ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत संवाद बैठक संपन्न झाली

सांगली दि.६सप्टेंबर २०२४
दिनांक ११आगस्ट २०२४ रोजी ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी यल्गार महामेळावा मोठ्या थाटामाटात पार पडला,सदर मेळाव्यात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि उपोषणकर्ते ओबीसी नेते लक्ष्मण हाके,नवनाथ वाघमारे,मंगेश ससाणे यांनी मार्गदर्शन केलं होतं .हा मेळावा प्रचंड उत्साहात आणि उदंड प्रतिसादात पार पडला होता .यापुढील ओबीसी समाजाची संघटनात्मक बांधणी आणि भविष्यातील ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज सांगलीतील हरिप्रिया मंगल कार्यालयात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद बैठक संपन्न झाली .
आगामी विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य असणाऱ्या ओबीसी समाजाला वेगवेगळ्या पक्षातून किती तिकीट मिळणार?प्रतिनिधित्व व लढण्याची संधी मिळणार का?का बहुसंख्येने असणाऱ्या ओबीसींना सर्व पक्ष नजर अंदाज करणार आहेत ?या दृष्टिकोनातून ही संवाद बैठक संपन्न झाली. तसेच येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाज हा निर्णयाक भूमिकेत असेल प्रत्येक पक्षांना ओबीसी बांधवांना प्रतिनिधित्व देऊन लढण्याची संधी द्यावी त्या संधीचं ओबीसी बांधव विजयात रूपांतर करून समाजिकन्याय प्रस्थापित करतील.अन्यथा ओबीसीं समाज कोणाला मत द्यायचं आणि कोणाला पाडायचं हे ठरवले असून ओबीसी पहिल्यांदा ओबीसी एससी एसटी ,आणि अल्पसंख्यांकांना मतदान करेल.ओबीसींनी कोणाला पराभूत करायचं हे ठरवलं असून त्याची अंमलबजावणी काटेकोर पणे करण्या करीता नियोजन करण्यात आले आहे असे लक्ष्मण हाके यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते राहूल गांधी ओबीसींची जात निहाय जनगणना करावी यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल लक्ष्मण हाक्के यानी समाधान व्यक्त केल. परंतू स्थानिक प्रस्थापित काँग्रेस पक्षाचे नेते यांनी अनुसूचित जातीतील व जमातीतील ,अल्पसंख्याक, ओबीसी समाजाने सन १९७८ साली इंदिरा गांधी आणि १९९९ साली सोनिया गांधी यांच्या पाठीशी राहून काँग्रेस पक्ष वाचविला असून महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाला मत देणारा अनुसूचित जाती व जमाती,अल्पसंख्याक, ओबीसी प्रवर्ग पुढे असतो आणि निवडणुकीत प्रस्थापित समाजाला लाभ होऊन सत्तेवर आलेवर मत देणाऱ्यांवर अन्याय होतोय.
तसेच प्रस्थापितानी गरीब वंचित वर्गावर अन्याय त्यांनी काँग्रेस कशी संपवली याविषयी पुढील आठवड्यात राहुल गांधी यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीत आपण बोलणार असल्याचंही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे . तसेच कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिध्दरामहया हे विश्वगुरू बसवण्णां यांचे अनुयायी असून ते पहिल्यांदा कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बसव जयंती दिवसी शपथविधी होऊन अधिकार पदी आल्याबरोबर त्यांनी कर्नाटक राज्यातील सरकारी कार्यालयात विश्वगुरू बसवण्णा यांचे फोटो लावण्याचे आदेश काढून अमलबजावणी केली.
सिध्दरामहया हे एक महान वैचारिक नेते असून अर्थमंत्री, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी फार चांगले काम केले आहे. सिध्दरामहया यांचा जन्म म्हैसूर जिल्ह्यातील सिध्दरामनहुंडी येथे १९४८ साली झाला. निष्कलंक चरित्राचे उत्तम प्रशासक अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांनी केलेल्या जनहितकारी कार्याचा ठसा येथील जनतेवर असल्याने देशातील आदर्शवादी नेता म्हणून देशात एक आदर्श निर्माण करीत आहेत,. देशातील बुद्ध, बसवाण्णा,फुले, शाहू,आंबेडकर यांच्या विचारधारेचे पाईक कर्नाटक राज्यातील मठाधिपती यांना बरोबर घेऊन सामाजिक सुधारणा करीत आहेत.
सिध्दरामया यांचे आदर्श विचारांचे अनुकरण करून समाजातील शोषित, वंचित,उपेक्षीत जनतेसमोर आदर्श निर्माण करून समाजातील सर्व घटकांचो प्रगती करावी असे लक्ष्मण हाक्के म्हणाले.
यावेळी संजयबापू विभूते,विष्णू माने,संगीता खोत, तुकाराम माळी,संग्राम माने,बाळासाहेब गुरव,धनपाल माळी, तायाप्पा वाघमोडे,शिवाजीराव शेडगे,शंकरराव वगरे,आकाराम मासाळ,आण्णासाहेब खोत,ज्ञानेश्वर मेटकरी, नीलकंठ आदीजन उपस्थितीत होते.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा




