महात्मा फुले साहित्य आणि चळवळ. क्रमशा.1

ठिकाणी अनेक सत्यशोधक शाखा स्थापन करण्यास सत्यशोधकांना प्रेरित केले. जन्मगावी खिरोदे येथे त्यांनी एक शाखा काढली. त्यांच्या सत्यशोधकी कार्याचा आणि ‘आत्मोद्धार’मधील सत्यशोधकी विचारांची प्रशंसा ‘विजयी मराठा’ आणि ‘दीनमित्र’ पत्रांनी वारंवार केली. चौधरी यांनी सत्यशोधक चळवळीवर छोट्या छोट्या पुस्तिका प्रसिद्ध केल्या. जळगाव जिल्ह्यातील खिरोदे येथील काँग्रेस नेते धनाजी नाना चौधरी हे सीताराम नानांचे ज्येष्ठ बंधू होते. तसेच ना. भास्करराव जाधव हे इ. स. १९२० ते १९३० या कालखंडात अ. भा. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. या कालखंडात सीताराम नाना चौधरी हे केंद्रीय सत्यशोधक समाज कार्यकारिणीचे सदस्य होते.
संदर्भ – १) खान्देशातील समाजप्रबोधनाची चळवळ-१९००-१९५०- प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील
चौधरी नागेश पुंडलिक (१७ ऑगस्ट १९४२)
विदर्भातील सत्यशोधक अधिवेशन आयोजनाचे एक संयोजक, ‘समतेसाठी बहुजन संघर्ष’ या पाक्षिकाचे संपादक नागेश चौधरी यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४२ रोजी झाला. उच्चविद्याविभूषित (एम. एस्सी. जिऑलॉजी, एलएल. बी., नागपूर विद्यापीठ) असलेले नागेश चौधरी यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील देऊतवाडा हे असून, ते सध्या नागपूर येथे वास्तव्यास आहेत.
इ. स. १९६० नंतर ते पुरोगामी विचारांकडे आकर्षिले गेले. नागपूर येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘अभिजित’ साप्ताहिकाच्या वाचनाने आणि याच साप्ताहिकातील लेखनाने (१९६९ ते १९७१) चौधरी सत्यशोधक विचारांकडे झुकले. दरम्यान, १९७३ साली सत्यशोधक समाजाच्या शताब्दी समारोहापासून प्रेरणा घेऊन ‘अभिजित’ साप्ताहिकाच्या संपादक, लेखक, कार्यकर्त्यांनी नागपूर येथेही सत्यशोधक समाज वर्धापन दिन कार्यक्रम घेण्याचा पायंडा पाडला.
सत्यशोधक समाजाचे २४ वे अधिवेशन दिनांक २३ व २४ सप्टेंबर १९९५ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भुवन, नागपूर येथे एक ज्येष्ठ सत्यशोधक दौलतराव गोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या अधिवेशनाचे संयोजक नागेश चौधरी हेच होते. या अधिवेशनात सत्यशोधक समाजाचे तत्कालीन अध्यक्ष रायभान जाधव यांनी जातीव्यवस्थेचा अंत झाला असून, आता सत्यशोधक कार्यकर्त्यांनी वर्णसंघर्षाऐवजी वर्गसंघर्षाशी लढाई करावी म्हणून सुतोवाच केले. यावर चौधरी यांनी रायभान जाधवांचा निषेध करून आजही वर्णसंघर्षाची आवश्यकता असल्याचे निक्षून प्रतिपादन केले.
यानंतर समाजाचे २५ वे अधिवेशन (वर्धा-१९९६) आणि २६ वे अधिवेशन (यवतमाळ – १९९७) येथे आयोजित करण्यात आले होते. या दोन्ही अधिवेशनांना नागेश चौधरी यांचे सहकार्य लाभले. इ. स. २००० नंतर सत्यशोधक संघटन महात्मा फुले यांच्या विचारापासून भरकटले असल्याचे त्यांचे मत होऊन ते सत्यशोधक संघटनेपासून अलिप्त झाले. प्रस्तुत विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी ऑगस्ट २००३ साली ‘सत्यशोधक समाजाची वाट लावू नका!’ ही पुस्तिका ‘बहुजन संघर्ष’ च्या वतीने नागपूर येथून प्रसिद्ध केली.
असे असले तरी २००० सालानंतर आयोजिलेल्या सत्यशोधक समाज अधिवेशनामध्ये आणि सत्यशोधकी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात ते सहभागी होत होते. नागेश चौधरी हे सत्यशोधक विचारांपासून प्रेरित झाले. मार्च १९८४ पासून ‘समतेसाठी – बहुजन संघर्ष’ हे पाक्षिक नागपूर येथून ते प्रसिद्ध करीत आहेत. हे पाक्षिक आजही प्रसिद्ध होत आहे. दरम्यान, ३, ४ व ५ जानेवारी रोजी नागेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ९ वे सत्यशोधक साहित्य संमेलन
मौजे गुरुकुंज मोझरी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती येथे संपन्न झाले. संदर्भ – सत्यशोधक समाज अधिवेशने चिंतन आणि चिंता – जी. ए. उगले
सत्यशोधकांचे अंतरंग /99
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा




