मुंबई मलबार हिल येथे नाभिक समाजाची सामाजिक संवाद बैठक.

मुंबई मलबार हिल येथे नाभिक समाजाची
सामाजिक संवाद बैठक.
काल मुंबई येथील मलबार हिल येथे राज्याचे ऊपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सागर बंगल्यावर नाभिक समाजातल्या सर्व संघटनचे प्रमुख पदाधिकारी व नाभिक बांधवांची मा.केंद्रीय मंत्री तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज आहीर,राज्याचे भाजपा पक्षाचे महामंञी तथा ओबीसी नेते विजय चौधरी, माजी केंद्रीय विदेश मंत्री मुरलीधरन,ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजयजी गाते यावेळी उपस्थित होते.
नाभिक समाजातल्या पदाधिकारी व बांधवांनी आपल्या मागण्या प्रामुख्याने श्री संत सेना महाराज केशशिल्पी महामंडळ मंडळ कार्यन्वीत करुन पदाधिकारी नेमुणुक करावी लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक निधी द्यावा ,प्रताप गडावर शिवरक्षक जिवाजी महाले स्मारक,पन्हाळगडावरील नरवीर शिवबा काशीद पुतळा व समाधी स्थळ सुशोभाकिरण,माथेरान येथील हुतात्मा विर भाई कोतवाल व धामणगाव येथील हुतात्मा शाहीर लालासाहेब वाघमारे,हुतात्मा सांडु सखाराम वाघ स्मारक सुभोभिकरण यासाठी निधी,तसेच पर्यटक विभागाकडे स्मारकाची जबाबदारी द्यावी,
सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपालिका महानगर पालिका हद्दीतील रेल्वे,बसस्थानक,एस्टी बसस्थानक शासकीय,हाॅस्पिटल या सर्व ठिकाणी गाळ्यामध्ये नाभिक समाजातील दुकानदार यांना नाम मात्र भाडे किंवा किंमत घेऊन दुकान गाळे राखून ठेवावेत आरक्षण द्यावे गावोगावी समाजावर अन्याय होत आहे प्रस्थापित मराठे हल्ला करत आहेत दुकानाची मोडतोड करत आहेत मारहाण करत आहेत लोकांचा त्रास होत आहे त्यासाठी बारा बलुतेदारांना ॲट्रॉसिटी कायदा लागू करावा इत्यादी मागण्या करण्यात आल्या




