सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 106

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 106
जाधवांची महत्त्वाची प्रस्तावना आहे. ‘मराठा शिक्षण परिषद अधिवेशन’ या जयवंत बाबुराव जगताप संपादित (दोन खंड) या ग्रंथालाही ‘मराठा शिक्षण परिषदेचा पूर्वेतिहास’ या शीर्षकाचा जाधवांचा ऐतिहासिक लेख लाभला आहे.
भास्करराव जाधव हे पट्टीचे वक्ते होते. ते १९२० ते १९३० या दशकात सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. मराठी मुलखात सत्यशोधक समाजाच्या शाखा काढण्याच्या हेतूने त्यांनी अनेक सभा घेतल्या. पुणे येथील ख्यातनाम वसंत व्याख्यानमालेचे ते सन्माननीय वक्ते होते. पुणे येथील लक्ष्मणराव ठोसर, गुरुवर्य बाबूराव जगताप, वसंतराव परब आदी मंडळींनी सुरू केलेल्या ब्रदरहुड संस्थेच्या वार्षिक उत्सवात त्यांची व्याख्याने संपन्न झाली. इ. स. १९११ साली पुणे येथील जेधे मॅन्शनमध्ये भरलेल्या ब्राह्मणेतर शिक्षक सभेलाही त्यांनी मार्गदर्शन केले. १९२३ साली सातारा जिल्ह्यातील काले येथे बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचे मार्गदर्शन लाभले होते.
भास्करराव जाधवांचे मुंबई येथे वास्तव्य असताना त्यांनी बॉम्बे लीग शिक्षण संस्थेची स्थापना करून मुंबईत ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. या संस्थेचा प्रचार आणि प्रसार जोमात होता. भास्करराव जाधवांनी सहकारी चळवळीतही उत्तम सहभाग नोंदविला. या धामधुमीत त्यांनी आपली कन्या सत्यवतीचा १९२४ मध्ये सीताराम रामजी तायडे यांच्याशी विवाह लावून दिला. अ.भा. मराठा शिक्षण परिषद आयोजनाला १९०७ साली प्रारंभ झाला.
दिनांक २० व ३१ डिसेंबर १९०७ रोजी मराठा शिक्षण परिषदेचे पहिले अधिवेशन कर्नाटक राज्यातील धारवाड येथे पार पडले. या अधिवेशनाचे जाधव स्वागताध्यक्ष होते. स्वागताध्यक्षीय भाषणात त्यांनी परिषदेचा उद्देश, कार्य आणि परिषदेच्या आवश्यकतेवर चर्चा केली. मराठ्यांच्या तत्कालीन शैक्षणिक परिस्थितीवर भाष्य करून शिक्षणाची आवश्यकता जोरकसपणे मांडली. मराठा शिक्षण परिषदेचे दुसरे अधिवेशन मुंबई मुक्कामी बडोदा निवासी खासेराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. दिनांक ३० व ३१ डिसेंबर १९०८ रोजी पार पडलेल्या या अधिवेशनप्रसंगी भास्करराव जाधव परिषदेचे सचिव होते. सचिव म्हणून दोन वर्षांचा अहवालही त्यांनी या प्रसंगी प्रस्तुत केला. परिषदेचे सहावे अधिवेशन दिनांक २४, २५ व २६ डिसेंबर १९१२ रोजी तुकोजीराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या प्रसंगी अध्यक्षांचे (इंग्रजी भाषेतील) भाषण त्यांनी वाचून दाखवले. या नंतर अहमदनगर येथे भरलेल्या दिनांक २६, २७ व २८
सत्यशोधकांचे अंतरंग 106
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा


