माननीय आमदार दत्ता भरणे मामा इंदापूर माझी सोलापूर जिल्हा पालकमंत्री यांना राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीने सत्यशोधक शंकरराव लिंगे दिले निवेदन

माननीय आमदार दत्ता भरणे मामा इंदापूर माझी सोलापूर जिल्हा पालकमंत्री यांना राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीने सत्यशोधक शंकरराव लिंगे दिले निवेदन
विषय:-ओबीसी नेते मा.प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथआबा वाघमारे प्राध्यापक श्रावण देवरे सर एडवोकेट मंगेश ससाने एडवोकेट मृणाल ढोले पाटील ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे समता परिषद महिला नेत्या सपना ताई माळी यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात यावी याबाबत, अंतुर ने भरणेवाडी भरणे मामा यांच्या निवासस्थानी कार्यालयात झाली सविस्तर चर्चा योग्य ती कारवाई करण्याबद्दल उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याकडे भेटून पूर्णपणे चौकशी अहवाल व योग्य ती सुरक्षा प्राण्याबद्दल ओबीसीच्या मागण्या मांडणार असल्याचे सांगितले
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन यांच्या वतीने निवेदन,

महोदय,
आम्ही राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन संपूर्ण ओबीसी आरक्षण कमिटी व संपूर्ण महाराष्ट्र ओबीसी समाज यांच्या वतीने निवेदन देतो की , दि.30/9/2024 रोजी सायंकाळी पुण्यामध्ये ज्याप्रकारे ओबीसी नेते मा.प्रा. लक्ष्मण हाके सर यांच्यावर पाळत ठेवून काही मराठा समाजाच्या विकृत बुद्धीचे झुंडशाही नवयुवकानी गुंडाळी ओबीसी नेते मा.लक्ष्मण हाके सर यांना ज्या पद्धतीने बेबनावी आरोप करत त्यांनां जीव मारण्यासाठी ताब्यात घेऊन दबाव टाकून अघोरी कृत्य केले. व सोबत त्यांच्या हाताला ,मानेला दाबून,त्याचा जीव कसा घेता येईल.असे कृत्य केले. त्यामुळे स्वराज्य सेनेचे अध्यक्ष मा.संभाजी भोसले कोल्हापूर व त्यांच्या हे अघोरी कृत्य केलेल्या कार्यकत्या वरती जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करून पोलिस अधिकारी यांनी अहवाल सादर करावा
व ज्या पद्धतीने मराठा युवकांच्या झुंडशाहीने प्रशासनाला न घाबरता जी अरेरावीची भाषा वापरून त्यांचा जीवघेणा प्रयत्न केला.हे सगळे कृत्य बघता , ओबीसी आरक्षण नेते मा.प्रा. लक्ष्मण हाके सर व भविष्यात नवनाथ वाघमारे यांच्या पण जीवीताला याच पद्धतीचा धोका असल्याचे दिसून येत
अशाच पद्धतीने चार मे 2018 रोजी सोलापूर रेस्ट हाऊस वर मराठा आरक्षणाबाबत सूचना हरकती सुनावणी घेण्यासाठी जस्टीस गायकवाड आयोग सोलापूरला आले होते त्यावेळी 200 गुंडांनी ओबीसी नेते शंकराव लिंगे यांच्यावर हल्ला केला यांच्याकडील निवेदन घेऊन फाडण्याचा प्रयत्न केला त्यांना सुनावणीसाठी जाण्यासाठी मज्जाव केला त्यांच्या तोंडाला झेरॉक्स ची केमिकल युक्त साई काळी शाई लावून त्यांचे कपडे फाडले मारहाण केली धक्काबुक्की केली शिवीगाळ केली काळी शाही लावल्याने त्यांच्या डोळ्याला इजा झाली रेडी ना फाटला डोळ्याचे ऑपरेशन करावे लागले त्यामध्ये त्यांची 70 टक्के नजर कमी झाली आजही त्यांच्यावर उपचार चालू आहेत महिन्याला मेडिकल खर्च दहा हजार रुपये मुंबईला येणे जाणे राहणे तीन-चार महिन्याला एक पन्नास हजार रुपये चे इंजेक्शन घ्यावे लागते त्यावेळेला मराठा समाजातील ज्यांनी शाई लावली त्या तिघांवर या फायर दाखल आहे आज पर्यंत त्यांना अटक केली नाही कसली शिक्षा अजून पर्यंत झालेली नाही कोणती तारीख दिलेली नाही पोलिसाने अजून आरोप पत्र दाखल केले नाही आजही शंकरराव लिंगे यांनी मराठा आरक्षणाविरुद्ध हायकोर्टामध्ये तीन याचिका दाखल केल्या आहेत एक याचिका विलास किशन क्षीरसागर या अपंग तरुणाला मराठा आरक्षण आंदोलनकारी गुंडांनी तारापूर नाला पंढरपूर येथे 31 ऑक्टोबर 24 ला झाडाला टांगून भर चौकात रात्रीच्या वेळी फाशी दिलेली आहे त्याच दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा बोगस आत्महत्या दाखवण्यात आले आहेत दोन याचिका मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये कुणबी मराठा मराठा कुणबी 2004 चा बेकायदेशीर अध्यादेश रद्द करा करावा म्हणून आहेत या तिन्ही याचिकेचे एडवोकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते व डॉक्टर जयश्री पाटील आहेत त्याबद्दल ही लिंगे यांना अधून मधून धमक्याचे फोन येत आहेत मे 2018 मध्ये पुण्यामध्ये अडवोकेट मंगेश ससाने एडवोकेट मृणाल ढोले पाटील सपना माळी यांच्यावरही हल्ला झाला होता श्रावण देवरे यांनाही अनेक धमक्या येत आहेत टीव्हीवर डिलीट च्या वेळी अनेक वेळा खटके उडत आहेत
.त्यामुळे मा. महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्रीसाहेब व गृहमंत्री साहेब यांना आम्ही राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन संपूर्ण ओबीसी आरक्षण कमिटी व संपूर्ण महाराष्ट्र ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देवून कळवितो की , सदरील ओबीसींच्या या सर्व नेत्यांना येत्या ७ दिवसांच्या आत झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी.अन्यथा आम्ही राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन संपूर्ण ओबीसी आरक्षण कमिटी व संपूर्ण महाराष्ट्र ओबीसी समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देवून आंदोलन सुरू करू असे पूर्वसूचित करू इच्छितो म्हणून ओबीसी नेत्यांना सुरक्षा द्यावी ही विनंती.
करीता माहितीस्तव निवेदन सादर करीत आहोत.
आम्ही असे सूचित करतो की
जर या निवेदनानंतर आपण कोणतीही कार्यवाही न करता उद्या जर भविष्यात ओबीसींच्या या सर्व नेत्यांच्या जीवीताला कोणत्याही प्रकारचे काही कमी जास्त धोका झाला तर याला संपूर्ण महाराष्ट्र पोलीस प्रशासन व राज्याचे मा.मुख्यमंत्रीसाहेब ,गृहमंत्री साहेब जबाबदार असतील याची नोंद घ्यावी,
प्रती, लिपी माहितीसाठी
1)मा.गृहमंत्रीसाहेब महाराष्ट्र राज्य मुंबई,
2)मा.गृहसचिव महाराष्ट्र राज्य मुंबई,
3}मा.पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई,
4)मा.जिल्हाधिकारी सोलापूर
६}मा.विशेष पोलिस महानिरीक्षक परीक्षेत्र कोल्हापूर
आपलेविश्वासू
राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01



