शरणगाथा क्रमशा तीन

शरणगाथा क्रमशा तीन
आनंद झाला. इष्टलिंग नसेल तरी चालेल पण जानवं नको, ही त्यांची भूमिका कामय होती. ‘इष्टलिंग आम्ही घरी घालतो. आमच्या वडिलांचे ‘लिंगाकार’ (गुंडगडगी, गुनगडगी, लिंग संपुट, चौका अशा विविध नावांनी ओळखली जाणारी दोऱ्यात ओवलेली इष्टलिंग ठेवण्याची चांदीची छोटी डबी.) आम्ही जपून ठेवली आहे. ती गणपती बाप्पासाठीच,’ हा खुलासाही त्यांनी केला. फारशी घासाघीस न करता मूर्तीकाराने सांगितलेली किंमत देऊन आजोबा आपला बाप्पा घेऊन घरी गेले.
एपिसोड नंबर २. सोलापूरातल्या मिल कामगार वस्ती असलेल्या नरसिंग गिरजी चाळीतील एक घर. हे घर फारसे धार्मिक परंपरा व रीतीरिवाज न पाळणारे, माझ्या कार्यालयीन सहकारी असलेल्या मित्राचे. तिथेही गणरायाच्या स्वागताची लगबग. पस्तिशीतील हा पप्पा आपल्या दहा वर्षाच्या मुलीसोबत गणेशमूर्ती खरेदी करून घरी आलेला. एका पाटावर बप्पा दारातच थांबले वेटिंगमध्ये. थोड्या वेळाने आई आरतीचे ताट घेऊन आली. सोबत त्याची पत्नीही. गणपतीच्या डोक्यावर नवा रूमाल आणि त्याच्या गळ्यात लिंगाकार घातल्यानंतरच सगळ्यांचा घरात प्रवेश झाला. म्हणजे देव असला तरी त्याला आपल्या घरात घेताना आपला धर्म, कुळाचार त्यालाही लागू करण्याची रीत सर्वत्र दिसते. स्थळ आणि पात्रं बदलून पाहिल्यास अशा कित्येक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. ज्याचा त्यांनी त्यातून बोध घ्यावा. आपल्या परीने अन्वयार्थ लावावा. या पार्श्वभूमीवर बसव युगातील शरणांच्या चरित्राचा अभ्यास करताना मला जाणवलेल्या बाबी खूप विसंगत आहेत. एकीकडे शरणांचे नाव घ्यायचे दुसरीकडे त्यांच्या विचारांकडे, शिकवणुकीकडे आणि वचनांकडे दुर्लक्ष करायचे अथवा आपल्या सोयीप्रमाणे त्यांचा अन्वयार्थ लावायचे, असा दुटप्पी प्रयोग आढळणे अपवादाचे नाही. असोच.
या पुस्तकात महात्मा बसवण्णा यांच्यासह बसवयुगातील २१ शरणांच्या चरित्रांचा समावेश आहे. या कथा औरंगाबादहून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक एकमतमध्ये दर रविवारी ‘वचन संवाद’ या सदराखाली प्रकाशित झाल्या आहेत. या लेखनास वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. चरित्रनायक माझ्या तुमच्यासारखी हाडामांसाची माणसं होती. ते देव अथवा दैवी अवतार नव्हते. देवत्त्वाला पोहोचलेली माणसं होती ती. आपण मात्र त्यांना देवच करून टाकलंय. देवाचे अवतार करून टाकलंय. त्यांचं माणूसपण विसरून दैवतीकरण करताना त्यांच्या काळाच्या कित्येक वर्षे पुढच्या विचारांकडे मात्र दुर्लक्ष केलं. ज्या अंधश्रद्धा, कर्मकांड आणि माणुसकीच्या विरोधातील विखारांशी
शरणमाचा क्रमशः तीन
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा




