२ कोटी निधी मंजूर झालेल्या निधीतून होणाऱ्या कामामुळे येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कालव्यावर प्रत्येकी ८ ते १० किमी अंतरावर वेगवेगळ्या आधुनिक यांत्रिकी द्वारे काम केले जात आहे.
पूनेगाव ते दरसवाडी या ९६ कोटी च्या कामात अस्तरीकरण, काँक्रीटीकण, पुल , कालव्याखालून जाणारे पाणी साठी HPD, नदीवरील पूल, कालव्याची गरजेनुसार संरक्षक भिंत, गेट, आदी कामांचा समावेश आहे.
दरसवाडी ते डोंगरगाव या ८७ किमी च्या कामात विस्तारीकरण,काँक्रीटीकरण सह कातरणी शिवारात ३ पुल, बाळापुर ,सावखेडे, कुसमडी,नगरसुल,न्याहारखेडे, अंगुलगाव,तळवाडे या गावांच्या शिवारात मागणीप्रमाणे प्रत्येकी १ पुल, कुसुर ,हडपसावरगाव,वाईबोथी या गावांच्या शिवारात प्रत्येकी २ पुल, (एकूण मंजूर २२ पैकी १६ पुल येवला तालुका हद्दीत) वाईबोथी (७० किमी) व न्याहारखेडे (७५ किमी) येथील नदीवरील जा ये करण्यासाठीचे मोठे २ पुल , बंधारे भरण्यासाठीचे गेट व अनेक लहान कामे यात घेतलेले आहेत.
आज रोजी या कालव्यावर प्रत्येकी ८ ते १०किमी मध्ये वेगवेगळ्या यांत्रिकीने सर्वत्र सोबत काम सुरू आहे.
मा ना छगन भुजबळ पालकमंत्री असताना या कालव्यातील पाणी प्रवाहात होत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी या कालव्याची पूर्ण १५० किमी कालवा समपातळी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याच सर्वेक्षणानुसार कालव्याचे समपातळी काम सुरू आहे . कालव्याचे काम योग्य दर्जाचे व्हावे त्याचप्रमाणे पावसाळा सुरू होण्याच्या आत काम पूर्ण होऊन पानी डोंगरगाव पर्यंत जाण्याचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे यासाठी मंत्री छगन भुजबळ या कामाचा रोज आढावा घेत आहेत. दरसवाडी ते डोंगरगाव या ८८ किमी मध्ये फक्त १३ किमी कालवा लेव्हल काम बाकी झाले आहे तर ३८ किमी काँक्रीटीकरण काम बाकी आहे.
त्याचप्रमाणे पूनेगाव ते दरसवाडी या ६३ किमी मध्ये फक्त १४ किमी कालवा लेव्हल चे काम बाकी आहे तर २८ किमी काँक्रीटीकरण काम बाकी आहे.
या संपूर्ण कामाचा दैनंदिन आढावा स्वतः ना भुजबळ साहेब रोज घेत आहेत. कालवा लेव्हल आणि काँक्रीटीकरण दोन्ही कामे अतिशय गतीने सुरू असून कालवा लेव्हल करण्याचे काम १५ जून अखेर तर काँक्रीटीकरण करण्याचे काम १५ जुलै अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट संबधित यंत्रणेने निश्चित केले असून काम निश्चित पूर्ण होईल यात शंका नाही.
येणारा पावसाळा हा येवला तालुक्याच्या इतिहासात भुजबळ साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण अक्षराने लिहावा असा सुवर्ण क्षण घेऊन येणारा आहे.
५२ वर्षाचा कालव्याचा प्रवास, दोन पिढ्यांची स्वप्नभंग झाली तरी भुजबळ साहेबांवर विश्वास ठेऊन स्वप्नपूर्तीची आशा असलेली दुष्काळाची चटके सोसणारी ही तिसरी पिढी. येणार पावसाळा हा तालुक्याचा कायापालट करत भुजबळ साहेबांची शब्दपूर्ती करणारा पावसाळा असणार आहे. डोंगरगावला पाणी पोहचण्याची उत्कंठा आता शिगेला पोहचली असून येणाऱ्या काही दिवसात हा सुवर्णक्षण तालुक्याच्या इतिहासात साकारतो आहे. दुष्काळी तालुक्यात होणारी ही हरितक्रांती करणारे, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहून जाणारे पाणी मांजरपाडा बोगद्यातून प्रवाहाची दिशा बदलून पूर्वेकडे पाणी आपल्या मतदारसंघात घेऊन येणारे छगन भुजबळ हे आमच्यासाठी आधुनिक भगीरथ आहेत.
ज्यांच्या अंगात पाणी त्यांच्या घरात पाणी दारात पाणी शेतात पाणी गावात पाणी तालुक्यात पाणी मतदार संघात पाणी मतदाराच्या खिशात (द्रव्य खजिना ) पाणी मतदारसंघाला सुजलाम सपलाम करणारा पाणीदार नेता छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त पंकज भुजबळ दादा यांची विधान परिषदेवर निवड होऊन शपथविधी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा!… सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन
सत्यमेव जयते
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा




