महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.28

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.28
महात्मा फुले जडणघडण
१५
गल्लत करीत असत. येशू खिस्त आणि बायबल यावर विश्वास नसणाऱ्या सर्वांना पाखंडी म्हणून संबोधण्याची खिस्ती धर्मोपदेशकांची रीत होती. सरकारी विद्यालयातील शिक्षणक्रमामुळे त्यांचे विद्यार्थी खऱ्या धर्मापासून अधिकाधिक दूर जात आहेत अशी त्यांची नेहमीची तक्रार होती. या विद्यार्थ्यांना धर्माची आवश्यकताच जाणवत नाही, सर्वच धर्म सदोष व तर्कदुष्ट आहेत, तेव्हा हा धर्म खरा किंवा तो धर्म ग्राह्य अशी निवड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. धर्माची चर्चा करणे म्हणजे काळाचा व विचारशक्तीचा अपव्यय आहे असे ते समजतात. एल्फिन्स्टन विद्यालयात काही वर्षे अध्यापन करून डॉ. विल्सनच्या शिक्षणसंस्थेत दाखल झालेले प्रो. हेंडरसन यांचा हा अभिप्राय आहे. पुण्यातील धर्मभोळेपणा अलीकडे कमी होत चालला आहे. पण त्याची जागा दुर्दैवाने पाखंडीपणा घेत आहे; आणि कित्येकदा तर त्याची परिणिती नास्तिकपणातच होते. मुंबईतील सुशिक्षित तरुणांपेक्षाही पुण्यातील विद्यार्थीवर्गात ही प्रवृत्ती अधिक प्रमाणात आढळते असे मिचेल व निज्विट या उभयतांचे मत बनले होते. या अनेकविध मतप्रणालींची जोतीरावांसारख्या चौकस व चिंतनशील माणसाने दखल घेतली असेल यात शंका नाही, परंतु त्यांच्या विचारांत पुन्हा एकवार परिवर्तन घडून येण्यास टॉमस पेन यांचे ग्रंथ कारणीभूत झाले. ” आपली सर्वांची चांगली एकी केल्याशिवाय आपल्यास अमेरिकन, फ्रेंच आणि रशियन लोकांची बरोबरी करिता येणार नाही असे त्यांनी (चार सुधारल्या भटविद्वानांनी) मला टॉमस पेन वगैरे ग्रंथकारांच्या पुस्तकातील कित्येक वाक्यांच्या आधाराने सिद्ध करून दाखविले. यावरून मी तसले (ब्रिटिशविरोधी) वेडेचार काही दिवस माझ्या लहानपणी करीत होतो. परंतु पुढे मी जेव्हा त्याच ग्रंथांवरून बारीक विचार करून पाहू लागलो, तेव्हा या सुधारल्या भटांच्या मतलबी मसलतींचा खरा अर्थ माझ्या ध्यानात आला. असे जोतीरावांनी स्वतःच निःसंदिग्धपणे म्हटले आहे. “आम्ही शाळेत असता विलायतेकडील प्रख्यात नास्तिक टॉमस पेन व वालटेर यांच्या ग्रंथातील काही नास्तिक मताचे निवडक उतारे छापून पुणे-मुंबईकडील सुधारलेल्या मंडळींनी आम्हांकडे पाठविले होते.” परमहंस मंडळींच्या अहमदनगर शाखेचे जुने सभासद कासम महंमद यांनी बाबा पदमनजी यांना धाडलेल्या पत्रातील या
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




