उसाला पहिला हप्ता 5000 रुपये प्रति टनाला शेतकऱ्याची मागणी मिळालाच पाहिजे
उसाला पहिला हप्ता 5000 रुपये प्रति टनाला शेतकऱ्याची मागणी मिळालाच पाहिजे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांच्यामध्ये ऊस दराबाबत बैठक* पार पडली. बैठकीमध्ये *रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटना ,बळीराजा शेतकरी संघटना व इतर अनेक शेतकरी संघटना उपस्थित होत्या* . सर्व शेतकरी संघटनांनी *जाणाऱ्या उसास ५०००/- रुपये पहिला हप्ता* व मागील गाळप झालेल्या उसास आणखीन १०००/- रुपये दिवाळीपूर्वी मिळावे अशी मागणी केली. त्यामध्ये फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील उसास ४००/- ची मागणी केली व जाणाऱ्या उसासाठी एकही शब्द काढला नाही.
तसेच बैठकीमध्ये सर्व सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांना जिल्हाधिकारी यांनी शेतकरी संघटना मागत आहेत तो दर मान्य आहे का? असे विचारले असता आम्ही आठ दिवसात निर्णय देतो असे सांगितले. त्यावरती जिल्हाधिकारी यांनी आठ दिवसात निर्णय न घेतल्यास आपला गाळप परवाना रद्द करू असे ठणकावून सांगितले.
आणि संपूर्ण बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांची बाजू धरल्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून माननीय जिल्हाधिकारी यांचा सत्कार केला. अशी माहिती परशुराम माळी अखिल भारतीय माळी महासंघ दक्षिण महाराष्ट्र अध्यक्ष यांनी दिली सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01